✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक सहनशीलता दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली. १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या. १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ. १९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड. 💥 जन्म :- १९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म. १९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. १९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. १९६३: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म. १९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म. १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा. २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक : आयकर कार्यालयाचे उद्घाटन. आयकर विभागातील सर्व अधिका-यांनी आपल्या भावी पिढीला सक्षम आणि चांगले भविष्य देण्यासाठी स्वतः त्याग करण्याची तयारी ठेवावी - प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी शुक्ल* ----------------------------------------------------- 2⃣ *ठाणे : लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह रविवार 26 नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या पदवीदान सोहळ्यात विविध विद्याशाखेत गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 74 सुवर्णपदके प्रदान करण्यात आले असून 22 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी - १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील खड्डे बुजविले नाही तर आंदोलन करणार, एक जरी खड्डा दिसला तरी मंञ्यांना राज्यात फिरू देणार नाही, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर- शेगावचं ऊसदर आंदोलन स्थगित, उसाला पहिली उचल 2525 रुपयांवर सहमती* ----------------------------------------------------- 6⃣ *योगाला खेळाचा दर्जा देण्याचा सौदी अरेबियाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा आगामी भारत वि. श्रीलंका कसोटीचे करणार समालोचन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - वेळ नाही मला* मोहन आणि त्याची पत्नी कमला शेतात मोलमजुरी करून आपल्या चार लेकराला शिक्षण दिले. आमच्यासारखे खडतर जीवन लेकरांच्या नशिबी येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःच्या दोन एकर जमीन मध्ये कष्ट केलेच त्याशिवाय वेळप्रसंगी इतरांच्या शेतात जाऊन मोलमजूरी केली. मुलगा हवाच बायकोच्या या हट्टापायी ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *पुल्लेला गोपीचंद* पी. गोपीचंद यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1973 रोजी नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांचे प्रशिक्षक देखील आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वाणी आणि पाणी जपून वापरा कारण वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ आणि पाणीमुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एकपेशीय कवकांना काय म्हणतात?* 👉 किण्व *२) एल. पी. जी. (LPG) मध्ये कोणते घटक असतात?* 👉 ब्युटेन आणि आयसोब्युटेन *३) कोणत्या शहरात वायुगळतीमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले?* 👉 भोपाळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष पेटेकर, प्राथमिक शिक्षक 👤 छोटू पाटील, बाभळी 👤 मोहन कानगुलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " विषय " पुन्हा पुन्हा तोच विषय कोणालाच नको वाटतो धुमसता विषय सांगा कोणाला कशाचा पटतो कोणत्याही विषयाचे एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे जेंव्हाचे तेंव्हाच विषय हाता वेगळे केले पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= कलाकाराच्या जीवनात कितीही सुखदु:खाचे चढ उतार असलेतरी तो प्रेक्षकांना निखळ आनंद देतो.तो आपले दु:ख कधीच सांगत नाही.तो इतरांच्या जीवनात असलेले थोडेबहुत दु:ख आपल्या कलेच्या माध्यमातून दूर करण्याचे काम करतो.ही देखील एक सेवाच आहे. आपणही त्याचपद्धतीने आपापल्या परीने इतरांच्या जीवनातले दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केल्यासआपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. काही तरी आपल्या जीवनात एक चांगले काम केल्याचे समाधान वाटेल.आपणही आपल्या जीवनाचे कलाकार आहोत.फक्त कोणती कला कुठे आणि कशी उपयोगात आणावी यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.आपले दु:ख सांगण्यापेक्षा इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.ही देखील एक सेवाच आहे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🍁🍃🌹🍃🍁🍃🌹🍃🍁🍃🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता - झोपडी* आज त्या माऊलीला मी कुढताना पाहिलं झोपडीच दार लावून हंभरडा फोडताना पाहिलं... वाट पाहीत बसते रोज कोवळ्या त्या कळीची आस खोटी मनी बाळगूनी दुःख दूर सारण्याची... बघती रोज स्वप्न ती झोपडीच्या अंगणात जगणे पार विसरुनिया गेली भान नाही अजिबात .... कोणाचेही दिसते पोर म्हणते ती आहे माझी म्हणते चल माझ्या लेकरा वाट पाहते आहे झोपडी तूझी... कस काय समजावे कळत नाही त्या माऊलीला पोर तिची गेली बळी ना परतणाऱ्या मार्गाला... गेली तिची आसव वाळून डोळ्यांना पडल्या तिच्या खाचा झोपडीच्या दारात बसते गूमसूम बंदच झाली तिची वाचा... *सौ. सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐 विचार करा 💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment