✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/11/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन. १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. 💥 जन्म :- १९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म. १९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म. १९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *संयुक्त राष्ट्रात भारताचा मोठा विजय, दलवीर भंडारींना मिळाली 183 मतं.आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड* ----------------------------------------------------- 2⃣ *झिम्बाव्बेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांनी दिला राजीनामा.* ----------------------------------------------------- 3⃣ *डोंबिवली - आगरी कोळी महोत्सवाला रिंगण सोहळ्याने सुरुवात, डोंबिवलीला प्राप्त झाले प्रति पंढरपूरचे स्वरूप, डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचे रिंगण.* ----------------------------------------------------- 4⃣ *जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे लक्ष्मण पाटील विजयी. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गटाचे उमेदवार प्रभाकर पवार यांचा पराभव.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुण्यात कंत्राटी बसचालकाचा संप, पीएमपीएमएलच्या 200 बसेस बंद.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : नवोदित शरीरसौष्ठवपटूंचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेचा थरार २४ नोव्हेंबरला लालबागमधील गणेशगल्ली येथे रंगणार, सुमारे २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत नोंदवला सहभाग*  ----------------------------------------------------- 7⃣ *चेन्नई : प्रदीर्घ कालावधीपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघत होतो, पण भारतीय कसोटी संघात स्थान मिळणे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरने व्यक्त केली* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर .................. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बोरिस बेकर* बोरीस बेकर 1990 के दशक के एक प्रमुख टेनिस खिलाड़ी थे। जर्मनी में जन्मे बेकर ने टेनिस जगत की चार सबसे बड़ी सालाना स्पर्धाओं (ग्रैंड स्लेम) में कुल 6 विजय प्राप्त की और अपने करिअर में कुल 49 प्रतियोगिताओं का फाइनल जीता। बेकर ने अपना पहला विंबलडन ख़िताब 1985 में 17 वर्ष की उम्र में जीता और इस तरह ये ख़िताब जीतने वाले वे सबसे युवा खिलाड़ी बने। बेकर का जन्म जर्मनी के लीमेन नमक गाँव में हुआ था। उसका माता का नाम लेिदय और उसका पिता का नाम रोबर्ट आंद्रेज मायेर है. वह उनके एकलौता पुत्र था। उसके मां और बाप कैथोलिक थे और उसे बी कैथोलिक धर्म के रूप से पाला था। उनके पिता एक आर्किटेक्ट थे और उसके पिता ने बलं-वेइस टेंनिस्कलुब टेनिस सेंटर बनाया था जहा पे बेकेर ने टेनिस खेल क़ो सीखा था।उन्होंने आठ वर्ष के उम्र से खेलना शुरू किया था। उन्होंने अपनी पढ़ाई दसवी कक्षा तक करके छोड़ दिया और वेस्ट जर्मन टेनिस फेडरेशन मै प्रशिक्षण लिया .  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा व्यक्ती शोधत असाल, तर स्वतःला आरशापुढे उभे करा तुम्हाला व्यक्ती शोधण्याची गरजच पडणार नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली?* 👉 २४ आक्टोबर १९४५ *२) संयुक्त राष्ट्र संघाचे किती सदस्य देश आहेत?* 👉 १९३ *३) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे?* 👉 न्यूयॉर्क(अमेरिका) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरुण पवार, सहशिक्षक 👤 पांडुरंग पुठ्ठेवाड, संपादक 👤 श्रीकृष्ण निहाळ, सहशिक्षक 👤 साईप्रसाद यनगंदेवार, सहशिक्षक 👤 मधू कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ======== *" शहाणे "* कधी कधी मुद्दाम वाद निर्माण करतात वाद निर्माण करून स्वतःचा गल्ला भरतात अशा पध्दतीनेही काही स्वतःचे गल्ले भरतात गल्ले भरणारेच आज इथे शहाणे ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं, हास्यविनोद करणं, भांडण करणं, रडणं, ओरडणं या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते, पण कधी कधी शब्दांपेक्षा शरीरभाषा तुलनेने आधिक प्रभावी ठरत असते. त्यातून 'शब्दांविण संवादु' या उक्तीप्रमाणे 'ये ह्रदयीचे ते ह्रदयी' भाव पोचवणं सहज साध्य होत असतं. या 'देहबोली'वरून समोरच्याच्या मनातील भावना समजून घेता येतात.* *अबोलपणे व्यक्त होणा-या देहबोलीत अनेक संकेत व संदेश दडलेले असतात. देहबोलीवरून समजून घेणं म्हणजे 'मनकवडा' असणं. समोरच्याची देहबोली ओळखून कोणाशी संबंध वाढवायचे व कोणाशी मर्यादित ठेवायचे हे ठरवता येते, सावध होता येते. ही देहबोली आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद साधता यायला हवा, निरीक्षण वाढवायला हवं. अनुभवाच्या आणि सरावाच्या कसोटीवर आपण समोरच्याची 'देहबोली' नक्कीच ऐकू व समजू शकू.* ~~‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼~~ ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते.ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही.उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही.जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधानी वृत्ती* एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी आजी राहते. त्या आजीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.' दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व आजीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' आजीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी आजीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.  थोडक्यात समाधानी वृत्ती ठेवून माणसाने आपले जीवन आनंदाने जगावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment