✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/11/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *बालदिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले. १९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला. 💥 जन्म :- १८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान १९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. १९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. 💥 मृत्यू :- १९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार. १९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣*भारतात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत घेत आहोत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 2⃣ *चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील कोर्धा जि. प. शाळेतील 26 विद्यार्थ्यांना चंद्रजोतीच्या विषारी बिया खाल्ल्याने विषबाधा. विद्यार्थ्यांना प्रा.आ.केंद्र नवेगांव पांडव येथे उपचार सुरू.* ----------------------------------------------------- 3⃣*मुंबई : मराठी, इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट वेळेवर सादर न केल्याने अनुकंपावरील अनेकांना सेवा समाप्तीचे आदेश केले रद्द, संचालक मंडळाचा सदरच्या लिपिकांना नोकरीत घेण्याचा निर्णय* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - हिवाळी अधिवेशानापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर कोर कमिटीची बैठक, पंकाजा मुंडे, विनोद तावडे, खडसे यांची उपस्थिती* ----------------------------------------------------- 5⃣ *लंडन : संसदेत नवा कायदा केल्यासच युनायटेड किंग्डमला युरोपीयन युनियनमधून बाहेर पडता येईल: ब्रेक्झीट सचिव डेव्हिड डेव्हिस* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-काश्मीर - हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोधमोहीम सुरू* ----------------------------------------------------- 7⃣*औरंगाबाद: सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाची दुसऱ्या डावात नऊ बाद १८७ अशी स्थिती; पंजाबची विजयाकडे वाटचाल* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू* http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.html वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. _चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_ _शब्दांकन :- नासा येवतीकर, धर्माबाद_ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आराम हराम है *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). जागतिक बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉. २० नोव्हेंबर *२) भारतात बालदिन कधी साजरा केल्या जातो?* 👉. १४ नोव्हेंबर *३). भारतात कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केल्या जातो?* 👉. पंडित जवाहरलाल नेहरू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुहास चटने 👤 सुभाष चंदने 👤 शीतल चौगुले 👤 खंडू सोळंखे 👤 योगेश पाटील बादलगावकर 👤 विनोद पांचाळ 👤 मोहन लंगडापुरे 👤 भारत शेळके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " सत्य " चूकीच दिसूनही त्याच्यावर बोलता येत नाही सत्याच्या मार्गाने सहज कोणाला चालता येत नाही सत्याच्या मार्गा वरून माणूस कसातरी चालतो काही सत्य टाळतो अन् काही काहीच बोलतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ? हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,* *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।* *बळेविण शक्ती। बोलू नये॥* *या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.* *संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!* ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसाच्या जीवनात कितीही सुख असले तरी तो सुखी नाही.कारण जास्तीच्या सुखाच्या मोहापायी आहे ते सुख सोडून त्यांच्या मागे धावण्याची जणू काही स्पर्धाच करत आहे.त्या मोहापायी आपण काय करत आहोत याचे भानही राहिलेले नाही.अशा वृत्तीने जर जीवनात जगण्याचा प्रयत्न केला तर सुखापेक्षा दु:खच अधिक भोगावे लागेल हे निश्चित. सुखासाठी आपले मन हे समाधानी असेल आणि अपेक्षा मर्यादित असतील तर आहे त्या सुखाचा आनंद जीवनात समाधानाने घेता येतो. * व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता -अ चे गाणे* अरे अरे अक्षरे अशी कुठ जाती अ चा अर्धा गोल अलगद खाली येशी अथक तूझ्या प्रयत्नाने अचूकता आली अविरत तूझ्या कार्याने अमूल्य अक्षरे वाचता आली अमूर्ताकडून मूर्ताकडे अशी तूझी वाटचाल असाध्य ते साध्य होई अतूल्य यश जीवनात येई *सुचिता नाईक किनवट* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्ञानाचा दिवा तेवत ठेवा* द्रोण जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोण स्वतः परम गुरु होते. मात्र त्या एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरहि अर्जुन भोजन करत राहिला अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही." तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment