✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना. २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री. १९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार. १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक. २००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा कायम, सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली.* ----------------------------------------------------- 2⃣ *न्यूयॉर्क - जगातील सर्वात शक्तिशाली 25 देशांची यादी जाहीर, यात अमेरिका प्रथम क्रमांकावर तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन तिसऱ्या स्थानावर असून भारताचा 15 वा नंबर आहे* ----------------------------------------------------- 3⃣ *पावसामुळे मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर,  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा*  ----------------------------------------------------- 4⃣ *अकरावी ऑनलाईन ऍडमिशन पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश घेण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ* ----------------------------------------------------- 5⃣ *'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉक्टर हंसराज हाथी यांची भूमिका साकारणारे विनोदी अभिनेते कवि कुमार आझाद यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन*  ----------------------------------------------------- 6⃣ *पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले.* ----------------------------------------------------- 7⃣ *सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मिळविला सहज प्रवेश* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========      *दप्तरमुक्त शाळेतील आनंद* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_7.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========                    *पद्मा गोळे* पद्मा गोळे ह्या मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार आहेत. त्या कवयित्री 'पद्मा' या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रितीपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह. प्रितीपथावर या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वत:च्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक,चिंतनशील आणि स्वप्नदश्री व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर,संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) अभियंता दिन कधी साजरा केला जातो ?*         १५ सप्टेंबर *२) सुप्रसिद्ध झुकता मनोरा कोठे आहे ?*        पिसा (इटली) *३) मोर्ले-मंटो सुधारणा कायदा कधी करण्यात आला ?*        १९०६ *४) फुलांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?*          अँथॉलॉजी *५) जहाजबांधणी व्यवसायात अग्रेसर असलेला देश कोणता ?*            जपान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नागनाथ वाढवणे, सहशिक्षक 👤 महेश लबडे, सहशिक्षक 👤 युवराज माने 👤 साई गायकवाड 👤 मिलिंद चावरे 👤 प्रकाश येलमे 👤 लक्ष्मण मुंडकर, सहशिक्षक 👤 शिवाजी वासरे 👤 ज्ञानेश्वर जगताप, सहशिक्षक 👤 गणेश अंगरवार 👤 चरणसिंग चौहान 👤 बालाजी दुसेवार 👤 प्रियंका घुमडे 👤 मन्सूर शेख 👤 पिराजी चन्नावार 👤 दगडू गारकर, सहशिक्षक 👤 लक्ष्मीकांत पलोडे 👤 विठ्ठल रामलू चिंचलोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========      *खरे ज्ञान* कसे जगावे माहित असणे खरे ज्ञान आहे जे चांगले जगतात त्यांना जगात मान आहे शिकून सवरून माणसाला चांगले जगता यावे चार माणसांत माणसाला माणसा सारखे वागता यावे    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.* *माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.*          *'हे ईश्वरा माझे हाती काम दे*          *परी ते करण्याची शक्ती दे.'*    ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●••     ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ=========      दुस-याला दोष देणे किंवा नाव ठेवणे फार सोपे आहे. दुस-याला दोष देताना स्वत:ला मोठेपणा वाटून घेण्यात धन्यता मानतो.  आपल्यातले दोष दुस-याला समजले तर आपला अपमान झाल्यासारखे वाटते आणि लगेच त्याला प्रतिउत्तर देतो. असे करण्याने आपल्यातल्या दोषांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतो. अर्थात आपल्या दोषाला खतपाणी घालते ते आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जर आपण असे ठरवले तर आपली प्रगती होणे अशक्य आहे. पहिल्यांदा आपल्यामध्ये दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि मगच इतरांच्या होणा-या चूका असतील तर त्यांचा अपमान न करता त्याची होणारी चूक लक्षात आणून देऊन सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त करावे. तो निश्चितच स्वीकार करेल कारण तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श असाल. तुमच्या विचारांचा नि उपदेशाचा नक्कीच स्वीकार करेल. " केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे " याप्रमाणे आपण आधी कृती करावी मग इतरांना करायला सांगावी. म्हणजे आपल्यातील आणि इतरांतील दोष कमी होण्यास मदत होईल व आपण आपल्या जीवनात काहीतरी केल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========          *निश्चित - Fixed* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========   *एक निरुद्योगी माशी* एकदा एक मधमाशी आपल्या मनाशीच विचार करू लागली की, 'मी सारखं कामाला जुंपलेलं असावं असं का? ही फुलपाखरं पहा ! किती आनंदात वेळ घालवतात. मीसुद्धा त्यांच्यासारखं का होऊ नये ?' त्या दिवसापासून तिने काम करायचं सोडले. इतर मधमाशांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्‍न केला, पण तो फुकट गेला. असे होता होता पावसाळा आला व पाऊस पडू लागला तेव्हा ती मधमाशी पोळ्याजवळ आली, पण त्याची सर्व दारे बंद झाली होती. शेवटी भुकेने व थंडीने ती मरण पावली. *तात्पर्य - स्वतःच्या पोटाकरता कसलातरी उद्योग करणे योग्य.* *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment