✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. ◆ १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. ◆ १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- ◆ १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :-  ◆ १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. ◆ १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. ◆ २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये 'व्हर्च्युअल क्लासरुम' उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) वतीने जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्सना नवे सुधारित दर जाहीर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम तातडीनं सुरू व्हावं, या उद्देशानं राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दहा रुपये थाळी योजनेचा शुभारंभ 26 जानेवारीला, प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार, गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत वाडिया प्रकरणावर तोडगा निघाल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा, वाडिया व्यवस्थापनाला 46 कोटी रूपये देण्याला संमती शर्मिला ठाकरे यांची माध्यमांना माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जेपी नडड्डा भाजपाचे नवे अध्यक्ष बनणार, 20 जानेवारी रोजी औपचारिक घोषणा होणार, जेपी नड्डा सध्या भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंचच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मुंबईतल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा दहा विकेट्सनी केला पराभव, या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *दुःखद बातमी :- प्रसिद्ध चित्रकार प्रमोद दिवेकर यांचे आज पहाटे झाले निधन, आज दुपारी बारा वाजता नांदेड येथे होणार अंत्यसंस्कार* फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली ........! ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा* https://m.facebook.com/story.php?story_fbid=1848046445322121&id=100003503492582 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांती* - सौ. रूपाली गोजवडकर जि. प. कें. प्रा. शाळा वाजेगाव ता. जि. नांदेड. तीळाची स्निग्धता नात्यात रुजावी गुळाची गोडी वाणीत पाझरावी. संस्कृतीची महती सर्वांनी स्मरावी भारतभूमी सदैव तेजाने उजळावी. संक्रांतीची संक्रमणे नित्यस्मरणात रहावी फिरुनिया पुन्हा मतमतांतरे न व्हावी. विसरूनी भेदभाव किल्मिषे सारी अंतःकरणी निरंतर प्रेमभावना जपावी. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शिलाँग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* मेघालय 2) *अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?* मेडल ऑफ फ्रीडम 3) *भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला ?* मादाम कामा 4) *गोबर गॅस ( बायो गॅस ) मध्ये कोणता वायू असतो ?* मिथेन 5) *'भारताचे पॅरिस' असे कोणत्या शहराला म्हणतात ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड 👤 नामदेव हिंगणे 👤 सलीम शेख 👤 बौद्धप्रिय धडेकर 👤 व्ही. एम. पाटील 👤 बालाजी ईबीतदार 👤 एकनाथ पावडे 👤 दत्ता बेलूरवाड 👤 कोमल ए. रोटे 👤 पंजाबराव काळे पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष  जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्‍यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?* *एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्‍याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-*          *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा*          *होतील संग्राम गीते पुरी।*          *देशार्थ होतील त्यागी विरागी*          *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"*  *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌟✨🌟✨🌟✨🌟✨🌟     *मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !!!*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आलोच या उघड्या नागड्या जगात* *जगायचेच आहे,तर जगा बिनधास्त* *कधी दोन देत तर कधी दोन घेत.* *जीवन हे संघर्षाचे मैदान आहे.इथं पदोपदी अपमान तर कधी सन्मान हा* *होतच राहणार.* *मग अपमानीत झाला तर मैदान* *सोडून जायचे का?नाही अपमानाला* *सुद्धा मानात परावर्तित* *करण्याची ताकद ठेवा.* *हार जीत तो बहादूर के किस्मत के दो सीतारे होते है। हे ध्यानात ठेवा.* *आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला बदलू शकतो.* *नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक कार्यासाठी वापर करणे, ही खूप मोठी* *ताकद आहे. याचे सुंदर उदाहरण पहा.* *टाटांचा पॅसेंजर कार उद्योग तोट्यात जात होता. तो विकण्याचा निर्णय* *टाटांनी घेतला. कार बिझनेस विकण्याच्या मिटींगसाठी फोर्ड* *कंपनीस भेटण्यासाठी गेले. त्याना विचारले गेले, तुम्हाला कार* *बनविताच येत नाही, तर हा उद्योग तुम्ही का सुरू केला?* *हा अपमान व त्यांचे शब्द रतन टाटांना झोंबले. टाटा कार युनिट न* *विकण्याचा निर्णय घेऊन ते परत आले. बरेच संशोधन व प्रयत्न करून* *टाटांनी स्वतःचा कार ब्रॅंड मोठ्या उंचीवर पोहचविला.* *पुढे काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय लक्जरी कार ब्रॅंड जग्वार आणि लँन्ड* *रोव्हर विकत घेऊन विदेशी कार कंपन्यांना योग्य उत्तर दिले.* *मग यातून आपण काय धडा घ्यायचा ते ठरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता* ‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment