✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/07/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाकवी कालिदास दिन* 💥 ठळक घडामोडी :- १६६०: पावनखिंडीतील लढाई. १८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले. १८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला. १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी. १९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला. १९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली. २०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी 💥 जन्म : १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर १९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड १९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक १९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स १९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी 💥 मृत्यू :- १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिले आपल्या प्राणाचे बलिदान १७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात १९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद १९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा १९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान १९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे २०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत २००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले २०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्यात वर्ष २०१२ पासून शिक्षकांची भरती बंद असल्यामुळे राज्यात २४ हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली* ----------------------------------------------------- 2⃣ *महाराष्ट्रातील विशेषत मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पूणे, चंद्रपूर, सोलापूर या शहरासह१७ शहरे प्रदूषित पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षाचे होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *चाइल्ड राइटस अँण्ड यू (क्राय) या प्रख्यात एनजीओच्या अहवालानुसार देशात १५ ते १८ वयोगटातील तब्बल २ कोटी ३0 लाख मुले 'कामगार' असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूर- यशोमती ठाकूर यांना उत्कृष्ट महिला आमदार पुरस्कार प्रदान* ----------------------------------------------------- 6⃣ *भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक* ----------------------------------------------------- 7⃣ *क्रोएशियाने इंग्लंडवर २-१ अशी मात करत पहिल्यांदाच फिफा विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत दिली धडक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिण्याला पर्याय नाही* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/WZziPziK7uA आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाजीप्रभू देशपांडे* बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* १३६ वा *२) अंतराळवीर कल्पना चावला यांचे जन्मगाव कोणतं ?* कर्नाल, हरियाणा *३) सोयुझ टी-११ हे कोणत्या देशाचे अवकाशयान आहे ?* रशिया *४) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत ?* सचिन तेंडूलकर *५) एअरफोर्स अँकॅडमी कुठे आहे ?* अँडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुनील जंजाळ 👤 रवी येलमोड 👤 शेख अहमद 👤 श्रीनिवास मोरे 👤 गणेश पांडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= " विकृती " हल्ली समाजात विकृती वाढत आहे घडोघडी कुठेही अपराध घडत आहे अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे शिक्षा पाहून पुन्हा चूक नाही केली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते.* *"साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी* *सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी* *अवती भवती झगमगती नक्षत्रे होती* *पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●☀‼ *रामकृष्णहरी* ‼☀●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मनुष्य जीवन जगण्यासाठी काही ना काहीतरी धडपड करत असतो. त्या धडपड करण्यातून त्याला आपल्या जीवनासाठी काहीतरी साध्य करायचे असते. धडपड करणे हा मानवी स्वभाव आहे. जीवनात चांगले साध्य करण्यासाठी अंत:करणातून आपले चांगले हित साध्य करत करत दुस-याला दु:ख होणार नाही याचे देखील भान असू द्यावे. तरच आपल्या धडपड करण्याचा फायदा होईल. अन्यथा आपली केलेली धडपड वाया जाण्याची दाट शक्यता असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वभाव - Temperament* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *एक छोटीशी संधी* एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकाॕप्टर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकाॕप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment