✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले. १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले. १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले. १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला. १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली. १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली. १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली. १९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला. १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले. १९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली. १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील. १९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले. १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले. २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर. २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले. 💥 जन्म :- १८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल १८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ १९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी १९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद १९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार १९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती 💥 मृत्यू :- १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त १९७२: अभिनेत्री गीता दत्त १९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली १९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस २०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची सरकारतर्फे करण्यात आली घोषणा* --------------------------------------------------- 2⃣ *महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन' ! प्रवास भत्ता तिपटीने वाढला, अधिवेशानात सुधारणा विधेयक एकमताने करण्यात आला मंजूर* --------------------------------------------------- 3⃣ *राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना मोदी सरकारच्या बाजूने करणार मतदान* --------------------------------------------------- 5⃣ *शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात, राज्य सरकारकडून विधेयकाला विधानसभेत मंजुरी. शनैश्चर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 ला मंजुरी.* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : शरीरसौष्ठवपटूंचे आश्रयदाते असलेल्या प्रशांत आपटे यांची महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड* --------------------------------------------------- 7⃣ *हॉकीच्या पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर एडमंड हिलरी* सर एडमंड हिलरी हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली. एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरिक्त त्यांनी स्नो-कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला. त्यांनी हिमालयातील साहस मोहिमांबरोबर तेथील लोकांसाठी अनेक कल्यणकारी प्रकल्प हाती घेतले आहेत. एडमंड हिलरी हयांचे भारताशी आणि भारतीयांशी अतूट नातेदेखील जोडले आहे. त्यांनी काही काळ भारतात 'हायकमिशनर' ह्या पदावर काम केले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात - गौतम बुद्ध *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भीमबेटका गुहा कोठे आहेत ?* मध्य प्रदेश *२) सामान्यत संसदेची किती अधिवेशने असतात ?* तीन *३) आशियायी खेळात पदक मिळवणारी पहिली भारतीय स्त्री कोण ?* कमलजीत संधू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * साईनाथ माळगे, प्र. केंद्रप्रमुख, धर्माबाद * व्यंकट चिलवरवार, सहशिक्षक * श्रीराम भंडारे * लक्ष्मण दावणकर * जय माचेवाड * बजरंग अर्गेलू * ज्ञानेश्वर कोकरे * दिनेश राठोड * राहुल लोखंडे * गंगाधर पालकृतवार, सहशिक्षक * नितीन पवार * साईकुमार ईबीतवार * दत्तात्रय तोटावाड * रवींद्र पांडागळे * मोहन कुलकर्णी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक प्रश्न* जगावरचा अन्याय हल्ली स्वतःवरचा वाटू लागतो जगाशी भिडण्यासाठी कोणाशीही खेटू लागतो जगाचं दुःख होईल पण माय बापाचं काही नाही जागतिक प्रश्न सोडवत हे फिरतात दिशा दाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मुंबईतच प्रवास करीत असताना रिक्षा सिग्नलला थांबली. बाजूच्या रिक्षात एक बोकड शांतपणे बसला होता. त्याच्या शेजारचा माणूस निर्विकार होता. 'विश्वासघात' हा असाच शांतपणे बसलेला असतो. समोरच्याला कल्पना नसते, आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे. बोकडाला काय माहीत? आपला कर्दनकाळच आपल्या शेजारी बसला आहे.* *आयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपल्या आजूबाजूला शांतपणे वावरणारी माणसेच आपल्याला अडचणीत आणत असतात. विश्वासघात, फसवणूक, खोटे बोलणे या सगळ्या गोष्टी अनेकजण सराईतपणे करत असतात. ठेच लागल्यावर आपल्याला कळते, कुणामुळे जखम झाली आहे. राजकारणात, समाजात, व्यक्तिगत आयुष्यातही सर्रासपणे असे घडते. माणूस हतबल होतो, अनेकदा माणसे त्यातून सावरत नाहीत. "अशावेळी शांतपणे आपली मनोवृत्ती स्थिर ठेवणे गरजेचे असतं."* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की, आपल्या जीवनात कोणत्याही बाबतीत हार मानायची नाही किंवा माघार घ्यायची नाही. कारण आपण ज्या गोष्टी साध्य करणार आहोत त्या गोष्टींसाठी मनात जिद्द ठेवून आणि यश मिळविण्याचे लक्ष आपल्यासमोर ठेवून समोर येणा-या आव्हानाला प्रयत्नाने आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने साध्य करण्यासाठी सज्ज झालात तर यश हे तुमच्यापासून कधीच दूर जात नाही. तुमच्या मनात हारण्याचीदेखील भावना स्पर्श करणार नाही. सदैव तुम्ही दिवसेंदिवस यशाकडेच मार्गक्रमण करत राहणार. पण तुमच्या मनाचा थोडा जरी आत्मविश्र्वास कमी झाला तरी तुमच्या यशस्वी जीवनामध्ये बाधा निर्माण करुन तुम्हाला तुम्हीच अपयशाला कारणीभूत ठरु शकाल हे मात्र नक्कीच. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संकल्प - Resolution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सदशिष्य* एकदा गुरुजी यात्रेसाठी जायला निघाले. त्यांचे हर्षल व गौतम नावाचे दोन शिष्य होते. जातांना त्यांनी दोघांनाही पाच पाच चणे दिले व ते जपून ठेवण्यास सांगितले व गुरुजी यात्रेला निघून गेले. हर्षलने ते चणे व्यवस्थित कागदाच्या पुडीत बांधून डबीत ठेवले. गौतमने ते चणे घेतले व तुळशी वृंदावनात टाकुन दिले. हर्षल रोज गुरुजींनी दिलेले चणे नीट आहेत की नाहीत बघून त्यांची पुजा करत असे. गौतम मात्र जेथे चणे टाकले होते नित्य नियमाने पाणी देत असे. सात आठ दिवसांत तुळशी वृंदावनात चण्यांची छान रोपं झाली. दिवसागणीक रोपं वाढली व त्याल चणे लागले. गौतमने ते चणे काढले व दुसर्‍या मोठया कुंडीत टाकले. नित्य नियमाने तो रोपांना पाणी टाकत असे व त्यांची काळजी घेत असे. आता ह्या वेळेला चणे बरेच। व निघाले. गौतमने ते चणे काढून पुन्हा शेतात टाकले. हळूहळू करता करता पाच चण्यांचे पोतंभर चणे झाले. एक दोन वर्षाने गुरुजी परत आले. दिलेल्या चण्यांबद्दल विचारले. हर्षलने पुजेत ठेवलेली चण्याची डबी उघडली व चणे गुरुजींच्या हातावर ठेवले. गौतमने पोतं आणून गुरुजींच्या पुढे ठेवलं, गुरुजी खुष झाले. गुरूजी हर्षलला म्हणाले 'जपून ठेवण्याचा खरा अर्थ गौतमला उमगला. तु मात्र नुसतीच पुजा करत राहिलास आतले चणे किड लागून खराब ही झाले असतील'. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment