✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/07/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९०७ - कोरिया  जपानच्या आधिपत्याखाली आले. १९०८ - किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला. १९०९ - लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडीपार केली. १९१७ - कॅनडात आयकर लागू १९२५ - सोवियेत संघाची  वृत्तसंस्था तासची स्थापना १९३४ - ऑस्ट्रियाच्या  चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या. १९४३ - दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीचीहकालट्टी. १९५२ - पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले. १९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली. १९७३ - सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित. १९८४ - सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्कायाअंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर १९९७ - के.आर. नारायणन  भारताच्या  राष्ट्राध्यक्षपदी. १९९९ - लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली. २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी. 💥 जन्म :- ११०९ - अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा. १५६२ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. १८४८ - आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचे ३३वे पंतप्रधान १९०८ - बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी. १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी 💥 मृत्यू :-  ३०६ - कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट. १४०९ - मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा. १४९२ - पोप इनोसंट आठवा.१९३४ - एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर १९७३ - लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर : राज्यातील मंत्र्यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार, सोलापुरातील पोलीस सूत्रांनी दिली माहिती* --------------------------------------------------- 2⃣ *मराठा आरक्षण - आंदोलनादरम्यान जाळपोळ, हिंसा करु नका - शरद पवार यांचे अवाहन* --------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद - वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाच्या अडचणीमुळे मराठा क्रांती मोर्चाचे कायगाव टोका येथील आंदोलन स्थगित*  --------------------------------------------------- 4⃣ *पिंपरी - पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा* --------------------------------------------------- 5⃣ *ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण- न्यायालयानं कार्लो गेरोसाच्या विरोधात केलं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी*  --------------------------------------------------- 6⃣ *आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका सुधा नरवणे यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *सोलापूर : राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या कौस्तुभ तळीखेडेला गोल्ड मेडल* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========    *हेडफोन पासून दूर रहा*  वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========             सोमनाथ चॅटर्जी  सोमनाथ चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते आहेत. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल  राज्यातील  बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल  राज्यातील  जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते इ.स. १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला. अभ्यासू वृत्ती,आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला.. जुलै इ.स. २००८मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे कार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इ.स. २००९ ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'जातककथा'च्या अनुवादिका कोण ?*     दुर्गा भागवत *२) व्ही.एस.एस.सी.चे विस्तारित रूप काय ?*         विक्रम साराभाई स्पेस सेंटर *३) नायलॉन, प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?*        कराथर्स *४) पी. ए. संगमा यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली. ?*         'नॅशनल पीपल्स पार्टी' *५) र्जमन नॅशनल सोशालिस्ट पार्टीची स्थापना कधी झाली ?*         ५ जानेवारी १९१९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * रामकुमार चिलकेवार * श्यामकुमार चिलकेवार * साईनाथ कामीनवार * श्रीधर चिंचोलकर * प्रा. सौ. संगीता भालसिंग * नरेंद्र राठोड * ऋचाली चंदेल बायस * लक्ष्मण सुरकार * अभिषेक येरावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@     *खरं सुख* जीवनात मानलं तर सुख आहे नाही तर क्षणोक्षणी कशातही दु:ख आहे खरं सुख हे मानण्यात असते मानलं नाही तर सारे दु:ख असते शरद ठाकर सेलू जि परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.*  *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....* *"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."* *तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.*         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगात, विचारात आणि कृतीत सर्व मानवतावादी मूल्ये रुजलेली आहेत ह्यांनाच आपण खरे विद्वान म्हणावे. केवळ वरवर ज्ञान मिळवून चार लोकांत आपलाच उदोउदो करुन घेणारे महाभागही या जगात पुष्कळ आहेत. त्यांच्या ओठांवर एक आणि पोटात एक असते. अशी माणसे तेव्हाच काळाबरोबर लुप्त होतात. ते कधीच नंतरच्या काळात टिकत नाहीत अर्थात ते अल्पायुषी ठरतात. ज्यांना काळाबरोबर आणि काळाप्रमाणे पुढे पुढे जायचे आहे ते मात्र कशाचाही विचार न करता जगतात. तेच खरे मानवतेची मूल्य जोपासत कोणत्याही कालप्रवाहात चिरंजीव असतात हे मात्र सत्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========               *मर्यादा - Limit* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========             *मैत्रीच्या मर्यादा* एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.' एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!' 'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!' तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment