✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. १८१९: अ‍ॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले. १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील. १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी. १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले. १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली. १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले. २०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर. २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. 💥 जन्म :- १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर १९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल 💥 मृत्यू :- १९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर १९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्रीय कोटाच्या 15 टक्के जागांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, अशी कृती करण्यास हायकोर्टाने केली मनाई, त्यामुळे प्रवेश यंत्रणेला पुढे जाण्यापूर्वी आवश्यक काळजी घ्यावी लागणार* --------------------------------------------------- 2⃣ *कोकण विभागीय बोर्डाची 9018 घरांची लॉटरी निघणार ; 18 जुलैपासून भरता येणार अर्ज, 19 ऑगस्टला घरांसाठी सोडत* --------------------------------------------------- 3⃣ *दुधाची नासाडी टाळत दूध उत्पादकांचं अनोखं आंदोलन, कुठे वारकऱ्यांना मोफत दूध ; तर कुठे विद्यार्थ्यांमध्ये केलं दुधाचं वाटप; आंदोलकांकडून दूध सत्कारणी* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : खड्डे बुजवले जाईपर्यंत टोल वसूल करू नका, सार्वजनिक बांधकाम विभागाची सरकारला शिफारस* --------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : पावसाळ्यात ताडोबा पूर्ण बंद ठेवण्याची विनंती हायकोर्टाकडून अमान्य, बफर झोनमध्ये पर्यटन राहणार सुरु* --------------------------------------------------- 6⃣ *नाशिकचे गंगापूर धरण पंधरवड्यात 75 टक्के भरल्याने गोदापात्रात विसर्ग सुरु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस* --------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जसे चारित्र्य तसे जीवन* वरील लेख पूर्ण ऐकण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1599966110130157&id=100003503492582 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबुराव रामजी बागूल* बाबुराव बागूल (जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८) हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाला. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कँपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?* १९०६ *२) वंगभंग चळवळीचे नेतृत्त्व कोणी केले ?* सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर *३) अब्दुल लतीफ यांनी बंगालमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली ?* द मोहमेडन लिटररी सोसायटी *४) लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारावासात कोणता ग्रंथ लिहिला ?* गीतारहस्य *५) सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी कोणत्या वर्षी मागे घेतली ?* १९३४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * माधव गैनवार, * अनिलकुमार बिंगेवार * रामचंद्र गादेवार * दिगंबर कदम * पुरुषोत्तम केसरे * मधुकर फुलारी * विशु पाटील चंदापुरे * अरिफा शेख * आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *बढाई* काम कमी अन् श्रेयासाठी लढाई असते काम नकरणाराचीच जास्त बढाई असते काम करणाराचे काम झाकल्याने झाकत नसते बढाया मारणारांच्या पदरात कोणी काही टाकत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.* *आम्ही विठ्ठलाचे वीर ।* *फोडू कळी काळाचे शीर ।।* *तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.* *ज्ञानदेवे रचिला पाया !* *तुका झालासे कळस' !!* *इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."* ••●🔔‼ *रामकृष्णहरी* ‼🔔 ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो. अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही. असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही. त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे. अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास - Believe* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment