✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣              ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब. १९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू. १९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान. 💥 जन्म :- १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री. 💥 मृत्यू :-  १९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान. १९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. १९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालावर ठाम, 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीमध्ये करणार आंदोलन* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - क्रिमीनल लॉ (घटना व दुरूस्ती) सुधारणा विधेयक 2018 लोकसभेत मंजूर* ---------------------------------------------------  3⃣ *औरंगाबाद- आंदोलनाला हिंसक वळण देऊ नये, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट* -------------------------------------------------- 5⃣ *शिर्डी - गुरुपौर्णिमेला साईचरणी कोट्यवधीचे दान, चार दिवसांत 6 कोटी 66 लाख रुपयांचे दान* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमाला 5 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, प्रो-कबड्डी लीगचा हा सहावा हंगाम असून तीन महिने सामने चालू राहणार* --------------------------------------------------- 7⃣ *कोलंबो : भारतीय युवा (19-वर्षांखालील) संघाचा श्रीलंकेतील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यातही दणदणीत विजय* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========           *नजर हटी, दुर्घटना घटी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोहम्मद रफी* मोहम्मद रफी हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी,भाषा, उर्दू, पंजाबी,  मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्यायआणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते. पुरस्कार आणि सन्मान - पुण्यात रफीच्या नावाची मोहम्मद रफी आर्ट्‌ फाऊंडेशन नावाची संस्था आहे. ती दरवर्षी अंदाज-ए-रफी नावाचा कार्यक्रम करते आणि एखाद्या गायकाला पुरस्कार देते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) स्वतंत्र भारताचे पहिले भू-दल सेनापती कोण होते ?* जनरल के.एम.करिअप्पा *२) कोणत्या नदीला 'बिहारचे अर्शू' असं संबोधलं जातं ?*        कोसी *३) झरिया हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ?*        कोळशाच्या खाणीसाठी *४) संम्पूर्णानन्द संस्कृत विश्‍वविद्यालय कोठे आहे ?*        वाराणसी *५) उद्याने, शेती आणि खाद्यान्न उत्पादने घेण्याच्या दृष्टीने केल्या जाणार्‍या कृषिव्यवसायाला काय म्हणतात ?*             मिर्श शेती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * नागनाथ इळेगावे * देवेंद्र लाड * प्रशिक नंदूरकर * मनोज बुंदेले * कैलास गायकवाड * दिलीप सोळंके * प्रीतम नावंदीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========       *सुगंध* ईर्षा असणारा स्वतःची महानता सांगत असतो सुगंध असो की दुर्गंध  आपोआप पांगत असतो  मी चांगला म्हणायची सुगंधाला आवश्यकता नाही  निरीक्षणाने समजतात की गोष्टी ब-याच काही    शरद ठाकर  सेलू जि परभणी  8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.*  *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.*      •••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•••            🌷🌷🌷🌷🌷         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= संकटकाळात आपल्या मदतीस सर्वात प्रथम धावून येणारा जर कोणी असेल तर  तो म्हणजे आपला जीवलग मित्र.मित्राशी आपले मैत्रीचे नाते अगदी जीवाभावाच्या पलिकडे असते.कौटुंबिक नाते हे जरी रक्ताचे असले तरी मैत्रीचे नाते आपण निर्माण केलेले असते.या मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखाची जवळीकता साधलेली असते.ती निरपेक्षवृत्तीनेच जोपासलेली असते.कोणत्याही कामासाठी कुठलाही विचार न करता पहिल्यांदा आपण आपल्या ओठांवर नाव असते ते मित्राचे.इतरांवर आपण विश्र्वास एकवेळ ठेवणार नाही, परंतु मित्रावर अधिक विश्वास ठेवतो.मित्रही अशीच निवडायचे की,तो आपल्या जीवनात कधीही,कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी तो आपल्या मदतीला धावून आला पाहिजे आणि आपण त्याच्या मदतीला धावून गेले पाहिजे.मैत्रीमध्ये व्यवहार हा नसतोच.असतो तो एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन त्यातून सोडवण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे करण्यासाठी.अशाच मित्रांशी मैत्रीचे नाते जोडून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवून मैत्री या नात्यात अतूट संबंध प्रस्थापित करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.तरच मैत्रीच्या नात्याला अर्थ प्राप्त होईल.स्वार्थापुरती मैत्री काही कामांची नाही किंवा अशा स्वार्थी नात्याला मैत्रीही म्हणता येणार नाही *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========           *संपत्ती - Wealth* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                 *घामाचा पैसा* धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.  *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment