✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००७- के जी बालकृष्णन यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. ● १९९६-पुणे-मुंबई दरम्यान 'शताब्दी एक्सप्रेस' सुरू झाली. ● १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. 💥 जन्म :- ● १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा. ● १९४९-राकेश शर्मा ,भारतीय अंतराळवीर ● १९१९- एम चेना रेड्डी,आंध्रप्रदेश चे ११वे मुख्यमंत्री,उत्तरप्रदेश चे माजी राज्यपाल 💥 मृत्यू :- ● १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा. ● २०११-प्रभाकर पणशीकर,ख्यातनाम अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं समारोप, विविध 20 ठराव मंजूर, संमेलनाध्यक्षांनी जेएनयुबद्दल घेतलेल्या भूमिकेवर एकही ठराव नाही, वादाचे विषय पूर्णपणे टाळले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोलकाता पोर्ट ट्रस्टला श्यामाप्रसाद मुखर्जी असं नाव केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्नाटक सरकारची मग्रुरी; सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना गावबंदी, महाराष्ट्रातील साहित्यिक निषेध सभा घेणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 6 जणांचं निलंबन, अरुण तोडकर, सुनंदा फुले, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, गणेश पाटील, मंगल पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांची कारवाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत फिरत असलेल्या पोलीस उपअधीक्षकाला अटक, पोलिसाच्या घरातून स्फोटकांसह हत्यारं जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतल्या परळमधील वाडिया हॉस्पिटल निधीअभावी बंद करण्याची प्रक्रिया सुरू, पालिका-राज्य सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या वादाचा रुग्णांना फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी महिला क्रिकेट संघात 15 महिला खेळाडूंची झाली घोषणा, टीम इंडियाच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर तर मराठमोळी स्मृती मनधाना उपकर्णधार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://shopizen.page.link/PYiBvfDGcdTtuSQg7        लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाद कुणाचे* - डाॅ. शरयू शहा, मुंबई. 9619013330 नाद कुणाचे ..कसे कोणते ? ऐक ..तरी तू .. काय भावते ? खळखळ खळखळ.. नदी वाहते झुळझुळ झुळझुळ जळी वाजते । सळ सळ सळ सळ..पान हालते खळबळ खळबळ ..मनी चालते ॥ सुर सुर सुर सुर ..कशी धावते कुरकुर कुरकुर ..खार चावते । भिरभिर भिरभिर फिरत राहते चुरु चुरु चुरु चुरु ताई बोलते ॥ छुम्..छुम् पैंजण ..छान वाजते हम..हम कपिला ..बघ हंबरते । छन् छन् नाणे, कसे घणघणते तन मन..कसले ..मग मोहरते ॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी 2) *स्वामी विवेकानंदाचे मूळनाव काय होते ?* नरेंद्रनाथ 3) *11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?* स्वामी विवेकानंद 4) *राजमाता जिजाऊ यांचा जन्म केव्हा झाला ?* 12 जानेवारी 1598 5) *छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव काय होते ?* राजमाता जिजाऊ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली 👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विजयकुमार चिकलोड 👤 बालाजी देशमाने *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.* *ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *प्रवाहात वाहून जाण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात वाहण्याची ताकद सुद्धा* *अंगी बाळगा.* *कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असतांना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.* *मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.... त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.* *सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.* *त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही.* *तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.* *यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. ' हेचि फल काय मम तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.* *कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.* *आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.* *शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ''लोक तर निसर्गाला पण नाव ठेवतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घराच्या दुसऱ्या मजल्यावर जेव्हा जातो तेव्हा आपले पहिले पाऊल हे पहिल्या पायरीवरच पडते आणि नंतर क्रमाक्रमाने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पायरीवर पडते. अशापद्धतीने एक एक पायरी चढत वरचा मजला गाठत आपले वरच्या मजल्यावर जाऊन थांबतो.एकदम दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर पाऊल टाकत नाही कारण एखाद्या वेळेस धपकन पडण्याची शक्यता असते.त्याचपध्दतीने एखादे काम पूर्ण करायचे असेल तर क्रमाक्रमानेच काम करावे लागेल.एकाएकी पहिल्याच प्रयत्नात ते अशक्य असते.कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही हाती घेतलेल्या कामात एकाएकी किंवा एकाच प्रयत्नात यश मिळेल असे नाही आणि अशी अपेक्षाही करु नये. आपल्याजवळ प्रयत्न, सातत्य,संयम आणि विश्वास ह्या चार गोष्टी असतील तर कोणतेही यश आपल्याला हुलकावणी देऊ शकत नाही किंवा आपल्याकडून कोणी ओढून घेऊ शकत नाही.त्यातून मिळालेले यश हे आपल्याला समाधान देणारे असते हे नक्की. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎋🎍🎋🎍🎋🎍🎋🎍🎋🎍 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट* *एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.* *एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.* *सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.* *राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...* *त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.* *मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.* *बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment