✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय शिक्षण दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना. १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. 💥 जन्म :- १८८८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्म. १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६७ सोहेल फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६९ मायकेल ओवेन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - लिओनार्डो डिकॅप्रियो, अमेरिकन अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९१८ - जॉर्ज लॉरेंस प्राइस, पहिल्या महायुद्धाचा शेवटचा बळी. २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *177 वस्तूंवरील जीएसटी 28 वरुन 18 टक्क्यांवर, जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय.* ----------------------------------------------------- 2⃣ *लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषक समृद्धी आयोगाची केली घोषणा* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे मारण्यास पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेडने दर्शवली सहमती, सूत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *कल्याण : शामसुंदर जोशी यांना मराठी भाषा संवर्धनसाठी याज्ञवल्क्य पुरस्कार, स्मिता कापसे यांना संशोधन व लेखनासाठी सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार प्रदान; शाल, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रोख रक्कम पुरस्कारचे स्वरुप.* ----------------------------------------------------- 5⃣ *फाईव्ह स्टार हॉटेल वगळता सर्व हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के लागणार जीएसटी.* ----------------------------------------------------- 6⃣ *धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अटेंभे प्र. वार्सा ग्रामपंचायत अंतर्गत १३ जि.प. शाळा राज्यात प्रथमच सौर शाळा करण्यात आल्या.* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली- शिक्षण बदलीविरोधातील याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टाने दोन शिक्षकांची याचिका फेटाळली. शिक्षण बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच - सुप्रीम कोर्ट.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आज स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती. संपूर्ण भारतात त्यांची जयंती " शिक्षणदिन " म्हणून साजरा केल्या जातो. त्यानिमित्त प्राथमिक शिक्षणाविषयी लेखप्रपंच.......              *प्राथमिक शिक्षणाचे महत्व* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मौलाना अबुल कलाम आझाद* मौलाना अबुल कलाम आझाद : ( ११ नोव्हेंबर १८८८–२३ फेब्रुवारी १९५८ ). भारताचे एक प्रमुख राजकीय पुढारी. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले. आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची प्रतिमा बनवायला वेळ लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधिशाची नेमणूक कोण करते?* 👉 राज्यपाल *२) कोणत्या कायदान्वये भारतात निवडणुकांचा पाया घातला गेला?* 👉 भारतीय परीषद कायदा १८९२ *३) भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्यपणे अंदाजपत्रक हा शब्द कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे?* 👉 कलम २६६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 ऋषिकेश बेळकोणीकर, धर्माबाद 👤 शिवकुमार इबितवार, पदवीधर शिक्षक 👤 शेषराव पाटील 👤 बालाजी पांडागळे, नांदेड 👤 रणजित लोखंडे, नांदेड 👤 संतोष पेटेकर, प्राथमिक शिक्षक 👤 सूर्यकांत राखोंडे, धर्माबाद 👤 माधव तनमुदले, येवती 👤 हरीश देसाई 👤 दिवाकर आष्टेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" राग "* गरीब असो वा श्रीमंत राग येत असतो सहनशीलतेचा ही कधी अंत होत असतो गरीब असो वा श्रीमंत राग आला पाहिजे कधी राग ही प्रगतीचा भाग झाला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●🏝‼ *रामकृष्णहरी* ‼🏝●• 🏝🏝🏝🏝🏝🏝 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही माणसांचा स्वभाव वरवर एवढा चांगला असतो की,आपल्याला वाटते तो आपलाच आहे.आपण त्यांच्याशी खूप मैत्री करावी आणि आपल्या मनातले सारे जे काही असेल ते सांगून मन मोकळे करावे.पण असे करण्यापूर्वी थोडा विचार करा.ही माणसं तुम्ही समजता तशी तेवढी सरळ नसतात.मनात एक आणि ओठात एक असते.एवढेच नाही तर ती स्वार्थी, जळावूवृत्तीची व आपमतलबीअसतात, आपल्या मनातले काढून घेऊन तुमचा फायदा घेतात आणि तुमचीच तुमच्यामागे तुमच्या नावाचा दिंडोरा वाजवून तुमची बदनामी करतात.अशा माणसांना सहजासहजी आपले समजू नका. नाही तर तुमचे नुकसानच होणार आहे.अशा माणसांपासून थोडे दूरच रहायला शिका.अशी माणसे जोडण्यापेक्षा दूर ठेवलेलीच बरी हे केव्हाही लक्षात ठेवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालगीत* उठा माझ्या बालगोपालानों धरा सुर्य किरणांनी न्हाली उठा पटकन आळस झटका बघा शाळेची आता वेळ झाली शौचालयाचा करा आधी वापर निरोगी राहण्याचा एकच जागर साबण लावूनीया धूवा निर्मळ हात स्वच्छ आपुले घासा दात करुनी घ्या अंघोळ व्हा ताजेतवाने धूतलेलेच घाला कपडे प्रसन्न व्हा अंतरमनाने नाश्ता करुनी घ्या दूध पोळी काजू बेदाणे लागा पळायला आता शाळेत मोठ्या जोमाने दडपण नसते कधी शाळेत आता लिहूनी शिकूनी वाचा यशाची गाथा *सौ.सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दृढनिश्‍चय* श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्‍पक वृत्‍तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्‍य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. *तात्‍पर्य :-* दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही काही वेळेला दृढनिश्चय हेच इंगीत ठरते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment