✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव. 💥 जन्म :- १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी. १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा. १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय. १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष. १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहांना भेटणार, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा* ----------------------------------------------------- 2⃣ *अहमदनगर: एसटी संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील चार हजार कामगारांच्या पगारातून २४ लाख रुपये एसटीने केले वसूल* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई: शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ कायम; आयटी मुख्य सचिवांच्या उचलबांगडीची शक्यता - सुत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : अखेरीस नाशिकच्या विमान सेवेला 15 डिसेंबरचा मुहूर्त, मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणार, केंद्र सरकारचे पत्र* ----------------------------------------------------- 5⃣ *सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना विमा संरक्षण द्या, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकीत ठराव मंजूर.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : ग्रंथालय कर्मचा-यांचे प्रश्न सोडवन्यासाठी राज्यात लवकरच होणार आंदोलन, विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या राज्य ग्रंथालय महासंघातील निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णीत, अपु-या प्रकाशामुळे भारताचा विजय हुकला, सामना थांबवला तेव्हा श्रीलंकेच्या सात बाद 75 धावा.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= पुस्तक - परिचय *' लखलखणारी शाळा '* लेखिका अनिता जावळे - वाघमारे वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_20.html प्रत्येक शिक्षकांनी हे पुस्तक वाचायलाच हवे एवढेच नाही तर एक वेळ या शाळेला प्रत्यक्षात भेट ही देण्याचा प्रयत्न करावा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*   9423625769 °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शंकर नारायण नवरे* शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना (जन्म : २१ नोव्हेंबर, १९२७ - २५ सप्टेंबर, इ.स. २०१३) हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. डोंबिवलीत झालेल्या २००३सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. ते डोंबिवलीत रहात. त्यांच्या पत्नीचे नाव अंजली, मुलाचे अरुण, सुनेचे जान्हवी. मुलगी राधिका, नातू शंतनू आणि पणतू ओम. वयाच्या ८६व्या वर्षी शं.ना. नवरे यांचे निधन झाले. अरुण आणि जान्हवी हे दोघेही ॲडव्होकेट आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे  लागते..*    *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो?* 👉.     ८मार्च *२). जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला  जातो?* 👉.    ८मे *३). जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो?* 👉       ८ सप्टेंबर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रशांत शास्त्री, बँक अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद 👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद 👤 इलियास बावानी, पत्रकार, माहूर 👤 विठ्ठल शिंदे 👤 शुभम सुर्या पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " मुकी  वेदना " प्रत्येकाचीच एक मुकी वेदना असते मुकी वेदना जपणे हिही साधना असते प्रत्येक वेदना कधीच बोलकी होत नाही बोलकी झाल्याशिवाय ती हलकी होत नाही    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.*    ••●🌷‼ *रामकृष्णहरी* ‼🌷●••            🌴🌴🌴🌴🌴🌴      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*           📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= पलिकडचा किनारा कधीच अलिकडच्या किना-याला भेटू शकत नाही.त्याचप्रमाणे जीवनात जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती कधीच भेटत नाही अशा गोष्टींबाबत आशा करणेही योग्य नाही.अशावेळी मनावर ताण आणून नैराश्यमय जीवन जगणे चुकीचेच आहे. आपल्याजवळ असलेल्या सुखाला दूर करुन दु:खाला आमंत्रण दिल्यासारखेच आहे.अशी जेव्हा जीवनात परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण दूर्लक्षच केलेले केव्हाही बरे.आशा करुन निराशा पदरी घेऊन जगणे हे चुकीचे आहे.जे आपणास शक्य आहे त्याचाच विचार करावा आणि त्याच मार्गाने मार्गक्रमण करावे म्हणजे जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद...९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *चंदन* चंदन आस चंदनाचा सुवास वेड्या मनास अंगीचा ताप होतो क्षणात लोप चंदन लेप चंदन शांती देतसे सर्व अंगा प्रिय ते जगा वेडावे जीव् चंदनाचे अंगणा विसावा मना फिरती जीव चंदनाचे भोवती असता भीती सांगवी किती चंदनाची महती सर्व जगात देह चंदन दरवळे सुवास कष्टाचा खास ध्येय सहाण झिजविता हे खोड सार्थ जीवन होऊ जगती चंदनाचे सांगाती देण्या सुवास -एकनाथ डुमने सावरगाव ता.मुखेड =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                  *सरळ रस्ता* एकदा एका अरब व्यापार्‍याने वाळवंटातून प्रवास करण्याकरिता आपल्या उंटावर बरेच सामान लादले. ते नीट घट्ट बांधून उंटाला जागेवरून उठवले. उंट मोठ्या कष्टाने उभा राहिला. व्यापार्‍याने उंटाचे तोंड गोंजारले आणि प्रेमाने विचारले: ''बोल मित्रा, आपण कोणत्या वाटेने जाऊया? टेकडीकडे चढण असलेल्या रस्त्याने की, टेकडीवरून उतार असलेल्या रस्त्याने?'' उंट मालकाच्या कानाला लागून म्हणाला: ''मालक आपण न्याल त्या रस्त्याने मला यायलाच हवे. परंतु आपण प्रेमानेच विचारता आहात म्हणून सांगतो. आपण आपले सरळ मार्गानेच जाऊया. सरळ मार्ग लांबचा असतो. परंतु त्या मार्गावर धोके कमी असतात.'' उंटाचे बोलणे खरोखरच शहाणपणाचे होते. अरब व्यापार्‍याने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे मान्य करून तो उंटासोबत चालू लागला.  *तात्पर्यः जो सरळ मार्गाने साधेपणाने चालतो तिथे धोके कमी असतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment