✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/11/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार. 💥 जन्म :- १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता. १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार. १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी. 💥 मृत्यू :-  १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस. १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्लस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावर 5 लाख रुपयांचे बक्षीस देणार - पर्यावरण मंत्री रामदास कदम* ----------------------------------------------------- 2⃣ *इजिप्तमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याचे वृत्त असून या हल्ल्यात 75 जण जखमी झाले आहेत* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेत नव्याने १००६ शेतक-यांचा समावेश, यापूर्वी ४१५८ शेतक-यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणेः पुढील दोन दिवस थंडी वाढणारः हवामान खात्याचा अंदाज.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे - पेट्रोलचे दर थोडे कमी करा - केन्द्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचे गिरीश बापट यांना आवाहन.* ----------------------------------------------------- 6⃣ *सावंतवाडी : केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष मंत्रालय देशात शंभर योग सेंटर उभारणार. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार - केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती.* ----------------------------------------------------- 7⃣ *नागपूर : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात श्रीलंकेच्या सर्वबाद 205 धावा. अश्विनचे चार बळी तर भारत 1 बाद 8 धावा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशवंतराव चव्हाण* यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे  संरक्षणमंत्री सुध्दा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. पंचायत राजची सुरुवात त्यांनी केली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल - कर्मवीर भाऊराव पाटील *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सिध्देश्वर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 पूर्णा नदी *२) येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 येलदरी *३) इसापूर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉 पैनगंगा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी सर्व शिक्षा अभियान, नांदेड 👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद 👤 शिवाजी पाटील कदम 👤 अंकुश बल्लेवार 👤 नरसिंग येनद्रालवार 👤 शिवलिंग गंटोड 👤 महेश मुधोळकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= " अडथळे " आपल्याच माणसां कडून कामात अडथळे असतात आपूलकी मिळवण्यासाठी पुन्हा तेच गळे काढतात लक्षात येत नाही नेमकं अडथळा आणतं कोण चालू माणसांना असतात गाडूळां सारखे तोंड दोन शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानी राहून अंध:कारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन प्रकाशमय जीवन जगणे हे केव्हाही चांगलेच आहे. शिक्षणामुळे जीवनाला जगण्याची नवी दिशा मिळते.आपल्यातला अज्ञानपणा, मनातली भीती नष्ट होऊन नव्या उमेदीने, नवचैतन्याने आपले जीवन योग्य दिशेने जगता येते. तसेच आपल्या मनातल्या आकांक्षांना योग्य आकार देण्यासाठी शिक्षणासारखे आश्रय दुसरे माध्यम नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अक्षरप्रकाश* उदार अंतकरणाने टाकावी पुस्तक कचराकुंडीत अन् लेखण्या भाजीमंडईत कचरा गोळा करणारे शिकावेत म्हणुन -- ज्ञानाची ज्योत घेवून जाव झोपडपट्टीत फुल्यांची सावित्री बनुन ज्ञानाचा झरा मिळाल्याचा आनंद , सर्वांच्या डोळ्यातुन सांडावा-- मानेवरचं जोखड फेकुन मानवी हक्कासाठी भांडावा -- मातीनं घ्यावा जातीचा सुड रुजलेली गुलामगिरी संपावी ओढावेत शब्दाचे आसुड-- अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या पावलांनी प्रकाशाकडे अन् विकासाकडे करावी वाटचाल-- पाझराव्या लेखण्या,अन् कोरे कागद व्हावे मालामालं ! स्वाती बंगाळे 8855908074 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एकीचे बळ* एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment