✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/01/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 💥 जन्म :- ● १९६३-गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,क्रिकेटपटू भारत ● १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार. ● १८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार. ● १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. 💥 मृत्यू :- ● १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते. ● १९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात राज्यातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक झाले होते सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात 1 जूनपासून 'एक देश, एक रेशन कार्ड' योजना सुरु होणार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची घोषणा, एकाच रेशनकार्डवर देशात कुठेही खरेदी करता येणार धान्य, जुनंही रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचं समाधान, बेमुदत आंदोलनही मागे, तर कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या विकासाला विरोध नाही, भाजप आमदार राधाकृष्ण विखेंकडून स्पष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रिकल्चर व गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी दुबई इथं महाबीज परिषदेचे आयोजन करण्यात आलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सीएए, एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांकडून 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक, 35 संघटनांचा बंदला पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जगत प्रकाश नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शाहांकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, आगामी निवडणुकांचे जे पी यांच्यासमोर मोठे आव्हान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *U19 World Cup: भारतीय संघाची दमदार सुरूवात; श्रीलंकेवर 90 धावांनी मिळवला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *सैनिक : देशाचा संरक्षक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंदवन* *-प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* नागपूर *📞-९४२१८०३४९८ अंगणवाडी ही छान छान छान खुलून दिसते मुलांचे उद्यान सवंगड्यासंगे नित्य चाले खेळ सहज त्यांच्यात जुळे ताळमेळ खेळीमेळीतून घडे तन मन सात्त्विक घासाने फुलते जीवन *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " विश्वास म्हणजे माणसाला जीवंत ठेवणारी शक्ती होय " *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *युरोप व आशिया या खंडांना कोणत्या संयुक्त शब्दाने ओळखतात ?* युरेशिया 2) *जपानचे चलन कोणते ?* येन 3) *महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता ?* रत्नागिरी 4) *जगातील प्रथम कादंबरीकार लेखिका कोण ?* मुरासाकी शिकीबु 5) *कॉफी उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* कर्नाटक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवांश हेमंत गवळी 👤 विरभद्र बसापुरे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 संतोष हेंबाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 साईनाथ सायन्ना जगदमवार 👤 अनिल मुपडे 👤 ऋषिकेश पवार 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात! नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *एक कविमित्र अस म्हणतो की* *काय कुठे संपल्या वेदना ,* *पुन्हा नवा अवतार कशाला।* *जन्म दिला जर एकटीने,* *मग नेणारे हे चार कशाला।* *अतिशय विद्रोही पण समाज जीवनाचे* *वास्तव सत्य टिपायला तो* *घाबरला नाही.* *पण गाड्यांनो समाज तर माणसांनी* *बनला आहे,आणि* *आपल्याला त्यातच मोठे व्हायचे* *आहे, मग एक करा।* *खालील चिंतन करा.👇👇* ॥ *जो फक्त वर्षाचा विचार करतो ,* *तो धान्य पेरतो.* *जो दहा वर्षाचा विचार करतो ,* *तो झाडे लावतो.* *जो आयुष्य भरचा विचार करतो ,* *तो माणुस जोडतो.* *आणी जी माणस माणस जोडतात ,* *तिच आयुष्यात यशस्वी होतात.॥* ॥ *आपला दिवस आनंदात जाओ।।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगले विचार करणे,चांगले विचार करायला लावणे आणि चांगल्या विचारांचा योग्य ठिकाणी उपयोग करणे हे आपल्या बुद्धीचे काम आहे.आपली बुद्धी जर क्रियाशील असेल तर ह्या सा-या विचारांचा व्यवहार व्यवस्थितपणे पार पडतो.जर बुद्धीच काही काम करत नसेल तर सारे जीवन व्यवहारच ठप्प होतात. अशा बुद्धीला अधिक चांगले क्रियाशील ठेवायचे असेल तर प्रत्येक चांगल्या गोष्टींचे अवलोकन करणे.जे ज्ञात नाही ते ज्ञात करुन घेणे,जे आपल्या आणि इतरांच्या हिताचे आहे आणि त्याच्यापासून जगाचे कल्याण होणार आहे. या सा-या गोष्टींचे विचार सदैव करणे.अशा चांगल्या कृती करण्यासाठी आपल्या बुद्धीला सदैव चांगल्या विचारांचे खतपाणी घातले पाहिजे.अशा गोष्टी वृद्धींगत करण्यासाठी चांगल्या संस्काराचा  स्वीकार करणे,चांगल्या पुस्तकांच्या सहवासात राहणे,सज्जनांच्या सानिध्यात आणि जीवापेक्षाही जास्त प्रेम करणा-या चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिले की, आपल्या चांगल्या बुद्धीचा विकास अधिक जोमाने होऊ शकतो हे निश्चित. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद..9421839590. 📖📚📖📚📖📚📖📚📖📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःच्या कार्यसिध्दीतुन यश प्राप्त करणे.* *व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता,.* *ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे,.* *एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे,.* *यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल,.* *सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे,.* *हे जाणण्यास उत्सुक झाला..!* *बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल..!* *एवढं सांगताच एकच कल्ला झाला,.* *जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला,.* *काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून,.* *वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत,.* *असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही..!* *सर्व शांत झाल्यावर बॉसने सांगितले की,. शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल,. तोच विजयी ठरेल, असे मी बोललो,. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही..!* *तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर,.* *प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते..!* *तात्पर्य* :- *यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही,.* *इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो..!* *इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल..!स्वतःच्या कार्यसिद्धीतुन यश प्राप्त करणे म्हणजेच जिंकणे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment