✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 02/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००० - मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड. २००१ - ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण. २००२ - स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला. २०१० - काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९२८ - नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार. १९३२ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा. १९६३ - सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. १९९६ - राजकुमार, हिंदी अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेची प्रशंसा* ----------------------------------------------------- 2⃣ *केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ* ----------------------------------------------------- 3⃣ *अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ, अनुदानित सिलेंडरच्या दरात २.७१ पैसे वाढ तर ५५.५० पैशांनी विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे* ----------------------------------------------------- 4⃣ *एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांचा २०१६ ते २०२०च्या वेतनकराराला राज्य सरकारने दिली मंजुरी* ----------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के* ----------------------------------------------------- 6⃣ *जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे अमरनाथ यात्रेवर अस्मानी संकट* ----------------------------------------------------- 7⃣ *दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने तुल्यबळ प्रतिस्पर्धी इराणचे आव्हान ४४-२६ असं मोडून काढीत पटकावले विजेतेपद* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= तीन लेख एकाच पानावर वाचा *प्लॉस्टिक बंदी, शिक्षकांचा काय दोष, निरोगी जीवनासाठी योग्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://dainikyashwant.com/epaper/edition/239/july/page/4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुळ खाण्याचे फायदे* रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही. रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात. सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो. गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील. गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो. गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= भविष्य उज्वल त्यांचे आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दुसरी गोलमेज परिषद कधी पार पडली ?* १९३१ *२) भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर कोण ?* कार्निलिया सोराबजी *३) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?* आयसीआयसीआय *४) एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरूण महिला कोण ?* डिक डोमा *५) देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण ?* अजित डोवाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शिवानंद सिध्दप्पा चौगुले, विशेष कार्यकारी अधिकारी, चिंचवड 👤 विक्रांत दलाल, नांदेड 👤 पंडित दगडगावे,सहशिक्षक, धर्माबाद 👤 श्याम जाधव 👤 सतीश संजू 👤 शैलेश तरले 👤 वसंत घोगरे पाटील 👤 श्रीनिवास पुल्लावर 👤 जेजेराव सोनकांबळे 👤 चिमणाजी हिवराळे 👤 मारोती जाधव 👤 साईनाथ सावंत 👤 बाबू हातोडे 👤 शिवा पांचाळ 👤 गोपाळ पामस्कर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *आदेश* आदेशावर आदेश कृतीचा पत्ता नसतो त्याच त्या आदेशांचा पुन्हा पुन्हा कित्ता असतो आदेश मिळाला की काम व्हावे जोमाने आदेशाला महत्व येते केलेल्या कामाने शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.* *शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, नकाराकडून सकाराकडे जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण हे जीवनाला आकार देण्याचे, संस्कारक्षम बनवण्याचे, यश मिळवून देण्याचे,समाजात मानसन्मान मिळवून देण्याचे आणि जीवन समृध्द करण्याचे काम तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ देण्याचे काम शिक्षणच करते. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणासारखा दुसरा कोणताही दिशादर्शक आणि प्रभावी मार्ग नाही. म्हणून शिक्षणप्रवाहात नेहमी असायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रभावी - Effective* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वासाचा सुगंध* चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?'' चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.'' *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment