✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हुतात्मा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला. ● १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला. ● २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- ● १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :- ● १९४८ - राष्ट्रपिता महात्मा गांधी. ● १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक. ● २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. ● २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार. ● २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : शैक्षणिक शुल्क वाढल्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री अल्पसंख्याक राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्य रेल्वेच्या पहिल्या लोकलचे आज होणार उद्घाटन. ही लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवली जाणार आहे. त्यामुळे या लोकांची उद्घाटनाची फेरी ही पनवेल पासून सुरू होईल ते ठाण्यापर्यंत येईल. सीएसएमटी स्टेशनवरून रिमोट कंट्रोलद्वारे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जेएनयू आणि अलीगड विद्यापीठातील वादानंतर मुंबई आयआयटीने विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, नियमावली पाळणे विद्यार्थ्यांना बंधनकारक * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु हा त्यांचा अखेरचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : माहुल येथे स्थलांतरित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर आता पालिकेने विविध प्रकल्पांमुळे बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक परिमंडळामध्ये एक हजार सदनिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी आज आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकणार. पैलवान विजय चौधरी आणि कोमल भागवत यांचा विवाह आज सायंकाळी पावणेसहाच्या मुहूर्तावर नाशिकच्या गंगापूरमध्ये संपन्न होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा टी-20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. रोहित शर्माने खेळलेली तुफानी खेळी निर्णायक ठरली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *खेड्याकडे चला* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_25.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🐥 एक पाखरु...* - मनोहर बडवे... ✍ यवतमाळ... 9623728778 एक लहानसं पाखरू🐤... उडुन गेल भुर भुर.... वाट कुठं दिसेना... खुप फिरलं दुर दुर.... वरती खाली झेप घेई... तहान लागली घशाला.... आकाशाकडे चोच करुनी... पाणी विचारी सशाला🐹... मग दिसले एक माकड🐒 झाडावरती झुलत होते.... विचारुन पाहिला घरचा पत्ता... त्यालाही काही कळत नव्हते... आठवन येता मायबाप.... पंखामधी बळ येई..... झेप घेई उंच ऊंच... 🦅 दिसेल का कुठे आई...? पाखराला कळलं आता... घरट्या जवळच खेळावं.. मुळुमुळु रडु लागलं.. आता घरटं कसं शोधावं... 🏠 दुर ऊडन्याच्या हट्टाची... चुक त्याला समजली होती... घरट्याच्या प्रेमाची... किंमत आता कळली होती... आता त्याच्या पंखामधी... मायेचं बळ आलं होत... झेप घेता खुप ऊंच... आता घरटं दिसलं होतं....🏠 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *केरळ राज्याची बोलीभाषा कोणती ?* मल्याळम 2) *चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला ?* महाड 3) *महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) *पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* महाराष्ट्र 5) *फिरते न्यायालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?* महाराष्ट्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश पटकोटवार, मोबाईल टीचर       गटसाधन केंद्र, धर्माबाद 👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, 👤 सुरज एडके 👤 सतीश गणलोड 👤 शिवकुमार माचेवार 👤 अंकुश निरावार 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.*  *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••              🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *ऊबंटू चित्रपटातील प्रार्थना माणसाच्या जगण्यातील खरेखुरे मर्म* *सांगून जाते.* *हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी* *माणसासम वागणे.* *ज्या परिसरात आपण* *राहतो,वागतो,वाढतो तो परिसर त्याग करून चालणार नाही.तेथील प्रत्येक* *गोष्टीबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी.* *माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे हा* *संस्कार आहे.* *मला तळमळीने शिकवणारे शिक्षक,माझे मार्गदर्शक, माझे शेजारी* *पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर,माझा* *दूधवाला,पेपरवाला,सकाळी आठवणीने मेसेज पाठविणारे, कॉल* *करणारे, माझे वर्गमित्र, सहकारी कर्मचारी,नातेवाईक,* *ड्रायव्हर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा* *वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दल जाणीवपूर्वक* *कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का?* *विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक* *जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं* *आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक* *वस्तू, व्यक्ती,* *परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून* *त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता* *निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा* *प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून* *काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो* *संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात* *आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज रात्रीची* *शिटी वाजविणाऱ्या गुरखा पर्यंत सगळ्यांना* *ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून* *म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि* *रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा* *खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यू" म्हणण्याचा* *जाणीवपूर्वक प्रयत्न असतो.गंमत म्हणून अशा किती* *जणांना मी दिवसभरात "थँक यू" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन* *त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री झोपण्यापूर्वी* मी *काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही* *निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण* *एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख हा चढता* *असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो.* *या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा* *जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही* *मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका* *अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं* *जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व* *व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ गुरूपर्यंत प्रत्येकवेळी माझं थँक यू* *आपोआपच पोहोचतं ...* *मेसेज वाचल्याबद्दल.* *सगळ्यांना पुन्हा थँक्स,* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःचा विवेक जागृत ठेवून वागण्याची शिकवण* एकदा बुद्ध बाजारातून जात होते. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि बुद्धाना नमस्कार करून म्हणाली, “भगवान, येथील नगरशेठ तुमची सारखी निंदा-नालस्ती करत आहे. जर तुमची परवानगी असेल तर तो तुमच्याबद्दल काय म्हणाला ते सांगू का?” तेंव्हा बुद्ध म्हणाले, "प्रथम माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं दे आणि मग नगरशेठ माझ्याबद्दल काय बोलला ते ऐकायचं की नाही बघूया!” बुद्धाने त्या व्यक्तीला विचारले, “नगरशेठ माझ्याबद्दल जे बोलला ते सत्य आहे का? तेंव्हा ती व्यक्ती म्हणाली, " नाही भगवंत, मला तर त्या माणसाच्या बोलण्यावर थोडा देखील भरवसा नाहीये. तो बोलला म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय.” बुद्धांनी दुसरा प्रश्न विचारला, "तुला असं वाटतं का, की जी गोष्ट तू मला सांगणार आहेस त्याने मला दु:ख होईल?” तेंव्हा ती व्यक्ती म्हणाली, "हो भगवंत, तो माणूस जे बोलला त्याने तुम्हाला दु:ख होऊ शकतं." त्यानंतर बुद्धांनी शेवटचा प्रश्न विचारला, "तुला असं वाटतं का, की जी गोष्ट तू मला सांगणार आहेस ती माझ्या कामाची आहे किंवा त्यापासून मला काही लाभ होणार आहे?” ती व्यक्ती म्हणाली, "नाही भगवंत, ह्या गोष्टी तुमच्या कामाच्याही नाहीत आणि त्यापासून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही." तेंव्हा बुद्ध म्हणाले, " हे बघ माझं हृदय एका शांत सरोवरासारखं आहे ज्यामध्ये मी प्रेम, दया आणि करुणेची फुलं ठेवतो. ज्या गोष्टींवर तुझा स्वतःचा विश्वास नाही, जी गोष्ट ऐकल्यानंतर मला दुःख होईल आणि जी गोष्ट माझ्या कामाची नाही, व्यर्थ आहे अशा गोष्टी ऐकून मी माझं शांत सरोवररुपी हृदय विनाकारण मलीन का करू?" बुद्धाचे हे विचार ऐकून त्या माणसाला धडा मिळाला, की ऐकीव गोष्टींवर नुसताच विश्वास ठेवणं योग्य नाही, तर स्वतःचा विवेक जागृत ठेवून अशा निंदाजनक बोलण्यापासून लांब राहणंच उत्तम आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment