✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/11/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण. १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू. 💥 जन्म :- १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई. १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोपर्डी निकाल - कोर्टाच्या निकालानंतर पीडितेला न्याय, कोर्टाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी, शिक्षेनंतर कुणीही अत्याचाराला धजावणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *समृद्धी मार्ग करुन वेगळं राज्य निर्माण करणार असल तर समृद्धी मार्ग मध्येच तोडून टाकेल - राज ठाकरे* ----------------------------------------------------- 3⃣ *राज्यातील 734 ग्रामपंचायती साठी 26 डिसेंबरला होणार मतदान* ----------------------------------------------------- 4⃣ *भारताची मनुषी छिल्लर ठरली 'मिस वर्ल्ड-2017 ; तब्बल 17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमान* ----------------------------------------------------- 5⃣ *लातूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची 35 पथकांकडून शोध मोहीम.* ----------------------------------------------------- 6⃣ *बांदीपोरा हाजिन भागात चकमकीमध्ये सुरक्षा पथकाकडून पाच दहशतवादी ठार.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका पहिली कसोटी, श्रीलंकेच्या तिस-या दिवसअखेर 4 बाद 165 धावा तर भारताच्या पहिल्या डावात 172 धावा.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- शिक्षणाची वारीचा आज लातूर विभागात शेवटचा दिवस, रविवार असल्यामुळे शिक्षकांची गर्दी राहण्याची शक्यता* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख *मोबाईल महत्वाचे की शौचालय* जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत बांग्लादेश आणि व्हिएतनाम सारख्या अनेक देशानी समाधान कारक प्रगती केली आहे. सबसहारन आफ्रिकेतील 26 देशानीही याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे ....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_49.html *स्वच्छ भारत ; समृद्ध भारत* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमती इंदिरा गांधी* इंदिरा गांधी ( नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४ ) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) आपल्या देशात विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ७ नोव्हेंबर *२) आपल्या देशात शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो?* 👉 ११ नोव्हेंबर *३) आपल्या देशात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १४ नोव्हेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 कैलाश पाटील खरबाळे 👤 श्वेता नरसुडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" पिकते तिथे "* पिकते तिथे विकत नाही विकते तिथे पिकत नाही पिकते तिथे विकले पाहिजे विकेल तिथे पिकले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' म्हणजेच पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू! ही जन्म-मरणाची वारंवार होणारी फेरी संपविणे म्हणजेच 'मुक्ती!' याचा अर्थ मुक्तीच्या आधी जन्म-मरणाचा फेरा आणि पुनर्जन्म आहे हे मान्य करावे लागेल. महाभारताच्या युद्धानंतर पांडव स्वर्गाच्या द्वाराकडे वाटचाल करू लागले ते कशासाठी? महायोद्धा रावण अखेरीस रामरायांना हात जोडून विनविता झाला कशासाठी? हे सारे प्रश्न 'मुक्तीसाठी' या एकमेव उत्तराकडे घेऊन जातात. आम्हाला पुन्हा जन्म नको, म्हणजे मग शिल्लक काहीही उरणार नाही. प्राप्त होईल ती केवळ 'मुक्ती आणि मुक्तीच!'* *'ज्ञानेश्वरी' लिहून ज्ञानेश्वरांनी अवतारकार्य संपविले, लोकांना उपदेशामृत पाजून तुकोबा वैकुंठाला गेले, नामदेवादि संतानीही हेच केले. पूर्वीच्या जन्माचे पडसाद म्हणून हा जन्म प्राप्त झाला. परंतु आता मात्र हे पुन्हा नको, हे या द्रष्ट्या पुरूषांनी निश्चित केले आणि प्राप्तही करून घेतले. सर्वसामान्य माणसाला या महामार्गावर एक-एक पाऊल पुढे सरकता आले तर निश्चितपणे मुक्तीचे लक्ष्य प्राप्त होईल.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काळ हा कधीच कुणासाठी थांबत नाही.त्याचा प्रवास हा निरंतर चालत राहतो. काळाप्रमाणे आपणही चालायला शिकले पाहिजे. आपण जर नाही शिकलो तर आपल्या जीवनाचा चालणारा प्रवास कुठेतरी खंडित होऊन जगणे अवघड करून टाकतो. काळाला तोंड देण्याचा आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवन जगणे सुसह्य होईल आणि आपल्या जीवनात सातत्यपूर्ण,चांगले जीवन जगण्याचे मनोधैर्यही वाढेल. काळ असाही आला तरी काळाला भ्यायचे नाही तर त्याला टक्कर कशी द्यायची हे त्याच्याकडूनच शिकले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *|| निखारा ||* झाकून ठेव निखारा राखेसह दाखवू नको कोणास कैक येतील फुंकर मारायला क्षणभर घेतील उबारा अन निघूनही जातील काही क्षण धगधगेल निखारा कदाचित पेट घेईल वाऱ्यावर उडेल राख धूर डोळ्यात खुपेल अन झुंजावे लागेल निखाऱ्यास स्वःअस्तित्वासाठी पुन्हा पुन्हा पण होईल भ्रमनिरास न पाळणार कोणीच त्या पेटत्या निखाऱ्यास..!! सुनिल पवार, मुंबई =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जिद्द* मंजूच्या बोटांना जन्मापासूनच आपल्या सारखी पेरं नव्हती. त्यामुळे तिला वस्तू धरतांना, लिहीतांना, बटण लावतांना अशी रोजची कामे करतांना खूपच त्रास व्हायचा. पण मंजू जिद्दीने स्वतःची कामे कोणाचीही मदत न घेता पूर्ण करायची. मंजूला चित्रकलेची खूपच आवड होती. चित्र काढतांना तिला वेळेचे भान राहत नसे. एका रविवारी सकाळी तीन तास बसून बागेचे सुंदर चित्र रंगवले. चित्र पाहताच आईने आनंदाने मंजूला जवळ घेत म्हटले,"मंजू, तुझ्या हातात कला आहे. त्याला अधिकाधिक वाढवायचा प्रयत्न कर". आईच्या बोलण्याचा मंजूवर खोलवर परिणाम झाला. त्या रात्री आईबाबांचे बोलणे मंजूच्या कानावर पडले. आई म्हणत होती,"अहो, आता शाळेत स्पर्धा आहेत. आपण मंजूला नवीन रंग आणि काही कागद घेऊन देऊ या का?". त्यावर बाबा वैतागलेल्या सुरात म्हणाले," अगं, महागई किती वाढलेली आहे. शिक्षणाच्या भविष्याच्या द्रुष्टीने कितीतरी पैसा साठवायचा आहे. रंगाचे पैसे खर्च करणे आपल्याला शक्य नाही. तसे ही हातामुळे मंजूला फार काळ चित्रकला करता येईल असे मला वाटत नाही." वडीलांचे हे शब्द ऐकून मंजूला रडूच कोसळले. सकाळी काढलेले चित्र तिने फाडून टाकले. दुसर्‍या दिवशी उठल्यावर मंजू आईला स्वयंपाकात मदत करायला आली. आईने आश्चर्याने तिला त्याबद्दल विचारले. मंजूने कालचे संभाषण ऐकल्याचे सांगितले. आईच्या डोळयात पाणी आले. तिने मंजूला कुशीत घेत म्हटले," मंजू आपल्या अपंगावर आपणच मात करायला शिकले पाहिजे. तुला माहिती आहे विल्मा रुडाल्फ ही अमेरिकन खेळाडू पोलिओमुळे दोन्ही पायांनी अपंग होती. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने ऑलिंपिक स्पर्धेत तीन सुवर्ण पदके मिळवून जागतिक विक्रम केला होता. मंजू तुझी स्थिती तर ह्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. तुझ्या ह्या वाटचालीत तुला अनेक अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करायला शिक." आईच्या बोलण्याने मंजूला खूपच हुरुप आला. आईला घटट मिठी मारत मंजू म्हणाली " हो आई, जर विल्मा करु शकते तर मी का नाही."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment