✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड. १९६४ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६६ - मलावी प्रजासत्ताक झाले. १९६७ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले. 💥 जन्म :- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक. १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष. १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार. १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते . १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. १९३९ - मनसूद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी. २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर: आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 3⃣ *मुकेश अंबानींकडून जिओ फोन-2 ची घोषणा; नव्या फोनमध्ये चालणार व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि यु ट्यूब* ----------------------------------------------------- 4⃣ *डॉ. वि.ल.धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता, तर रायगडमध्ये पुढील 4 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता. हवामान विभागाचा इशारा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिट, अंधेरी येथील दुर्घटनेनंतर मनपा आणि रेल्वे प्रशासनाला आली जाग* ----------------------------------------------------- 7⃣ *इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन - भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चीनच्या चेन युफेई कडून पत्करावा लागला पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========                   *नटसम्राट* कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर याच्या काव्यात्म, प्रगल्भ प्रतिमेतून साकारलेली एक उत्तुग शोकात्मिका. नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाटकाचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पहिला फॅक्टरी अँक्ट कोणी बनवला ?*            लॉर्ड रिपन *२) 'पद्मावत' हे काव्य कोणी लिहिलं आहे ?*             मलिक मुहम्मद जायसी *३) रक्त गोठण्याला कोणतं व्हिटॅमिन सहाय्यक ठरतं ?*         व्हिटॅमीन के *४) क्लोरोफ्लुरो कार्बनचं वैज्ञानिक नाव काय ?*            फ्रेऑन *५) जेनेटिक्सचे पितामह कोणाला म्हणतात ?*         ग्रेगर जॉन मेंडेल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष मानेलू, सहशिक्षक, धर्माबाद 👤 सुभाष इमनेलू 👤 व्यंकट चन्नावार 👤 मोहन भूमकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अशोक इमनेलू,सहशिक्षक, धर्माबाद 👤 शंकर सोनटक्के, सहशिक्षक, धर्माबाद 👤 साजीद शेख,सहशिक्षक, बिलोली 👤 शिवाजी जिंदमवार, सहशिक्षक, नायगाव 👤 आबासाहेब उस्केलवार, सहशिक्षक, धर्माबाद 👤 श्रीकांत पुलकंठवार 👤 अतुल बागडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 शंकर स्वामी 👤 मधुकर कांबळे 👤 अरफत इनामदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *खोटं पण रेटून* चारचौघात बोलायचं खोटं पण रेटून गुपचूप पाय धरायचे अंधारात भेटून अंधारात पाय धरलेले जगाला दिसत नाहीत चारचौघात बोललं म्हणून कोणी मोठे असत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जर विहिरीमध्ये खारट पाणी असेल तर वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले, तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल.* *तसेच ज्याला 'निंदा' आवडते त्याच्या अंत:करणामध्ये निंदेची घाण असणारच, निंदा करणे हिन पणाचे लक्षण आहे. जर आपण निंदा बंद केली, अभिमान टाकला आणि अंतर्मुख होऊन भगवंताचा शोध घेतला, तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या अंत:करणाची परिक्षा होते. आपल्याकडे अशी म्हणच आहे की -* *"जे आडात आहे तेच पोह-यात येणार."* ⛳ *॥ रामकृष्णहरी* ॥ ⛳ 🌻🌻🌻🌻🌻🌻         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्या मनात दुस-यांचे वाईट व्हावे आणि आपले चांगले व्हावे अशी भावना ठेवून काम करत असेल तर ते कदापिही त्या कामात यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या मनात कधीही कुणाविषयी मनात वाईट विचार किंवा वाईट भावना ठेवून काम करण्याचे ठरवले तर ते पहिल्यांदा आपलेच बिघडून जाते. त्यापेक्षा नेहमी आपल्या मनात आपलेही काम चांगले व्हावे आणि आपल्या कामाबरोबरच इतरांचेही काम चांगले व्हावे अशी शुद्ध भावना मनात ठेवली तर ती व्यक्ती आपल्या जीवनात सदैव यशस्वी तर होतोच. इतरांच्या बाबतीत आपल्यासारखा सदैव विचार मनात ठेवला तर जीवन सुखावहच होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी -इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिवृष्टी - Heavy rain* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आत्मविश्वास* एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती. तात्पर्य- आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment