✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/01/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते. ◆ १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले. 💥 जन्म :- ◆ १९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ◆ १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. ◆ २०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद, नागरिकत्वासह केंद्र सरकारने अलीकडेच पारित केलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात हा बंद आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुकारला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने आातपर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून दोन शहरं जवळपास सील करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराबाहेर पडण्यापासून बंदी घालण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *परभणी : पाथरीच्या साई जन्मस्थळाचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याने उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पाथरी साई जन्मस्थळ कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाकरे घराण्यातील आणखी एक चेहरा राजकारणात! अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देशासाठी पदके जिंकणाऱ्या व उच्च दर्जाच्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. मात्र, त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारणी नोकरी मिळत नाही, त्यामुळे येत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आपला पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रणजीतसिंह देओल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *खेलो इंडियात सर्वसाधरण विजेतेपद मिळवण्याची महाराष्ट्राची ही सलग दुसरी वेळ आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदा 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्य अशी 256 पदकांची केली कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *मुख्यालय* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_22.html कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शाळा माझे मंदिर ...* - भीमराव मुरलीधर सोनवने मु .पो .वासडी . ता .कन्नड .जि .औरंगाबाद . भ्रमणध्वनी .९४०४५४९७८८. शाळा माझे मंदिर शिक्षक माझे गुरू मी छोटा भाविक विद्धेचा वाटसरू... रोज शिकवी मला जीवनाचा परिपाठ शिक्षक माझे दैवत थोपटे माझी पाठ ... आई देई जन्म मला गुरु करी ज्ञानदान पवित्र वाचा माझी गाता विध्या गुण .... शाळा माझे धाम शाळा माझे तीर्थ शाळा माझी काशी शिकवी जीवन अर्थ ... ह्या ज्ञानपंढरीचा मी एक वारकरी अध्ययन पताका माझ्या खांद्यावरी .... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ऊस उत्पादनात भारतातील कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो ?* उत्तरप्रदेश 2) *'पाचूचे बेट' या नावाने कोणत्या बेटास संबोधतात ?* श्रीलंका 3) *जगातील सर्वात कमी तापमानाचे ठिकाण कोणते ?* वोस्टोक ( Antartik ) 4) *जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते ?* डेथव्हॅली ( अमेरिका ) 5) *जगातील विस्ताराने सर्वात मोठे बंदर कोणते ?* न्यूयॉर्क *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राहुल तांबे, मुंबई 👤 सोनू राजेंद्र येरमलवाड 👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी 👤 रेश्मा कासार, पुणे 👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी 👤 योगेश फत्तेपुरे 👤 दीपक पाटील, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *असताना कोणीही दान करील, नसतानाही दान करता आले पाहिजे. स्वत: भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दु:खं आपलं वाटणं म्हणजे संवेदनशिलता. ती उसनी नाही घेता येत, ती असायला हवी नि असते. ती जाणिवेतून येते. 'चमडी देगा लेकिन दमडी नही,' म्हणणारी माणसं नुसती कंजुष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वत:च्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो मग त्याची परिणतीही हिंसक होते. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे 'स्वविसर्जन' खरे उच्चकोटीचे दान.* *निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात' घेण्याची कल्पना ही जगातली सर्वोत्तम कल्पना म्हणायला हवी. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहित असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपुर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगाना दान चांगलेच पण.. त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु बनविणे लाख मोलाचे. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं,'त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937940* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मृत्यू अटळ आहे.हे मान्य करायला तयार असणारा माणूस लढणं सोडत* *नाही.* *आणि मृत्यूला घाबरणारा रडणं सोडत नाही.* *मग दोन्हीपैकी काय निवडायचे ते आपणच ठरवायचे.* *महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करित नाही. आणि मेहनत* *केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही…! आयुष्यात स्वत:ला* *कधी उध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक* *ढासळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत._* *ज्या दिवशी जबाबदारीचे आोझे खांद्यावर येते, त्या दिवशी थकायचा* *आणि रुसायचा अधिकार संपतो.* *दरवाजे छोटे ही रहने दो अपने दिल के, जो झुक के आ गया समझो वही* *अपना है ।* *आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक* *पाहिजेत.* *माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह* *करणं, कारण पुस्तकांचा* *संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह* *करण्यासाठी भावनांची.* *माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला* *पाहिजे. कारण बाह्यसौदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते* *पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या* *श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते.* *नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा, जे अनुभव भले कडवे* *देईल,* *पण अडचणीत तेच उपयोगी येईल.* *आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, मात्र मनाला स्पर्श करण्याची* *ताकद शब्दात असते.* *आयुष्य सरळ आणि साधं आहे,* *ओझं आहे ते फक्त गरजांचं.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली.जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो.तिथूनमात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो.हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले.मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर,आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका.पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका,इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांदा मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या.मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल.आपले जीवन अधिक सुसह्य होईल. *©व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment