✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. ● २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. ● २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- ● १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. ● १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी ● १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. ● १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार ● २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर, आर्थिक वर्षात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात, केंद्रीय अर्थमंत्री आज 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप सुरु, वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीसाठी संप, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं, दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोरोना व्हायरसचा धोका असलेल्या चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरुप, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती, चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाण्याच्या सिग्नलवर शिकणारी मुलं थेट इस्रोला जाणार, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावल्याने इस्रोमध्ये संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोरेगाव भीमा चौकशी आयोग कामकाज गुंडाळण्याच्या मनस्थितीत, राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचा माजी न्यायमूर्ती पटेलांचा आरोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कारांची घोषणा, या पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी म्हणजे दि. १० फेब्रुवारी रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सलग चौथा 'सुप्पर' विजय, शार्दुल ठाकूर, लोकेश राहुलची जिगरबाज खेळी, पाच एकदिवसीय मालिकेत 4-0 अशी आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *मला शिक्षक का व्हावं असे वाटते ?* बालपणी शाळेत शिकत असतांना मोठी माणसं हमखास एक प्रश्न विचारायचं की, तुला मोठे होऊन काय बनायचं आहे किंवा तुझं स्वप्न काय ? तेंव्हा त्या बाळबोध वयात काही कळायचं नाही. मात्र...... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचता येईल. https://shopizen.page.link/QNfw49ECPutfUpuX7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक* कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड 9423625769      ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌴🌳🌲झाडं बोलतात🌲🌳🌴 - प्रा. मीनल येवले , नागपूर मो. नं. 7774003877 झाडं बोलतात वाऱ्याशी आकाशातल्या ताऱ्यांशी झाडे अबोल नसतात कधी बोलत असतात साऱ्यांशी जगण्यासाठी फुलण्यासाठी पुरवून झाडे निकोप श्वास कंद , फळं , दाणे होऊन जीवमात्रांना देतात घास ऊन , वारा , वादळातही पाय रोवून उभी असतात पाखरांची इवली स्वप्ने झाडांच्याही डोळ्यात दिसतात हात पसरून कवेत घेतात मुक्त निळ्या नभाला मौनातून साद घालतात दाटून आल्या मेघांना माणसांसारखे द्वेष मत्सर झाडांमध्ये दिसत नाहीत फांदी तोडली तरी झाड कोणावरही रुसत नाही रंग , गंध सौंदर्याची वैविध्याची असती खाण सन्मानाने जगवू त्यांना टिकवू चांगले जीवनमान 🌾🌾🌾 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कोकणचा राजा' असे कोणत्या फळाला म्हटले जाते ?* हापूस आंबा 2) *पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?* भीमा 3) *भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?* कर्नाळा ( रायगड ) 4) *'महाराष्ट्राची काशी' असे कोणत्या नदीला म्हटले जाते ?* भीमा 5) *महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग प्रथम कोठे करण्यात आला ?* बारामती ( पुणे ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रा. यशपाल भिंगे मराठी विभागप्रमुख पीपल्स महाविद्यालय नांदेड 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख 👤 नारायण गायकवाड 👤 शिवानंद सूर्यवंशी 👤 कवी गजानन काळे 👤 अतुल भुसारे 👤 शिवम पडोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.* *देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.*  *"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."*       🔶 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔶             🔹🔹🔹🔹🔹🔹     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *अंधारा सारख्या संकटाला* *दोष देत बसण्याऐवजी* *एक ज्योत पेटवणयाचे धाडस दाखवले* *तरच अंधार दूर होईल* *आपल्या नशिबा पेक्षा* *कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा* *कारण उद्या येणारी वेळ* *आपल्या नशिबा मुळे नाही* *तर कर्तृत्वा मुळे येते.* *स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्शा उत्पन्न होत नाही* *आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्शेशिवाय कर्तृत्व घडत नाही.* *"महत्वकांक्षा" असल्याशिवाय* *माणूस "मेहनत"* *करित नाही आणि* *"मेहनत" केल्याशिवाय* *"महत्वकांक्षा" पुर्ण होत नाही...!* *ही जिद्द,महत्वकांक्षा पूर्ण केलीय ती* *मधु एनसी यांनी* *माणसाला एकदा ध्येयाने पछाडलं* *की, माणून त्या ध्येयाच्या* *हात धुवून मागे लागतो* *आणि यशस्वी होतो, याचं* *ताजं उदाहरण म्हणजे* *बेंगळुरूतील बस वाहक मधु एनसी.* *या बस कंडक्टरने केंद्रीय* *लोकसेवा आयोगाची* ( *यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली* *असून, त्याचे आयएएस* *होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.* *केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही म्हण मधु यांनी आपल्या कृतीतून अगदी सार्थ ठरवली आहे.* *बेंगळुरूच्या मेट्रोपोलिटीन टान्सपोर्ट सेवेत मधु* *बस वाहकाचे काम करतात. मधु यांची यूपीएसी परीक्षेतील मुलाखत* *२५ मार्च रोजी होणार आहे.* *८ तास नोकरी आणि ५ तास अभ्यास* *आएएस होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मधु यांनी* *चिकाटी कधी सोडली नाही. दिवसभर ८ तासांची नोकरी* *आणि दैनंदिन कामातून वेळ काढत ते दररोज ५ तास* *यूपीएससीचा अभ्यास करीत होते. कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा* *अनुत्तीर्ण झालेल्या मधु यांनी जिद्द सोडली नाही. यानंतर त्यांनी* *यूपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. गेल्या वर्षीच्या जून* *महिन्यात मधु यांनी यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली* *होती. ही परीक्षा त्यांना कन्नड* या *आपल्या मातृभाषेतून दिली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर* *त्यांनी मुख्य परीक्षेसाठी जोरदार तयारी केली* *आणि मुख्य परीक्षा इंग्रजी भाषेतून दिली. यूपीएससी परीक्षेसाठी मधु* *यांनी राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, नैतिक मूल्य,* *भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन या* *विषयांची विशेष तयारी केली. जानेवारी महिन्यात यूपीएससी* *परीक्षेचा निकाल लागला. त्या यादीत आपले नाव* *पाहिल्यावर मधु यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.* *मधु राज्यशास्त्र विषयात पदवीधर* *कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील मालावली या छोट्याश्या खेड्यात मधु* *राहतात. २९ वर्षीय मधु, कुटुंबात सर्वांत मोठे* *असल्याने घरची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन* *पडली. वयाच्या १९ वर्षी ते बस वाहक बनले. गरिबी आणि* *कठीण परिस्थितीशी दोन हात करत मधु यांनी आपले स्वप्न पूर्णत्वास* *आणले आहे. दूरस्थ शिक्षण प्रणालीतून त्यांनी आपले* *पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मधु यांनी राज्यशास्त्र* *विषयात पदवी संपादन केली आहे.* *मी कोणती परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो, याबाबत माझ्या* *पालकांना काहीच माहिती नाही. मात्र, मला मिळालेल्या यशाचा त्यांना* *आनंद झाला आहे. आमच्या घराण्यात एवढे शिक्षण घेतलेला मी* *एकटाच आहे, असे मधु यांनी सांगितले. परीक्षेचा अभ्यास* *करताना कामात कधीही कसूर केली नाही. कितीही गर्दी* *असली तरी सर्व प्रवाशांना तिकिटे मिळतील, याची खात्री केली.* *मुलाखतीच्या तयारीसाठी दररोज २ तास वेळ देत असून,* *मुलाखतही उत्तीर्ण होणार असल्याचा विश्वास मधु यांनी व्यक्त केला.* *आपणही प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखरावर विराजमान* *होऊ शकतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सूर्यासारखी तेजस्विता आणि सक्रीयता, चंद्रासारखी शीतलता आणि शांतता, धरतीसारखी संयमता व सहनशिलता हे जसे गुण या तिघांमध्ये आहेत तसेच गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपणही त्यांच्यासारखे आपल्या  जीवनामध्ये यशस्वी स्थान निर्माण करुन इतरांच्या जीवनात आपले अढळ स्थान निर्माण करु शकतो हे निश्चितपणे सांगता येईल. ह्या गुणांचे अनुकरन करणे म्हणजे आपल्या जीवनासाठी एक ऊर्जाच आहे.ती ऊर्जा आपण आपल्या जीवनात कधीही कमी होऊ देऊ नये. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590. 🌎🌞🌝🌎🌞🌝🌎🌞🌎🌞 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थीवृत्ती* एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.' तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment