✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७३-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हीतनामबरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले ● १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला. ● १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन. 💥 जन्म :- ● १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी. ● १९२६ - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक. 💥 मृत्यू :- ● ११९९ - याकुब, खलिफा. ● १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर, सरकारच्या 100 दिवसपूर्तीला रामललाचं दर्शन घेणार, खासदार संजय राऊत यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भंडारा : जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील आंबागड आश्रम शाळेचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आलाय. शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म न भरल्याने 34 विद्यार्थी परिक्षेपासून वंचित, यामुळे पालकांमध्ये संतापची लाट उसळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *27 जानेवारीपासून मुंबई 24 तास सुरु राहणार, नाईट लाईफच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी, मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड आणि फोटोची गरज, सरकारकडून नवीन नियमावली जारी, मुंबईत केईएम, नायर, कूपर हॉस्पिटलसह 15 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करणार * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार, बाजार समिती निवडणुकीमधील शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार रद्द, तर नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकच करणार, फडणवीस सरकारच्या निर्णयाला ठाकरे सरकारकडून ब्रेक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ. मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्माताई सतपलवार यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : राज्यातल्या शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा होणार असून त्यासाठी सरकार हालचाली सुरू केल्या आहेत. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- महाराष्ट्र केसरी सदगीर नाशिक पालिकेचा सदिच्छादूत, पालिकेकडून सदगीरला 3 लाखांचं बक्षीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांदोमामा चांदोमामा* सौ.आरती डिंगोरे, विषयसाधनव्यक्ती पं. स. दिंडोरी, जिल्हा नाशिक. चांदोमामा चांदोमामा येशील का? ढगांच्या गाडीतून नेशील का? ढगांची मऊ मऊ गाडी रे, हरणांची त्याला जोडी रे…….. ढगांच्या गाडीतून करेन हात, फिरूया आपण सारी रात…… चांदण्याच्या राज्यातून फिरायला, आवडेल तुझ्याशी खेळायला…… दंगा मस्ती धमाल गोष्टी, आकाशातून पाही हिरवी सृष्टी..... करूया गंमती विसरूनी भान, गाऊया गाणी छान छान छान…… सकाळ होताच सोडशील मला, आईच्या कुशीत लपायला….. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'आझाद हिंद फौज'ची स्थापना कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस 2) *'तुम मुझे खून दो, मै तुमहें आझादी दुगा' हे उद्गार कोणाचे ?* सुभाषचंद्र बोस 3) *'नेताजी' हे टोपणनाव कोणाचे आहे ?* सुभाषचंद्र बोस 4) *नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'देशभक्तांचा देशभक्त' असे कोणी म्हटले ?* महात्मा गांधी 5) *'जय हिंद' ही घोषणा कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष बोधनकर, नांदेड 👤 भालचंद्र गावडे, सोलापूर 👤 दिनेश चिंतावाड, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या मुलानं डाॅक्टर, इंजिनियर, मोठा उद्योगपती व्हावं, बख्खळ पैसा कमवावा आणि म्हातारपणांत सुखा-समाधानात जगता यावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण आपल्या मुलानं 'कवी' व्हाव, असं एकाही पालकाला वाटत नाही. कारण 'कविता' लिहीणं करिअरमध्ये बसत नाही. वकील, डाॅक्टर, इंजिनिअर यांच्यापेक्षाही जास्त समाजाला कवीची गरज असते हे आपण विसरतो.* *संत तुकारामांच्या काळात' सत्ता आणि संपत्ती' उपभोगणारे तेव्हांचे हजारो पाटील आज कुणाला माहीतही नाहीत; पण पाटीलकी सोडून कवितेच्या नादी लागलेले तुकाराम चारशे वर्षानंतरही जगभर सर्वांना अवगत आहेत. तुकारामांना जीवन कळलेलं होतं व पाटलांना व्यवहार. तुकारामांशिवाय आज आपण समाजाचा विचार तरी करू शकतो काय ? म्हणूनच केशवसुत म्हणतात.....* *आम्हाला वगळा गतप्रभ* *झणी होतील तारांगणे* *आम्हाला वगळा विकेल* *कवडीमोलावरी हे जीणे!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥✨ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *स्ववीर्य य: समाश्रित्य,* *समाह्रयती वै परान,।* *अभीतो युध्यते शत्रून,* *स वै पुरुष उच्चते।।* *ज्या व्यक्तीला स्वतःच्या शक्तीचा, ताकदीचा योग्य अंदाज आहे आणि* *त्यावरच अवलंबून राहून जो इतरांस आव्हान देतो आणि शत्रूशी* *प्राणपणाने लढतो,किंवा संकटे झेलून परतावून लावतो, तोच* *_खरा योद्धा वीरपुरुष म्हणणे योग्य होय!_* *काल अशाच दोन बाल योध्यांची वर्णी देशातील 22 मुलांच्या 2019 च्या* *राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित यादीत लागली.* *महाराष्ट्रात या 2 बाल वीरांना हा सन्मान मिळणार आहे.* *जो स्वतःसाठी जगला तो मेला,* *जो दुसऱ्यासाठी जगला तोच* *खऱ्याअर्थाने जगला असे म्हटले* *जाते. या दोन बहादुरांनी आपल्या* *प्राणाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचविले.* *या मध्ये ऑगष्ट 2018 मघ्ये मुंबईच्या परळ भागात एका 17 मजली* *इमारतीला आग लागली.यात 16 व्या मजल्यावर* *राहणाऱ्या 10 वर्षीय झेन सदावर्ते हिने शाळेत शिकलेल्या गोष्टींचा* *प्रत्यक्ष वापर केला. तिने सर्वांना धीर* *दिला,सुरक्षित स्थळी* *हलविले,विजेचा सप्लाय स्विच ऑफ* *केला,अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून पाचारण* *केले.हे सगळे इतक्या साहसाने आणि* *धाडसाने केले म्हणून तिला* *17 लोकांचे प्राण वाचविता* *आले.या धाडसाने तिला* *मुंबई करांनी डोक्यावर घेतले* *आणि भारत सरकारने हा पुरस्कार जाहीर केला.* *दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाळी या छोट्याशा गावातील* *आकाश खिल्लारे याने महिलेचा आरडाओरडा* *ऐकून तिकडे धाव घेतली. पाण्यात बुडत असलेल्या* *महिलेला आणि तिच्या लहान मुलीला जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी* *घेऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थ केली* *आणि दोघींचा जीव वाचविला.* *या शौर्याची महाराष्ट्रभर चर्चा आणि कौतुक झाले.* *आज काही लोक रस्त्यातील अपघात पाहून मदत न करता कायद्याच्या* *धाकाने तेथून निघून जाणाऱ्या अमानवी वृत्तीसाठी एक* *धडा आहे.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची  निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल. जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल.‌ *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भावस्पर्श* सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले, शामराव :- तू का रडत आहेस बाळ ? मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........ शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो. मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ). शामराव :- कुठे सोडू तुला ? मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाताला स्वर्ग आहे तिथे.  शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!! मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ??  शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वतः सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!! तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जी भावना स्पर्श करते तेच भावस्पर्श आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment