✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार. ● २००१-'आय एन एस मुंबई' ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली. 💥 जन्म :- ● १९३४-विजय आनंद,हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ● १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. ● १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ● १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट. ● १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक. ● १९७२-स्वामी रामानंद तीर्थ,हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित करण्यात आलेली 36 वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 28 जून 2020 रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत आणखी आठवड्याने वाढवून ती 29 जानेवारी 2020 अशी करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी घेतला मोठा निर्णय, शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडे यांच्याजागी रणजीतसिंह देओल यांची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वाडिया ट्रस्टमधील गैरकारभाराला राज्य सरकार आणि मुंबई महापालिकाच जबाबदार, ट्रस्टच्या कारभारावर संशय होता तर वेळीच चौकशी का नाही केली? हायकोर्टानं सुनावलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बाबासाहेबांचं स्मारक दोन वर्षात शक्य होईल, फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावं, इंदू मिल येथील कामाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांचं मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पहिली ते सातवी वर्गातील सर्व विषयांचं एकच पुस्तक, दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नवा प्रयोग, पहिली ते सातवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारची घोषणा; महाराष्ट्रातल्या 2 मुलांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार, झेन सदावर्ते आणि आकाश खिलारेची निवड, देशभरातील 10 मुलींचा आणि 12 मुलांचा पुरस्काराने होणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिऊताई* सौ. भारती सावंत, मुंबई चिऊताई चिमणी गातेस गोड गाणी बाळाला खेळवतेस उडतेस दूरच्या रानी घरट्यात पाखरांना भरवतेस चिमणचारा बांधलेस छानसे घरटे पिलांसाठीचा निवारा काडी काडी जमवून आणतेस कापूस मऊ बिछाना हा पिलांसाठी ठेवतेस त्यांतुन खाऊ गोलाकार सुंदर घरटे कशी गं बाई बनवतेस कुणी शिकवलेय तुला चोचीनेच ते विणतेस हल्ली मात्र चिऊताई कुठे सांगा बरं हरवली घरट्याला तिच्या आता कोणी उरला नाही वाली येशील का गं परतून चिऊताई खूप दूरवरून बाळाला माझ्या खेळव गोड चिव चिव तू करून *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कांगारूची भूमी' असे कोणत्या देशास म्हणतात ?* ऑस्ट्रेलिया 2) *ताग उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो ?* पश्चिम बंगाल 3) *'जगाचे छप्पर' कोणत्या प्रदेशास म्हणतात ?* पामिरचे पठार 4) *कापूस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* गुजरात 5) *'काळे खंड' असे कोणत्या खंडाला म्हणतात ?* आफ्रिका खंड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वप्नील ईबीतवार 👤 हरीश बल्केवाड 👤 महेश मुदलोड 👤 नरेश मुंगा पाटील 👤 हुशन्ना मुदलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *कसं होईल ह्या चिंतेत राहू नका *💯सगळं ठीक होणारचं* *ह्यावर विश्वास ठेवा* *रानात "तण" ,* *आणी मनात "ताण",* *कधीच ठेवु नये.* *रानातले "तण" पिकाचा "नाश" करते* *आणि* *मनातले "ताण"* *जगण्याचा "सर्वनाश" करते* *भारतातील कुटुंब व्यवस्था एकेकाळी जगातील सर्वश्रेष्ठ व्यवस्था होती.* *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता* *यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी* *प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत* *स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे.* *पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक* *रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे* *गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* *संस्कृतीचा सांभाळ करा,आपली माणस जपा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ?जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाते मैत्रीचे* एक खेकडा समुद्र किना-यावर फिरताना स्वत:च्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेव्हढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहुन खेकडा लाटेस म्हणाला, *"मी तर तुला माझी जवळची मैञिण समजत होतो आणी तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस."* त्यावर लाट म्हणाली , *"अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधुन पकडेल म्हणून मी नक्षी पुसली.."* मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे. नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.. कारण मैत्रीचे नाते हे अनमोल असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment