✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८७३: मुंबई शेअर बाजार सुरू झाला. १८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली. १८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे केली. १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली. २०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला. २०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती. 💥 जन्म :- १६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन १७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ १८१९: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होव १९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी १९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त १९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन १९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर १९३८: हिंदी अभिनेते हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार १९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो १९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट १९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर २००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शाळांत यापुढे मुलांना छडी न मारण्याचे, कोणतीही शिक्षा न करण्याचे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत.* ----------------------------------------------------- 2⃣ *10 जुलैला मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा.. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेडमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज* ----------------------------------------------------- 3⃣ *विधानपरिषद निवडणूक : भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख उमेदवारी अर्ज उद्या मागे घेण्याची शक्यता, अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होणार* ----------------------------------------------------- 4⃣ *अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस, नगर शहर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर आणि सुप्यात पाऊस, तर जामखेड, श्रीगोंद्यात ढगाळ वातावरण* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : अमळनेर येथील अंबर्षी टेकडीवर ११११ वृक्षांची लागवड करण्यात आली.* ----------------------------------------------------- 6⃣ 'हीट मॅन' रोहित शर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-20 लढतीत इंग्लंडवर सात विकेट्स राखून मिळविला विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *तुर्की - विश्व चॅम्पियन चषक स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्टिक दीपा कर्माकरने सुवर्णपदक जिंकले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *पोशाख म्हणजे व्यक्तीची ओळख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://epaper.ejanshakti.com/m5/1728108/Mumbai-Janshakti/09-07-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========    *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१)  महाराष्ट्राचा कोणत्या खनिज साठ्यात भारतात प्रथम क्रमांक लागतो?* 👉     मॅगनीज *२)  मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय?* 👉     मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु *३)  दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?* 👉     सिंकदराबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीकृष्ण राचमाळे 👤 घनश्याम सोनवणे 👤 साईनाथ विश्वब्रम्ह 👤 बाबुराव नरवाडे 👤 अनिल उडतेवार 👤 पंडीत पवळे 👤 गौतमीपुत्र वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========     *डावपेच* राजकारणात प्रत्येकाच वेगळा डाव असतो आपणच भाग्यविधाते असलाच आव असतो पडद्या आड केलेले डावपेचही लक्षात येतात अंधारातले डावपेच एक दिवस उजेडात येतात    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी जीवन अनमोल आहे. पण ते फुकट मिळालेलं आहे. न मागता आणि फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत कुठे असते ! आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीनं. दिवस येतात, जातात. जीवन मात्र अडगळीत असतं. खरंतर माणूस जगतो कशासाठी? तर जगण्यासाठीच ! जीवन जटील नाहीच. पण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच का हरवून बसतो आपण? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत... त्याचं वैभव, त्याची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो. माणूस वयानं जसजसा वाढू लागतो, तसतसा एक मुखवटा चढत राहतो त्याच्या चेह-यावर. साध्यासुध्या आयुष्यात किती भटकतो आपण जगरहाटीच्या वाळवंटात ! एवढं सुंदर जीवन हातात असताना झूटया भविष्याची झूल पांघरून चालतो. ही झूल कधी पद-प्रतिष्ठेची तर कधी धनदौलतीची असते.* *माणूस धावत राहतो अखेरच्या श्वासापर्यंत. सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत रहायचं. मन कधी तृप्त होत नाही. समृद्धही होत नाही. या धापाधापीत जीवन वजा होतं आणि माणूस खंगतो. जीव गुदमरून टाकणा-या या चढाओढीत सिकंदर होता येईल माणसाला, डोक्यावर सम्राटाचा मुकुट असलेला. पण जगण्याचे सोनेरी क्षण कुठे हातात असतात ! काळ मोठा कठोर असतो. मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा मुकुट उतरवून ठेवावा लागतो आणि सोबत रिकाम्या हातांचे प्रायश्चित्त असते. सारा अहंकार गळून पडतो. या शेवटच्या प्रवासात एकाही पावलापुरता सुखशांतीचा सिकंदर नाही होता येत माणसाला.*    ••●♦‼ *रामकृष्णहरी* ‼♦●••     🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========        सर्वसामान्यपणे माणसाच्या मनाला भुरळ पाडणा-या काही गोष्टी आहेत.त्या मनाला विचलीत करतात,त्याच्याबद्दलचे आकर्षण अधिक वाढते,नात्यात कधी दूरावा आणतात किंवा द्वेषही निर्माण करतात.त्या गोष्टी म्हणजे पैसा, संपत्ती, सौंदर्य आणि गर्व ह्या आहेत.या गोष्टी आपल्या मनाला विचलीत तर करतातच त्यासोबत आपल्या आयुष्याची दिशाही बदलून टाकतात.म्हणून शक्यतो यापासून जास्त मोहात न पडता दूर राहिलेलेच बरे.या गोष्टींचा अतिरेक व्हायला नको.अतिरेक झाला तर आपल्याला जीवनातून हद्दपार करण्यास कारणीभूत ठरु शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========          *गर्व - Pride =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========      *क्रोधाला संयमाने जिंकणे* एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’ तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment