✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣          ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  २००६ - इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार. २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार. 💥 जन्म :- १९७३ - पार्श्वगायक, सोनू निगम. 💥 मृत्यू :-  १९९४ - मराठी साहित्यातील कथा लेखक शंकर पाटील *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशवासियांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावे, पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४६ व्या 'मन की बात ' मधून जनतेशी साधला संवाद* --------------------------------------------------- 2⃣ *मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलक तरुणांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.* ---------------------------------------------------  3⃣ *अपघातातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेणार, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती* --------------------------------------------------- 4⃣ *उत्तर प्रदेश : मुसळधार पावसामुळे 65 जणांचा मृत्यू, 57 जण जखमी* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : जिल्ह्यातील २४ शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक फौजदारी कारवाईच्या कचाट्यात. बोगस पटसंख्या दाखवून शासकीय योजना लाटल्याचा आरोप* --------------------------------------------------- 6⃣ *भारताच्या स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अखेर नावावर केला* --------------------------------------------------- 7⃣ *Russian Open Badminton 2018 : भारताच्या सौरभ वर्माने यंदाच्या मौसमातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक जनशक्ती मध्ये प्रकाशित लेख *अध्ययन निश्चिती तपासणी मोहिम* http://epaper.ejanshakti.com/m5/1755626/Mumbai-Janshakti/30-07-2018#page/4/1 पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========                 *सुलोचना दीदी*  मराठी चित्रपटातील सात्विक, सुंदर, सोज्वळ नायिका, आई, वहिनी, जिजाबाई म्हणजे अभिनेत्री सुलोचना दिदी. वहिनीच्या बांगड्या, माझं घर माझी माणसं, अन्नपूर्णा, एकटी, मराठा तितुका मेळवावा असे कितीतरी मराठी चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने सजवले. हिंदीमधल्या अनेक हिरोंची आई त्यांनी पडद्यावर साकारली.आज ३० जुलै २०१८  सुलोचना दिदींचा ९० वा वाढदिवस आहे.आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ७५  वर्षं पूर्ण होत आहेत. हा एक सुंदर योग आहे. अतिशय साधं, निगर्वी, समाधानी कृतार्थ व्यक्तिमत्त्व म्हणजे सुलोचना दीदी. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला आहे ?*            स्वित्झर्लंड *२) चोल राजघराण्याचा संस्थापक कोण ?*                           राजा विजयालय *३) एफटीआयआयच्या संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?*             भूपेंद्र कँथोला *४) 'महिलांना मग-२१ विमान उडवण्याची भीती वाटते' असे विधान करणारे खासदार कोण ?*         अर्जुन राम मेघवाल *५) यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या मराठी गायकाचे नाव काय ?*           महेश काळे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागनाथ इळेगावे 👤 सचिन गादेवार 👤 प्रवीण कॅटरवाड 👤 विजय कुऱ्हाडे 👤 प्रियांका घुमडे 👤 शेख नवाज 👤 निलेश कोरडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========      *उमेद* ध्येय तेच गाठतात  ज्यांच्यात उमेद आहे  ध्येय गाठणे अशक्य  जर वागण्यात भेद आहे ध्येय गाठायचे तर  उमेद असली पाहिजे  खडतर प्रयत्ना मध्ये   कुरकूर नसली पाहिजे   शरद ठाकर सेलू जि परभणी  8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ?  बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!* *कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?*  *" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "*   •••●💥‼ *रामकृष्णहरी*  ‼💥●•••                🚩🚩🚩🚩🚩🚩         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनात येणारी वेळ आणि येणारी संधी ती येणारच. तिची वाट पाहत बसू नका. कारण तिच्या वाट पाहण्यात आजचा वेळ वाया घालवू नका. आजचा वेळ जर तुम्ही वाट पाहण्यात घालवला तर तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होणार नाही. विनाकारण तुमचा वेळ वाया जाईल आणि हातात घेतलेले काम अर्धवटच राहील. येणारी संधी ही संधीच राहील एखाद्या मृगजळासारखी. म्हणून आज घेतलेले काम मन लावून पूर्ण करा आणि ते काम बाजूला सारा. जेव्हा तुमचा तुम्हाला काम झाल्याचा पूर्ण विश्वास होईल तेव्हा उद्याची वेळ आणि संधी तेवढीच तुम्हाला चांगल्या यशाकडे आणि पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रेरीत करेल. अन्यथा यशाऐवजी अपयशाकडे नेण्यासाठी आपणच कारणीभूत होऊ शकतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========         *अर्धवट - Partial* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========             *प्रयत्नांती यश* थोमस अल्व्हा एडिसन यांची ही कथा.आपल्या अनेक शोधांनी अवघ्या मानवजातीचे आयुष्य उजळवून टाकणारा ,ते सुखमय करणारा हा संशोधक . सतत कसले ना कसले प्रयोग करीत प्रयोगशाळेत दिवसभर संशोधन करणे हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन करणे,हाच त्यांचा दिनक्रम असे .अनेक वर्षे संशोधन केल्यावर त्यांना दिव्याचा शोध लागला .त्यावेळी भेटावयास ,त्यांचे कौतुक करावयास आलेल्या व्यक्तींनी त्यांना विचारले,'या शोधासाठी तुम्हाला किती प्रयोग करावे लागले ?"'एक हजार ...' एडिसनम्हणाला .त्यांना पुन्हा विचारण्यात आले ,'आपण एक हजार वेळा प्रयोग केलेत .परत्येक वेळी आलेल्या अपयशानंतर खरतर आज लाभलेल्या यशाबद्दल आपणाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया काय ?' यावर एडिसन म्हणाला ९९९ प्रयोगांनी दिवा बनवता येत नाही ,हेच मला कळल.' *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment