✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/01/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भारतीय प्रवासी दिन ● शहीद दिन - पनामा 💥 ठळक घडामोडी :-  ● १८५८ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली. ● १८८० - वासुदेव बळवंत फडके- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा. 💥 जन्म :- ● १९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ. ● १९२७ - रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक. ● १९३४ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- ● १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर  ● २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी  ● २००४ - शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्राच्या धोरणांविरोधात देशभरात कामगार संघटनांचा बंद, कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशकात कामगारांचा मोर्चा, मुंबईत या बंदचा फारसा परिणाम नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त, विमानातील सर्व 180 प्रवाशांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वाशिम, नंदुरबार, पालघर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झेडपीत राबण्याची शक्यता, अकोल्यात आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून भाजपची धुळधाण, तर धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेसला धूळ चारत भाजपचं निर्विवाद वर्चस्व* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं राजकारणात अधिकृत लाँन्चिग होणार, येत्या 23 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'छपाक'च्या रिलीजचा मार्ग मोकळा, सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून मागे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हानिहाय पालकमंत्र्याची यादी केली जाहीर, आ. अशोक चव्हाण नांदेडचे तर आ. बच्चू कडू हे अकोल्याचे पालकमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/orX5uTd2bzd8Jt9a9    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांदणे* - सावित्री गायकवाड/कांबळे उपशिक्षिका -शाळा दापोडी, ता. दौंड , जि . पुणे किती सुंदर चांदणे गोड भासे मज निळ्या नभाची निळाई पांघरून यावी नीज ॥१॥ नभी तारकांनी जणू वसविले नवे गाव वाट असेल कोठूनी त्याचा लागेल का ठाव ॥२॥ सूर्य ढगाआड लपे वर चांदोमामा आला आजी सांगूनीया गोष्ट घास भरवेल मला ॥३॥ ढगा वाऱ्यांच्या कुशीत चंद्र तारका खेळती मनोहर रूप त्यांचे मज खूप आवडती ॥४॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* कलहरी 2) *UNO चे महासचिव कोण आहेत ?* एंटोनिओ गुटेरेस 3) *आशियातील ताज्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव कोणता ?* वूलर तलाव 4) *भारतातील कोणत्या घटकराज्यास सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे ?* गुजरात ( 1600 km ) 5) *तिन्ही बाजूंनी पाणी व एका बाजूने जमीन असणाऱ्या भूप्रदेशास कोणती संज्ञा वापरतात ?* द्विपकल्प *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास अनिल देशमुख 👤 अजित राठोड 👤 भीमाशंकर भालेकर 👤 माधव नरवाडे 👤 राजेश रामगिरवार 👤 गजानन सोनटक्के 👤 माधव नरवाडे 👤 श्रीनिवास रेड्डी बाळापूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.* *स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👁👀👁👀👁👀👁👀 *--संजय नलावडे , मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *हे जगणे अवघड झाले आता* *सोन्याचा होता धूर,* *आता नुसत्याच उरल्या बाता।* *चकाकत्या खोट्याला कवटाळीती* *सगळे।* *सत्याला इथे वाली न कुणी आता।* *हे विदारक दृश्य आपल्याला समाजात* *पदोपदी अनुभवायला* *मिळते.* *पण अंतिम सत्य काही वेगळेच* *असते.24 कॅरेट लाच नेहमी कस* *लागतो.* *समाजात जो सरळ व सत्याने वागतो* *त्याला नेहमीच अन्यायाचे* *घाव सोसावे लागतात.* *कारण....* *जंगलात लहान मोठी,* *वाकडी तिकडी* *अशी अनेक प्रकारची झाडे* *वाढलेली असतात.* *परंतु अशी झाडे कोणीच* *तोडत नाही.* *पण जी सरळ वाढलेली असतात* *त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव* *सोसावे लागतात.* *रस्ता जर खड्डयांचा आणि कच्चा असला ना तर त्यावर लोड कमी* *असतो.पण तोच प्लेन आणि सुपर असुद्या सगळ्या गाड्या त्याच* *रोडवरून धावतील, त्याच्यावरच जोरजोराने आदळतील.* *तरीही निवड सत्याचीच करा.* *सगळ्यात महत्वाचे म्हणजे* *सत्य मेव जयते।* *सत्य परेशान होता है,पराजित नही।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रगती ही अधोगतीच्या विरुद्ध प्रवास करत असते आणि अधोगतीला मागे टाकून पुढे जाते.अधोगतीचे तसे नाही,कारण अधोगती ही प्रगतीला मागे खेचण्याचे प्रयत्न करते आणि कधी-कधी ती यशस्वीही होते.याचे कारण असे आहे की,माणसाच्या विकृत मनावर ती प्रथम आघात करुन आपल्याकडे खेचते त्यामुळे अशा विकृत मनाला चांगले करावेसे वाटत नाही त्यामुळे जेवढे काही करायचे ते वाईटच होते हे अधोगतीला माहीत आहे.पण माणसाने एक लक्षात ठेवायला हवे की,अधोगतीने पदोपदी अपमान होते,अपयश मिळते आणि जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.प्रगतीने यश प्राप्त होते,मन सशक्त होते, मनाला आशावादी आणि प्रयत्नवादी बनवते त्यामुळे माणसांमध्ये नवे काहीतरी करण्याची दिशा प्रगतीतून दिसायला लागते तसेच मान सन्मान मिळवून देते.म्हणून अधोगतीला कधीही आपल्या जीवनात स्थान देऊ नये. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य कार्यास शक्ती खर्ची घालणे* उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्‍वराने देवांवर कृपा केली आणि त्‍यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्‍यावर प्रत्‍येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्‍यातील प्रत्‍येक जण विजयाचे श्रेय स्‍वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्‍छ मानत असे. यामुळे देवतांमध्‍ये विनाकारण वाद चालु झाले. त्‍यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्‍वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्‍यातील वैमनस्‍य यांना पराजित करेल. ही समस्‍या सोडविण्‍यासाठी ईश्‍वर एक विशाल यक्षाच्‍या रूपात देवतांच्‍या समोर हजर झाले. देवतांनी आश्‍चर्याने त्‍यांना पाहिले आणि त्‍यांचा परिचय करून घेण्‍यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्‍यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्‍वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्‍वी अग्नि आहे. मी ठरवल्‍यास सारी पृथ्‍वी जाळून भस्‍म करून टाकीन.'' यक्षाने त्‍यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्‍यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्‍यासाठी गेले. तेव्‍हाने यक्षाने त्‍यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्‍हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्‍यांना उडवण्‍यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्‍यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्‍वराचा परिचय दिला. आता देवतांना त्‍यांच्‍या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्‍यांचा अहंकार नष्‍ट झाला.  तात्‍पर्य :- अहंकार आणि अहंका-याचे पतन निश्चितच होते. आपली शक्ती योग्‍य कार्याला लावल्‍यास सार्थक होत असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment