✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :- ● १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या. ● १९५९ - सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले. ● २०००-संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे हस्ते प्रकाशन. ● १९९८-डॉ सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट.पदवी प्रदान. ● १९५४-भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी 'भारतरत्न'पुरस्काराची स्थापना केली. 💥 जन्म :- ● १९५९ - किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६० - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. ● १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 19 रुपयांची वाढ, मेल आणि एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात कालपासून वाढ, तर रेल्वेची भाडेवाढ लोकल प्रवासाला लागू नाही * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खातेवाटपावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच, दोन महत्वांच्या खात्यासाठी काँग्रेस आग्रही, तर मतभेद नसल्याचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षात साईंच्या दक्षिणा पेटीत 156 कोटी 49 लाख 2 हजार 350 रुपयांचे गुप्तदान झाले आहे, गेल्या वर्षभरात साईंच्या झोळीत 290 कोटींचं दान, तीन कोटींची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत, देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात करण्याचा नवा ट्रेंड, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, गणपतीपुळे भाविकांनी फुललं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विजय मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती लिलावाद्वारे विकून कर्जाची रक्कम वसूल करा ; मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केंद्र सरकारनं चांद्रयान-3 ला मंजुरी दिली असून यावर काम सुरु असल्याची माहिती के. सिवन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ट्रायने जारी केलेल्या नव्या आदेशांनुसार आता १३० रुपयांमध्ये २०० चॅनेल्स पाहता येणार, आतापर्यंत १३० रुपयांमध्ये १०० चॅनेल्स पाहता येत होती. आता ती दुप्पट होणार आहे. १ मार्चनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाल कविता - चांदोबा* - राधिका बापट, डोंबिवली चंदेरी पांढरा गोल आकाशामधे असतो चांदोबा रे चांदोबा हा छान छानच दिसतो..१ पौर्णिमेच्या रात्री नभी संपूर्ण रुप साकार रोज तुझा रे बदले असा कसा हा आकार ?..२ चमचमत्या चांदण्या करतात लुकलुक तूच तेजस्वी सर्वात म्हण त्यांना.. टुकटुक..३ मामा..येतो भेटायला मी यानामधे बसून दाखवशील ना नक्की फक्त एकदा हसून..४ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रेवदंडा ( अलिबाग ) येथे होणारे 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष कोण ?* डॉ राजू कसंबे 2) *भारताचा पहिला व्हाइसरॉय कोण ?* लॉर्ड कॅनिंग 3) *सर्वाधिक उत्पन्न होणारे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे पीक कोणते ?* गहू 4) *साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इ. क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करू शकतो ?* 12 5) *'दि कॉल ऑफ स्पॅरो' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?* डॉ सलीम अली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद 👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद 👤 कविता जोशी, शिक्षिका 👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती 👤 महेंद्रकुमार पद्मावार 👤 मोगरे शंकर 👤 श्रीकांत काटेलवार 👤 आनंदराव धोंड 👤 गणेश दहिफळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.*  *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     💥💥💥💥💥💥💥💥💥      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *समाजाच्या वास्तव परिस्थिती लक्षात घेता काही गोष्टी अर्जंट पाहिजेत.* *एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,* *जो एकमेकांशी न* *बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा* *एकदा कनेक्शन जोडून देईल,* *एक ऑप्टिशियन पाहिजे,* *जो लोकांची दृष्टी आणि* *दृष्टीकोन नीट करून देईल* , *एक कलाकार पाहिजे,* *जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित* *हास्ययाचे रेषा रेखाटू शकेल* , *एक बांधकामगार पाहिजे,* *जो दोन शेजाऱ्यांमध्ये* *उत्तम सेतू उभारू शकेल,* *एक माळी काका पाहजे,* *जो चांगल्या विचारांच* *रोपण करू शकेल,* *एक प्लंम्बर पाहिजे,* *जो तुंबलेल्या मनांना* *मोकळं करू शकेल,* *एक शास्त्रज्ञ पाहिजे,* *जो एकमेकांबद्दलची* *ओढ शोधू शकेल,* *आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,* *एक शिक्षक पाहिजे,* *जो एकमेकांशी संवाद कसा* *साधायचा ते शिकवू शकेल,* *आज सर्वांना* *याचीच नितांत गरज आहे..!!* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परमेश्वराने आपल्याला या जगात इतर जीवापेक्षा वेगळा जीव जन्माला घालून काहीतरी आपल्या हातून चांगले कृत्य घडावे म्हणून पाठवले आहे.मनुष्यजन्म हा इतर जीवजन्मापेक्षा सर्वश्रेष्ठ जन्म आहे हेही आपण नाकारू शकत नाही.कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य घडावे,इतर जीवांना आपण आपल्यासारखाच जीव मानावा,त्यांची अवहेलना करु नये, संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जावे,आपण जशी सुखासाठी धडपड करत असतो मग इतर जीवांना का दु:ख द्यावे.परमेश्वराने सगळ्याच जीवांना समान जीव देऊन स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे त्यांचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये ही भावना आपल्या अंत:करणात सतत ठेवून जगायला शिकले पाहिजे,केवळ आपल्या स्वार्थासाठी जगणे नाही तर इतरांसाठी जगणे हा सर्वात मोठा उद्देश आपल्या मनुष्यजन्माचा आहे हे आपण लक्षात ठेऊन मनुष्यजन्माचे सार्थक करावे.ही मनुष्यजन्माची संधी पुन्हा प्राप्त होणार नाही.म्हणून मनुष्य जन्माला विशेष महत्त्व आहे.या चांगल्या, सुंदर जन्माला कलंक लागू न देता जीवन जगायला शिकले पाहिजे तरच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्यरुपी प्रतिनिधींचे कार्य पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल.नाही तर " आला जन्माला आणि गेला वाराला " असेच होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🌹🍃🍂🌹🍂🍃🌹🍃🌹🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *सहकार्याची भावना जागृत होणे* एका गावात _एक पोस्टमन_ पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, *"पोस्टमन ssssss"* आतून एका मुलीचा आवाज आला,. *"जरा थांबा, मी येतेय.."* दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, *"कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे.."* आतून मुलीचा आवाज आला, *"काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा,मी नंतर घेते.."* पोस्टमन, *"तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल."* पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. _दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती._ काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला. असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली.. तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज _पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय._ ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर _दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले._ नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन _एक सुंदर चप्पल_ जोड खरेदी केली. रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे _"दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी)_ मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? _बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे._ पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा" घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून _त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले._ दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे" साहेब म्हणाला,  "अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ? पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत." साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी? पोस्टमन म्हणाला "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे." _साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!_                                               *तात्पर्यः*  नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही.  तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment