✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● गुरूचे आयो,युरोपा,गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओ ने दुर्बिणीद्वारे शोधले ● सर्व्हेअर' हे अमेरिकेचे यान चंद्राच्या 'टायको' या विवराकाठी उतरले ● १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. ● १९७२- कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले* 💥 जन्म :- ● १९२० - सरोजिनी बाबर - लोकसाहित्याच्या अभ्यासक. ●१९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. ● १९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका. ● १९५० - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता. ● १९७९ - बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री. 💥मृत्यू ● १९८९ - मिचियोमिया हिरोहितो - जपानचे सम्राट. ● २००९-अच्युतराव आपटे,स्वातंत्रसैनिक, *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 8 फेब्रुवारीला मतदान तर 11 फेब्रुवारीला निकाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: पाच दिवसांचा आठवडा करावा या आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या ८ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाला राज्य राजपत्रित महासंघाने पाठिंबा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भाजपची बाजी, जालन्यात मात्र माघार, तर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे सातारा महामार्गावरील  खेड- शिवापूर टोलनाका बंद करण्याची पुणे जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस, महामार्गाचं काम वर्षानुवर्षे रखडल्यानं निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मातोश्रीबाहेर ताब्यात घेतलेल्या आंदोलक शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांकडून दखल, महेंद्र देशमुखांना दादा भुसेंचं बोलावणं, तहसीलदारांसह बँक अधिकारीही बैठकीला, सकाळी ही तहसील कार्यालयात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठीच हवी...!  इंग्रजीत कागदपत्रे सादर केल्याने मुंबईत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचा संताप, अधिकाऱ्यांवर कागदपत्रे फाडून  फेकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धक्कादायक निकाल, गतविजेत्यासह उपविजेत्याचं आव्हान संपुष्टात, बाला रफिक शेख आणि अभिजीत कटके स्पर्धेबाहेर, सोलापूरच्या माऊली जमदाडेची बालावर मात, तर हर्षवर्धन सदगीरकडून अभिजीत चितपट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.            https://shopizen.page.link/CcLgnaoifdooGqG76 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाप* - श्रीकृष्ण उबाळे छाया असतो राया असतो बाप घराचा पाया असतो कीव असतो निव असतो बाप घराचा जीव असतो नाक असतो चाक असतो बाप घराचा धाक असतो मेवा असतो हेवा असतो बाप घराचा ठेवा असतो आन असतो मान असतो बाप घराची शान असतो बाप खरंच हळवा असतो बाप घराचा तळवा असतो *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय आहे ?* संसद 2) *घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल 3) *भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो ?* राष्ट्रपती 4) *राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात ?* सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 5) *प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात ?* राष्ट्रपती *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार       सामना, कुंडलवाडी शहर प्रतिनिधी 👤 सार्थक राजेंद्र बोडखे 👤 दीपक मालूसरे 👤 विश्वनाथ चौधरी 👤 अभय साबळे 👤 महेंद्र शिंदे 👤 विजय गायकवाड 👤 प्रथमेश घाडगे 👤 अशोकरावजी गावडे 👤 अमर नाईकवाडे 👤 वरद गजानन लोहेकर 👤 युवराज ढगे सौजन्य :- facebook Birthday Event *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पंडित होते. नावेतून रोज पलीकडच्या मंदिरात मंत्रोच्चार करीत देवदर्शनार्थ जात असत. नावाडी अडाणी होता. एक दिवस न राहून त्याने पंडितास विचारले,'तुम्ही रोज काय पुटपुटत असता, ते मला काही कळत नाही. सांगाल का? पंडित म्हणाले,'अरे मी संस्कृत मंत्र म्हणतो. तुला संस्कृत नाही येत? तुझं अर्ध आयुष्य वाया गेलं म्हणायचं.' हे ऐकूण नावाड्याला आपण आडाणी राहिलो याचे शल्य वाटत राहिले.* *असेच काही दिवस गेले. नदीला पूर आलेला. नावाडी नेहमीप्रमाणे पंडिताला पैलतीरी घेऊन निघालेला. नदीपात्राच्या मध्यावर असताना नावेची तळातील जीर्ण झालेली फळी पाण्याच्या जोराने उचकटली नि नाव बुडू लागली. नावाडी पंडित महोदयांना पाण्यात उडी टाका नि पोहायला लागा म्हणून समजावू लागला. पंडिताने विचारले,'पोहायचं म्हणजे काय करायचं?' नावाडी उडी टाकत म्हणाला,'तुम्हाला पोहायला येत नाही? मग तर तुमचं संपूर्ण आयुष्यच वाया गेलयं म्हणून समजा.'* *कोण ज्ञानी नि कोण अज्ञानी याचा आपण तपास करू लागू तर लक्षात येते की, प्रत्येक ज्ञानाचा संबंध जीवन जगण्याशी असतो. ज्ञान आहे, पण उपयोग नाही असे ज्ञान काय कामाचे? जीवनातील छोटी-मोठी कामे करणा-यांचे महत्व कमी झालेले नाही. समाजातील सर्व प्रकारची माणसे तितकीच महत्वाची असतात. ज्ञान हे पैसे मिळवायचे साधन की जगण्याची कला? याची फारकत होणे वर्तमानाची शोकांतिका आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -- 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आलोच या उघड्या नागड्या जगात* *जगायचेच आहे,तर जगा बिनधास्त* *कधी दोन देत तर कधी दोन घेत.* *जीवन हे संघर्षाचे मैदान आहे.इथं पदोपदी अपमान तर कधी सन्मान हा* *होतच राहणार.* *मग अपमानीत झाला तर मैदान* *सोडून जायचे का?नाही अपमानाला* *सुद्धा मानात परावर्तित* *करण्याची ताकद ठेवा.* *हार जीत तो बहादूर के किस्मत के दो सीतारे होते है। हे ध्यानात ठेवा.* *आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला बदलू शकतो.* *नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक कार्यासाठी वापर करणे, ही खूप मोठी* *ताकद आहे. याचे सुंदर उदाहरण पहा.* *टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता. तो विकण्याचा निर्णय* *टाटांनी घेतला. कार बिझनेस विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड* *कंपनीस भेटण्यासाठी गेले. त्याना विचारले गेले, तुम्हाला कार* *बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का सुरू केला?* *हा अपमान व त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले. टाटा कार युनिट न* *विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून* *टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला.* *पुढे काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड* *रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना योग्य उत्तर दिले.* *मग यातून आपण काय धडा घ्यायचा ते ठरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साखरेचा आकार आणि रंग कसाही असला तरी त्याची बाहेरुन आणि आतून असणारी चव ही गोडच असते.ती कधी चवीला आंबट,कडू, तुरट,खारट लागत नाही. त्याप्रमाणे माणूस दिसायला कसाही असू द्या.त्याच्या शारीरिक सौंदर्याचा संबंध नाही.परंतू त्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे स्वभाव हा आतून सुंदर असायला पाहिजे.तो इतरांशी आणि स्वत:च्या जीवनात कसा वागतो.तो सर्वांशी प्रेमाने, आनंदाने, निरपेक्ष भावनेने,मनात इतरांशी जळावू वृत्तीने न वागणे असा जर स्वभाव असेल तर नक्कीच माणूस साखरेसारखा गोड आहे असे समजेल आणि तसा असेल तरच तो सर्वांना आवडतो.केवळ वरुन गोड आणि आतून कडू असेल तर तो कधीच कुणाच्या हृदयावर राज्य करु शकत नाही.ते तेव्हाच कालबाह्य होऊन जातात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अरण्यातील सिंह* एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' तात्पर्यः स्वतःचे दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे असा जवळजवळ प्रत्येकाचा स्वभाव असतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment