✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार 💥 मृत्यू :-  १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिकृत सुत्रांची माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *इम्मर्सन म्नांगवा होणार झिम्बाब्वेचे नवे राष्ट्रपती, शुक्रवारी घेणार शपथ* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - प्लास्टिक बाटल्या परत घेण्याची व्यवस्था करा, अन्यथा सरसकट बंदी घालणार, राज्य सरकारचा प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आदेश* ----------------------------------------------------- 4⃣ *कर्नाटक विधानसभेने मंजूर केले अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक.* ----------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. रमजाण मुलानी यांची निवड.* ----------------------------------------------------- 6⃣ *सोलापूर : विठ्ठल- रूक्मिणी मूर्तीची पुरातत्व विभागाकडून पाहणी केल्यानंतर वज्रलेप करण्याचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *डोंबिवलीत भरणार फुलपाखरांच्या छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन : ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींच्या फुलपाखरे, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html जरूर वाचावे आणि आपले अभिप्राय द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *जगदीशचंद्र बोस* पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला.  स्नायू,  मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला.  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= काळजी केल्याने उद्याचे दुख: कमी होत नाही , तर आजच्या दिवसाची ताकत कमी होते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१). वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन कोणते?* 👉. ॲनिमोमीटर *२). भारतातील कोणते राज्य पर्वताचे राज्य म्हणून ओळखल्या जाते?* 👉. सिक्कीम *३). भारताची उद्यानगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखल्या जाते?* 👉 बंगलोर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 जुगलकिशोर बोरकर 👤 सुनील बंडेवार, धर्माबाद 👤 जगन्नाथ भगत 👤 आदित्य खांडरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " शाहू " चोर ते चोर वर शिरजोर आहेत सारं काही करून बिनघोर आहेत चोरी करून ते आम्ही तसे नाही म्हणतात शाहू असल्या सारखे राजरोस बाता हाणतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= स्वप्न पहायला परिश्रम,वेळ आणि पैसा कधीच लागत नाही परंतु पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी वेळ, परिश्रम आणि पैसा हा लागतोच तेव्हा कुठे स्वप्न पूर्ण होतात.केवळ स्वप्नांना कल्पनेत न ठेवता ती प्रत्यक्षात उतरावयाची असतील तर हे तुम्हाला करावेच लागेल.अन्यथा स्वप्न स्वप्नच राहतील. *व्यंकटेश काटकर नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *।। राष्ट्रीय प्रतिके ।।* मोर आपला राष्ट्रीय पक्षी त्याचे पंख किती नक्षीदार पावसाळ्यात नाचतो छान पिसारा फुलवितो डौलदार ।। कमळ आपले राष्ट्रीय फुल चिखल जेथे तिथे उगवतो कुठे पांढरा कुठे रंगीन असा हा प्रत्येकाला फार आवडतो ।। वाघ आहे आपला राष्ट्रीय पशू त्याला बघून होते सर्वांची थरकाप अंगावर आडव्या काळ्या पट्टया डोळ्यात दिसतो त्याच्या संताप ।। राष्ट्रीय फळ आहे आंबा त्याची चवच आहे न्यारी पाहुणे रावळे आले घरी  सरबराई करायला लई भारी ।। तिरंगा आपला राष्ट्रध्वज केसरी, पांढरा आणि हिरवा विविध रंगाचे आकर्षण प्रत्येकाना वाटतो हवाहवा ।। - नागोराव सा. येवतीकर प्राथमिक शिक्षक जि. प.प्रा. शाळा चिरली ता. बिलोली जि. नांदेड 9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========  . *यशाचे गमक* महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले. न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment