✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/07/2018 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली. १८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली. १९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली १९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली. १९०५: लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. १९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई. १९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली. १९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. १९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले. १९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली. १९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर. १९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. १९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. 💥 जन्म :- १८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे १८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास १८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय १९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर १९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य १९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर १९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे १९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी १९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले 💥 मृत्यू :-  ९३१: जपानचे सम्राट उडा १३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ १८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर १९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही १९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड १९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम २००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - लोकसभेत विरोधक आणि टीडीपीने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी.* --------------------------------------------------- 2⃣ *नागपूर - तोट्यातील महामंडळे बंद करणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना, 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* --------------------------------------------------- 4⃣ *गोव्यात आयात करण्यात येणाऱ्या मासळीवर बंदी. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती.* --------------------------------------------------- 5⃣ *हिंगोली : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे उत्तम असोले तर उपसभापती शिवसेनेचे नामदेव राठोड यांची निवड* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - सोन्याच्या किंमतीत 600 ते 800 रुपयांनी घट, सोन्याचा कालचा दर होता 30,500 रुपये* --------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली - एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड, भुवनेश्वर कुमारला विश्रांती तर ऋषभ पंतला मिळाली संधी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *फ्रेश शालेय परिपाठ* PDF मध्ये पाहण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://goo.gl/mmT6K2 *साभार : दैनिक दलितवाणी* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= डॉ. जयंत विष्णू नारळीकर डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ,  वाराणसी  येथील  बनारस हिंदू विद्यापीठाच्यागणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.... *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हिंदू पुराणांची एकूण संख्या किती आहे ?*         अठरा *२) 'शुल्बसूत्र' ग्रंथ कोणत्या विषयाशी निगडित आहे ?*           भूमिती *३) 'स्वाजीलँड' या देशाचं नवीन नाव काय आहे ?*         किंग्डम ऑफ इस्वातीनी *४) 'शेरशाह का मकबरा' ही वास्तू कुठे आहे ?*             सासाराम, बिहार *५) 'दीपशिखा' हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?*          महादेवी वर्मा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * मनोज बढे * अनिकेत पडघन * अमोल पाटील सावंत * गजानन शिराळे * श्रीनिवास मुरके * स्वप्नील शेंडगे * जगजीत ठाकूर * दीपक चामे * अमोल कदम * दीपक कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========       *ईच्छा* छोटा असो की मोठा प्रत्येकाला हाव आहे चोरालाही वाटते आपण साव आहे एक झाली की एक ईच्छा कुठे पुर्ण होते अती झालं की मग कधी तरी अजीर्ण होते    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?*        *आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.*                   🎪 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🎪            🎄🎄🎄🎄🎄🎄         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो. हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे. वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========          *समृद्ध - Prosperous* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========             *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment