✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९३७ : जपानने शांघाय शहर जिंकले. १९४७ : जुनागढ भारतात विलीन झाले. १९९४ : डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध. २०१३ : सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८७७ : मोहम्मद इक्बाल, भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी. 💥 मृत्यू :-  २००३ - बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि. १९६२ : धोंडो केशव कर्वे, मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते.१९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रपरिषदेत केली.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमिला पार्कर यांचे भारतात आगमन* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : वीमा काढण्यासाठीही आता आधार कार्डची सक्ती, वीमा प्राधिकरणाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद चिघळला, सोमवारी सोलापूर बंदची हाक; सिद्धेश्वर भक्तांच्या बैठकीत धर्मराज काडादी यांची घोषणा* ----------------------------------------------------- 6⃣ *आशियाई महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने जिंकले सुवर्णपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सायना नेहवालला महिला एकेरीचे विजेतेपद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परावलंबी जीवन* समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. परावलंबी जीवनात कसल्याही प्रकारची प्रगती होत नाही. व्यक्ती आळशी बनतो, त्याला काही करावे असे मुळीच वाटत नाही. म्हणून स्वावलंबी जीवन जगण्याचा नेहमी........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धोंडो केशव कर्वे* धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२) महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी  महाराष्ट्रात  पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४ पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात, त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते . *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?* 👉 जन गण मन *२) हे राष्ट्रगीत कोणी रचले आहे?* 👉 रवींद्रनाथ टागोर *३) या गीतास राष्ट्रगीत म्हणून कधी मान्यता मिळाली?* 👉 २४ जानेवारी १९५० *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीपाद पटेल राउतवार, साहित्यिक मदनुर जि. निजामाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= "भूमिका " त्यांना भूमिका असू शकते आम्हाला नसू शकते का? त्यांची भूमिका दिसते तशी आमची दिसू शकते का? त्यांची भूमिका स्पष्ट दिसते तशी आमची दिसली पाहिजे प्रत्येकाची भूमिका शेवटी एकदम स्पष्टच असली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आयुष्यातील पहिल्या पंधरा, सोळा वर्षाचा कालावधी कमालीचा संवेदनशील असतो. या कालावधीत मुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असतात. शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आणि मानसिक विकासासाठी हा कालावधी महत्वाचा असतो. या दरम्यान मुलांसाठी सकारात्मक वातावरणाची पूर्तता करणे, ही पालकांची आणि समाजाचीही जबाबदारी असते. काही पालक त्यांच्या मुलांशी संवाद साधण्यात कमी पडतात. ए वन शाळा, काॅलेजात व क्लासमध्ये प्रवेश मिळवून देणे, आर्थिक बाबींची पूर्तता करणे, एवढीच जबाबदारी असल्यासारखे वागतात. स्वत: पैसे मिळविण्यासाठी धावत राहतात आणि मुलांवर आपल्या आपेक्षा लादून त्यांनाही आयुष्याच्या स्पर्धेत ढकलून मोकळे होतात.* *कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती किंवा दैनंदिन वाईट सवयी युवकांच्या नैराश्याला कारणीभूत ठरतात. नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षिले जाऊन वाईट सवयींचे शिकार बनतात. परिणामी सहका-यांशी, आई-वडिलांशी वाद होतात, त्याचे रूपांतर एकाकीपणात होते. एकाकीपण नैराश्याला निमंत्रित करते. नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची उत्सुकता विकसित करायला हवा. निसर्गाशी संवाद साधता यायला हवा. जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेऊन ती कृतीत उतरविणे जीवनात गरजेचे असते. विचार आणि आचार यांच्यात सुसंगती ठेवायला हवी. त्या त्या वयात सकारात्मक गोष्टी केल्याने व्यक्तिमत्व विकसित होते, आत्मविश्वास वाढतो, विवेकबुद्धी वाढते, निर्णयशक्ती वाढीस लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात..मन प्रसन्न करू..मोकळेपणाने बोलू आणि सकारात्मक होऊ.!* ••● 🍁 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍁 ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सुख आणि दुःख हे बरोबरच असतात.पण सुखासोबत दिवस कधी संपून जातात ते समजत नाही किंवा त्याचा कधी हिशोब ठेवणे नाही.पण नेमके दु:खालच्या बाबतीत तसे होत नाही.थोडे जरी दु:खूप झाले तरी त्याचा हिशोब आरडाओरडा करत लोकांना सांगत आणि स्वत: वेडेवाकडे तोंड करत सहन करत असतो.दु:खाचा जणू जगासमोर बाजारच मांडतो. सुखाचे तसे करत नाही.ते सहज कुणाला न सांगता एकटाच भोगत असतो.पण काही जरी असले तरी ते दोघेही जीवनात बरोबरीनेच राहतात हे विसरुन चालणार नाही.दोघांनाही जीवनात समानतेचा दर्जा आहे. कुणालाही कमी लेखू नये. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *माझी शाळा* मनापासूनी आवडते मला माझी शाळा कारण माझ्या शाळेत असते खडू आणि फळा... माझ्या शाळेत आहे हिरवी हिरवी बाग सुंदर अशा बागेत पक्षी गातात अनेक राग... माझ्या शाळेतील वर्गात आहे रंगरंगोटी छान तंत्रज्ञानाची धरुनी कास घेतो आम्ही नव नविन ज्ञान... दररोज नवोपक्रम उपक्रमात ज्ञानरचनावाद फरशीवरती करुनी रेखाटन शिक्षक देतात नवीन ज्ञान... कसली भिती ना अभ्यासाची चिंता हसत खेळत गिरवतो कित्ता रोज थोडे ज्ञानकण करुनी गोळा भयमुक्त आम्ही गाऊ यशाची गाथा... लिहा रे वाचा रे आता झाले कालबाह्य आपण सगळे मिळून शिकूया गाठूया आपले ध्येय ... उठावाच्या नकाशात दिसतात किल्ले क्षेत्रिय भेटीत दिसतात आपले जिल्हे परीपाठात नैतिक मूल्य जिल्हा परिषद माझी शाळा आहे अमूल्य... *सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक कवी व श्रीमंत माणूस* एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही. मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment