✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/11/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला. १९४९: भारताची घटना मंजूर झाली. १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म.  💥 मृत्यू :-  १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन.  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इजिप्तमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध, या हल्ल्यात 235 नागरिकांचा झाला मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं मुंबई विमानतळावर करण्यात आलं जल्लोषात स्वागत* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद ः मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी, एम. जी. एम. रुग्णालयात झाले प्रत्यारोपण. शनिवारी शहरात आणखी एक अवयवदान. यकृत, मूत्रपिंड आणि नेत्र दान यशस्वी. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयाच्या टीमने पार पाडली महत्वपूर्ण भूमिका.* ----------------------------------------------------- 4⃣ *भ्रष्टाचार निर्मूलनासाठी भगवत गीतेची शिकवण आवश्यक. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं वक्तव्य.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागनाथआण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १६ कोटी देणार - देवेंद्र फडणवीस.* ----------------------------------------------------- 6⃣ *हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन, भारताच्या पी.व्ही.सिंधू अंतिम फेरीत प्रवेश.* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर- भारत विरूद्ध श्रीलंका दुसरी कसोटी. दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 312 धावा. पहिल्या डावात भारत 107 धावांनी आघाडीवर. मुरली विजय, चेतेश्वर पुजाराचं शानदार शतक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भारतीय संविधान दिवस* देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्हर्गीस कुरियन* डॉ. वर्गीस कुरियन (लेखनभेद : व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ ; रोमन लिपी: Verghese Kurien) (नोव्हेंबर २६, इ.स. १९२१; कोळ्हिकोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत - सप्टेंबर ९, इ.स. २०१२; नडियाद, गुजरात, भारत) हे भारतीय अभियंते, उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण(इ.स. १९९९), जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील(वर्तमान भारताच्या  केरळ  राज्यातील) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात नोव्हेंबर २६, इ.स. १९२१ रोजी झाला. वर्गीज कुरियन इ.स. १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्‌सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे !!!* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो?* 👉. २६ नोव्हेंबर *२). भारतीय संविधान अंमलात कधीपासून आले?* 👉. २६ जानेवारी १९५० *३). भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते?* 👉 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन 👤 अर्जुन यनगंटीवार 👤 मुरलीधर हंबर्डे पाटील 👤 संजय बोंटावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलके* हल्लीचे लोक तर फार बोलके आहेत खुप छान बोलतात जसे ढोलके आहेत दोन्ही बाजूने वाजते ते म्हणजे ढोलके शब्द न पाळणारे काय कामाचे बोलके शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही कृती करण्यापूर्वी तुमच्या मनात नकारात्मक विचार कधीही येऊ देऊ नका कारण नकारात्मक विचार हेच तुमच्या चांगल्या करणा-या कृतीमध्ये बाधा आणतात. तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार जागृत करा आणि मन एकाग्रतेने करुन सातत्याने काम करत रहा आणि मग पहा तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते का नाही ते.आपणच आपल्या मनाची तयारी आणि आत्मविश्वास जागृत ठेवला तर कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकते हे निश्चित. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *इटुकला ससा* इटुकला ससा सांगतो कसा रडणे सोडा खुदुखुदु हसा... हास्याचे मोती अनमोल फार हळूहळू खातो गाजर चार... सर्वांना सांगतो हसा पोटभर हास्याचा प्याला प्यावा घोटभर... दुडुदुडु धावतो मोकळ्या रानी हास्यमंत्र सांगे साऱ्यांच्या कानी... प्यारा न्यारा गुबरा ससा सर्वांना देतो हास्याचा वसा... गंभीर होते जंगल सारे सश्याने भरले हसरे वारे... मनिषा कुलकर्णी आष्टीकर परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🙏मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा.*🙏 एक प्रसिद्ध संत होते. त्‍यांच्‍याकडे शिक्षण घेण्‍यासाठी दूरदूरवरून शिष्‍यगण येत असत. त्‍यांच्‍या शिष्‍य परिवारातील दोन शिष्‍य त्‍यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्‍नान करून पूजापाठ करण्‍यात मग्‍न होते. चार तासांच्‍या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा-या रूग्‍णांची सेवा करण्‍यास ते गुरुला मदत करत. त्‍या संतमहात्‍म्‍याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्‍यामुळे स्‍वत: पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना नि:शुल्‍क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्‍त्र, निवारा उपलब्‍ध करून देत. असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्‍यांच्‍या उपचारांची व्यवस्‍था करत असत. एकेदिवशी त्‍यांचे दोन्‍ही शिष्‍य त्‍यांच्‍या दीर्घपूजेत व्‍यग्र होते. त्‍याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्‍यादिवशी आश्रमात रुग्‍णांची संख्‍या जास्‍त होती. परंतु दोन्‍ही शिष्‍य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्‍हा निरोप धाडला. त्‍यावर त्‍या दोघांनी नाराजी व्‍यक्‍त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घालू लागले. तेव्‍हा गुरुजींनी त्‍यांना पुढील शब्‍दात मार्गदर्शन केले,''वत्‍सांनो, मी तर व्‍यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्‍यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्‍या बरोबरीची असते. कारण ती नि:स्‍वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्‍या दोन्‍ही शिष्‍यांचे डोळे उघडले. तात्‍पर्य :- ईश्‍वराची जिवंत कलाकृती म्‍हणजे माणूस त्‍याची सेवा म्‍हणजे साक्षात ईश्‍वराची पूजा असते व त्‍या सेवेपेक्षा अन्‍य कोणतीही पूजा ही मोठी नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment