✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/07/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ=========           स्वातंत्र्यदिन - अमेरिका 💥 ठळक घडामोडी :-  १७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले. 💥 जन्म :- १८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान. १९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती. १९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार.  💥 मृत्यू :-  १९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *देशातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला विचारल्या शिवाय करू नये सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश* ----------------------------------------------------- 2⃣ *बोंडअळीसाठी आत्तापर्यंत १८ लाख १६ हजार ५५७ शेतकर्‍यांच्या खात्यात त्यासाठीच्या विम्याची रक्कम जमा झाली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले* ----------------------------------------------------- 3⃣ *अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना दुर्दैवी असून, चौकशीचे आदेश दिल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.*  ----------------------------------------------------- 4⃣ *एटीएममधून पैसे काढण्यावर लागणार अधिक शुल्क, पहिले फ्री ट्रांजेक्शन संपल्यावर वसूल केल्या जाणार्‍या शुल्कात १८ रूपयांऐवजी २३ रुपए अशी वाढ होण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *हवामान विभागाने मुंबईत बुधवार, गुरुवार दोन दिवसांत मुसळधार पावसाची वर्तवली शक्यता.*  ----------------------------------------------------- 6⃣ *ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल यांच्या आक्रमक खेळीमुळे भारत 'अ' ने इंग्लंड लायन्सवर पाच गड्यांनी मात करीत तिरंगी मालिका जिंकली*  ----------------------------------------------------- 7⃣ *फिफा विषवचषक 2018 - मेक्सिकोला मात देत ब्राझिल उपांत्यपूर्व फेरीत दाखल*  ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========   *शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========              *स्वामी विवेकानंद* विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. ११ सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषदेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्‍विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली. या परिषदेत विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे, असे प्रतिपादन त्यांनी करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी, असे केले. पुढे वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये व्याख्याने दिली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) शांतीवन हे कुणाच्या समाधीचं नाव आहे ?*            जवाहरलाल नेहरू *२) इकेबाना हा प्रकार कशाशी संबंधित आहे ?*          फुलांच्या सजावटीशी *३) कर्नाटक संगीताचे पितामह कुणाला म्हणतात ?*          पुरंदरदास *४) फॅदोमीटरने काय मोजलं जातं ?*              समुद्राची खोली  *५) 'सारे जहां से अच्छा' या गीताचे गीतकार कोण आहेत ?*            कवी इक्बाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 बंडोपंत लोखंडे, सहशिक्षक, नांदेड 👤 बंडू अंबटकर, सामाजिक कार्यकर्ता 👤 कमलाकर जमदाडे, बिलोली 👤वृषाली सानप काळे, साहित्यिक 👤 नवनाथ मुसळे 👤 राजकुमार बिरादार 👤 बालाजी मंडाळेकर 👤 गणेश मंडाळे 👤 प्रभाकर भादेकर 👤 श्रीधर जोशी 👤 परमेश्वर मेहेत्रे 👤 गोविंद कवळे 👤 प्रभाकर शेळके 👤 उदय स्वामी 👤 श्याम उपरे 👤 अविनाश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========      *पाऊस* सगळ्यांचीच आता पावसाकडे नजर आहे ये रे ये पावसा फक्त हाच एक गजर आहे पावसा तु आता असा मनमोकळा ये पशु पक्षी प्राण्यांना तू समाधान दे   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुगरणीची गोष्ट सर्वांना माहित असेल. सुगरणीचा नक्षीदार खोपा नर बांधतो. सुगरण या खोप्यात आनंदाने राहते. अंडी घालते आणि नंतर दुस-यासोबत उडून जाते. अशी बेवफाई जिव्हारी लागते. खेड्यापाड्यतल्या अनेक म्हातारा-म्हातारींची अवस्था अशीच आहे. ज्यांच्याकडे बघत स्वप्नांचे झुले बांधले ती अंगाखांद्यावर खेळलेली पाखरं पंख फुटल्यावर बेईमान होऊन कायमची उडून गेली खोप्याला मागे सोडून. जख्खड चोचीने भरवलेला दाणा, दुष्काळी झळांमध्ये चोचीत थेंब-थेंब ओतलेलं पाणी, कसं विसरून गेले सारं..!* *या पाखरांना घरच्यांनीच मुभा दिली होती, दूरदेशी जाऊन चार दाणे चोचीत भरून आणतील या आशेवर भरवंसा होता. पण एकदा उडालेले पंख परतून माघारी फिरले नाहीत. म्हातारपण आजही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे. हे त्यांचं वाट बघणं वेदनादायी आहे. सकाळी रानात सोडलेली गाय सांजेला दावणीला आली नाही तर तिच्या ओढीने व्याकूळ वासरू टिपं गाळत हंबरतं. ते काळीज पिळवटून टाकतं, तसंच यांचं मूकपणे वाट पाहणं, हुंदका गिळून गहिवरणं. आपल्याच माणसांनी झोळीत टाकलेलं लाचारपण घेऊन निराधाराचे रडगा-हाणे कोणाला सांगणार ? आपल्या मोडक्या, गळक्या कुडाची इज्जत गहाण ठेवून थकलेले, भागलेले हताश पाय कशीबशी वाट चालतात. पाखरांची परतीच्या दिवसाची खुळी आशा मनात घेऊन वाट पाहता पाहता पडक्या घराच्या मुंडारीवर उगवलेले गवत वाळुन जाते पण पाखरं ...परततच नाहीत...???* 😢😌    ••●🌿 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌿●••     🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या माणसाजवळ जे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वत:साठीच करतो त्याला ज्ञानी म्हणताच येत नाही. कारण त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा प्रसार न झाल्याने ते त्याच्यापुरतेच मर्यादित राहते. त्यापेक्षा त्याचा प्रसार केल्यास चांगल्या विचारांची देवाणघेवाण होऊन स्वत:च्याही ज्ञानात अधिक वाढ होते व इतरांनाही आपण काहीतरी नवे ज्ञान दिल्याचे समाधान वाटते. हा ज्ञान असल्येल्या माणसाने विचार करायला हवा. जर इतरांसाठी ज्ञानदानाचे कार्य करत नसेल तर ज्ञानी असूनही अज्ञानीच म्हणायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========             *प्रसार - Spread* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========         *मांजराच्या गळ्यात घंटा* वाऱ्यावर लाथा मारून काही उपयोग होत नसे. तसेच कल्पना या कितीही चांगल्या असल्या तरी जोपर्यंत त्या अंमलात येण्याजोग्या असल्या तरचत्यांचा योग्य तो उपयोग होऊ शकतो , जस हे बघा ... मांजरापासून कसं वाचायचं ,यासाठी सर्व उंदरांनी एक सभा घेतली .त्या सभेचा विषय होता .मांजरापासून कसं वाचायचं , तेव्हा प्रत्येक उंदीर आपापल्या कल्पना सांगू लागले .अस करूया,तस करूया.तेव्हा एक तरुण उंदीर जोशाने म्हणाला की, जर आपण त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधली तर कसं राहील.म्हणजे बघा न त्या घंटेचा आवाज आला की, आपल्याला सावध होता येईल . मग ठरलं तर मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची .ही सुंदर कल्पना तिथे बसलेला एक वृध्द उंदीर ऐकत होता . तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, ''ठीक आहे , ही कल्पना फार  सुंदर आहे ,पण जरा विचार केला काय ? *ही घंटा बांधणार कोण?''.* *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment