✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९४१ : दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला १९४३ : दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली १९६५ : क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले १९८५ : कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले २००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली 💥 जन्म :- १८७६ : अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १८९७ : जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १९१५ : दिनकर द. पाटील, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक. १९४६ : सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री 💥 मृत्यू :-  १९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अमेरिकेतील टेक्सास चर्चमध्ये गोळीबार, 27 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली घोषणा* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे : संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर व ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती निर्मला गोगटे यांना जाहीर* ----------------------------------------------------- 4⃣ *मॉस्को - रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात आंदोलन केल्याने पोलिसांनी 380 जणांना केली अटक* ----------------------------------------------------- 5⃣ *उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन  (आरकॉम)  कंपनी येत्या 1 डिसेंबरपासून 'व्हाइस कॉल सर्व्हिस' बंद करणार आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई* ----------------------------------------------------- 7⃣ *भारतीय महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक, अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत केली चीनवर मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========                  *स्कुल चले हम* दिवाळीच्या सुट्या संपल्या आणि शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रास आज प्रारंभ होत आहे. काही जिल्ह्यात महिन्याच्या एक तारखेपासून शाळा सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या सुट्यामुळे गेली 15-20 दिवस शाळा आणि त्याच्या परिसरात सुनसान होते. परंतु शाळा सुरु झाल्या आणि परत एकदा मुलांचा किलबिलाट सुरु झालेला आहे. दिवाळीच्या सुट्यात........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_5.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========               *भालबा केळकर* प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर (जन्म 23 सप्टेंबर 1920 - मृत्यू 06 नोव्हेंबर 1987 ) हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्ये आणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले . पीडीएतून लागू, तसेच जब्बार पटेल, सतीश आळेकर मोहन आगाशे इत्यादी मंडळी बाहेर पडली  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रगतीचा मार्ग चुकांच्या काटयाकुटयातून जातो  जो या काट्या-कुटयांना भितो त्याची प्रगती कधीच होत  नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  भारत व पाकिस्तान  यांच्यामधील सीमारेषेचे नाव काय आहे?* 👉     रॅंडक्लिफ रेषा *२)  ही रेषा कोणी निश्चित केली होती?* 👉     सर रॅंडक्लिफ *३)  ही रेषा कधी निश्चित करण्यात आली?* 👉    १९४७ मध्ये *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुलभा कुलकर्णी, मुंबई 👤 सुनंदा पाटील 👤 शैलेंद्र मनसबदार 👤 योगी वैद्य 👤 दीपक माली 👤 महेश बल्फेवाड 👤 पवन नानी, म्हैसा 👤 श्रीकृष्ण सोप्पारी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " माॅर्निंग वाॅक " आता गुलाबी थंडी पडू लागली आहे वाॅकिंग वाल्यांची संख्या वाढू लागली आहे गुलाबी थंडी आहे तोपर्यंत संख्या वाढते कडाक्याची पडली की मग अंथरूणात पडते    शरद ठाकर सेलू जि परभणी 📱 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *"जीवनसंगीत ऐका" असे अनेक विचारवंतानी सांगितले आहे. आपल्या ह्रदयाच्या गर्भगृहात होणारा महन्मंगल घंटानाद कुणाला ऐकू येत नाही. त्यामुळे इतरांच्या भावना-संवेदनांची बूज राखण्याचा भाग तर कोसो मैल दूर.* *पहाटेची मनरम्य प्रसन्नता आपल्या जगण्यात उतरली पाहिजे. रात्रीच्या वेळी ध्यानस्थ बसलेल्या आकाशस्थ चांदण्या म्हणजे मौनयोगाची सर्वोच्च घटना होय. तो 'मौनयोग' आपला 'जीवनयोग' होणे याचाच अर्थ 'जीवनसंगीत' ऐकणे. त्यासाठी गरज असते प्रामाणिक जीवनव्यवहाराची.* *आपल्याला आपल्या आत जाता आले पाहिजे, मग कुणाच्याही अंतर्मनात प्रवेश करणे शक्य होते. 'दु:ख हे फळ आहे' हे ज्याला कळले त्याचेच ह्रदय 'जीवनसंगीत' ऐकू शकते. त्याचीच स्पंदनवीणा जीवनझंकार निर्माण करते.*               •••●‼ *रामकृष्णहरी*‼●•••            🌴🌴🌴🌴🌴🌴     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चित्रांमध्ये जेव्हा अनेक रेषा,आकार आणि रंगछटा एकत्रीत आल्यानंतर जेव्हा एक सुंदर चित्र तयार होते तेव्हा त्याचा आनंद एकट्या चित्रकारालाच होतो असे नाही तर इतरांनाही कलेचा आनंद आणि आस्वाद घेता येतो.त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातल्या स्वत:च्या आनंदाबरोबर इतरांनाही सामावून घेतले तर तुमच्या आनंदात अधिक भर पडेल आणि अधिकची माणसेही आपल्यामध्ये जोडण्यासाठी मदतही ठरेल.आपला आनंद इतरांनाही द्या म्हणजे त्यांच्या जीवनात असलेल्या दु:खाचा विसर होण्यास मदत होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९० 🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बालगीत* गेली दिवाळी संपल्या सुट्या फस्त केल्या लाडू कंरज्या... चला रे माझ्या मित्रा दोस्ता शाळेत करुया आत्ता नवी मज्जा... कोणी मामा कोणी काका कोणी गेले आजोळी बाई मात्र आत्ता म्हणतील लिहा अनूभव चार ओळी... सगळ्यांच्या ऐकूनी रंजक गोष्टी गाली हसू येईल खूदकूनी वर्गातील हसऱ्या वातावरणाने आंनद दाटेल मनोमनी... चित्रे रंगवा कोडी सोडवा आपल्या घरचा आकाश कंदील बनवा दिवाळीच्या त्या प्रकाशाने आमचा वर्ग आज सजला... *सौ. सुचिता नाईक किनवट* 📱 9767513499 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                   *भगवान* एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment