✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/11/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला. 💥 जन्म :- १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म. १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आता शेतक-यांनाही समजलं आहे की पिकाची चिंता करायची असल्यास धरतीमातेची काळजी घ्यावी लागेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *आर्थिकदृष्टया सक्षम असतानाही आरक्षण मागणे ही माझ्या मते लाचारी आहे- सुशीलकुमार शिंदे* ----------------------------------------------------- 3⃣ *भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, देशातील बँकिंग सेवा सर्वांसाठी आहे. इस्लामिक बँक आणण्याचा कोणताही प्लान नाही- मुख्यात अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *औरंगाबाद : डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अभूतपूर्व गोंधळ* ----------------------------------------------------- 5⃣ *जकार्ता : इंडोनेशियामधील बाली बेटावरील एगंग पर्वतामधील ज्वालामुखीच्या हालचाली तीव्र वाढल्या असून, केव्हाही उद्रेकाची शक्यता रविवारी वर्तविण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणेः मेट्रो रेल्वे स्टेशनच्या उभारण्यासाठी शिवाजीनगर येथील धान्य गोदामे आणि पुरवठा विभागाची पाच कार्यालये येत्या आठ दिवसांत हलवण्यात येणार* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर कसोटी - तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेची धावसंख्या एक बाद 21, भारताकडे 384 धावांची आघाडी,  रोहत शर्माचे दमदार शतक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - सुंदर* त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं.  परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे.  कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गणेश वासुदेव मावळणकर* गणेश वासुदेव मावळणकर (जन्म २७ नोव्हेंबर १८८८ रोजी बडोदा येथे झाला असून मृत्यू २७ फेब्रुवारी १९५६ रोजी ) अहमदाबादहे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधूनलोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटीश भारतातील मुंबईप्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे वैमानिक कोण?* 👉 अमोल यादव *२) देशात ४८वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे पार पडणार आहे?* 👉 दिल्ली *३) मृत्यूंजय कादंबरीचे लेखक कोण आहेत?* 👉 शिवाजी सावंत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 गायत्री सोनाजे, साहित्यिक 👤 राहुल कुमार 👤 पंकज सेठिया 👤 ओंकार बच्चुवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वाभिमान* लाथ मारून काही स्वतःहून चूकतात ज्याच्या पुढे नाही त्याच्या पुढे झुकतात लाथ लागू दिली नाही तर झुकायची गरज काय स्वाभिमानाने जगायचे तर जपून टाकावा पाय शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *एप्रिल महिन्याच्या मध्यातून सूर्याच्या तापण्याला गती प्राप्त होते नि बघता बघता वैशाखात तो रौद्र रूप धारण करतो. मानवी जीवनच नाही तर प्राणी, पक्षी एकूणच सर्व जीवसृष्टी त्याच्या प्रखरतेने कासावीस होते. होरपळून निघणा-या वसुंधरेला मृगधारांचा ध्यास लागतो. सागाची गळलेली पानं, करपलेली धरा, वाळलेली झुडपं....मनाला एक प्रकारची विषण्णता देऊन जातात. दाहीदिशांनी अंगावर येणारा हा आगडोंब झेलीत जीवसृष्टी आपलं अस्तित्व वाचविण्याचा प्रयास करीत असते.* *भाजून निघालेली वनश्री एखाद्या पावसाच्या शिडकाव्यानं शांत होत नाही तोच अचानक पेटलेला वणवा तिला कवेत घेतो. तो विझवताना मानवी सामर्थ्य किती दुबळं आहे याची प्रचीती येते. वातावरणातील दाहकतेपेक्षाही प्रखर अनुभूतीचा हा वैशाखवणवा मनामध्ये चेतवून काळाच्या उदरात संदर्भहीन झालेल्या अनेक गोष्टींचं अस्तित्व भस्मसात होतं, परंतु त्याची आचही आपल्याला लागत नाही न दिसतो पेटलेला वणवा.* *' बुझा सका है भला* *कौन वक्त के शोले* *ये ऐसी आग है जिसमें* *धुंआ नही मिलता...'* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========    जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर, नांदेड*   संवाद.८०८७९१७०६३/९४२१८३९५९०. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= 🌺🌺प्रशंसा🌺🌺 प्रशंसा आवडे ना ऐसा व्यक्ती कोण हो जगात प्रशंसा केल्याविना देव पावतो का हो आम्हास देवादिकाची अभिलाषा तया प्रशंशेची ही आशा आमची जात माणसाची नको वाटे कधी निराशा एक प्रशंसाच खेळ करी नव्या बदलाचा बसे मेळ कधी चांगले कधी वाईट परिणामाची होईच भेळ प्रशंसा करता माणसाची तया आनंद मनी कितीक सारे काही जोशात करतो होई पक्के कामाचे बेशीक करावी प्रशंसा योग्यतेची नको दुराचारी दुष्कर्मची होईल बदल चांगला मग कास धरता सदा सत्याची पांचाळ आर. सी. हिंगोली 8180858079 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *उज्ज्वल भवितव्यासाठी* एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली. त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्‍या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्‍या मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला पैसा फुकट द्यायला !  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment