✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/07/2018 वार - बुध =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ=========        *जागतिक लोकसंख्या दिन* 💥 ठळक घडामोडी :-  २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू. २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. २००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान. १९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री. १९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *माए साई - गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहिम आज फत्ते झाली. थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांची सुटका करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयानं व्यवसाय सुलभतेत आंध्र प्रदेशला दिला नंबर एकचा क्रमांक* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई- जलयुक्त शिवार योजनेची स्वतंत्र चौकशी करून ऑडिट करा, माजी कुलगुरू व तज्ज्ञांची कमिटी नेमून पाहणी करा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई- दूध भुकटी निर्यातदार संघांना 50 रुपयांचं अनुदान, दूध निर्यातदार संघांना 5 रुपये अनुदान, दूध संघासाठी सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 5⃣ *अकरावी प्रवेशांना पुन्हा मुदतवाढ, विद्यार्थ्यांना 11 जुलै सायंकाळी 5 पर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर - शेतकऱ्यांना तुरीचे तुकारे 15 दिवसांत दिले जाणार, सहकारमंत्री सुभाष देशमुखांची विधान परिषदेत माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *आय सी सी टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का, भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक लोकसंख्या दिन* 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्ज अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे. वाढत असलेली लोकसंख्या ही जगासमोर .......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_9.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========    *गीतकार शांताराम नांदगावकर* शांताराम नांदगावकर हे मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर त्यांची सून आहे. मूळचे कोकणातील कणकवलीच्या नांदगावाचे होते. लहानपणी ते मुंबईत आले. मुंबईत परळ येथील शिरोडकर हायस्कुलात त्यांचे शिक्षण झाले. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी विपुल प्रमाणात गीते लिहिली. अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, पैजेचा विडा यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले पुढे इ.स. १९८५ साली ते शिवसेनेकडून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून गेले होते. उतारवयात ते मधुमेह व अल्झायमराने आजारी होते. जुलै ११, इ.स. २००९ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी किती सदस्य आहेत ?*            पाच *२) जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ?*    सरिमाओ भंडारनायके *३) ब्राझीलने आतापर्यंत फुटबॉल वर्ल्डकप किती वेळा जिंकला आहे ?*         पाच *४) जागतिक दृष्टिदान दिन कधी असतो ?*          10 जून *५) इंडियन नेव्हल अकॅडमी कुठे आहे ?*        एडमला (केरळ) *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अवधूतवार साईकिरण, बोधन 👤 अनुपमा अजय मुंजे 👤 शिवाजी सूर्यवंशी, सहशिक्षक 👤 प्रभू देशमुख 👤 संतोष चौहान 👤 नरेश गौतम 👤 प्रमोद मंगनाळे 👤 प्रकाश नाईक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========     *खरं सुख* जीवनात मानलं तर सुख आहे नाही तर क्षणोक्षणी कशातही दु:ख आहे खरं सुख हे मानण्यात असते मानलं नाही तर सारे दु:ख असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●🚩‼ *विचार धन* ‼🚩●•••• *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...*    ••●🚩‼ *रामकृष्णहरी* ‼🚩●••     🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= सत्याची बाजू कधीच कमकुवत नसते. ती कधीच कुबड्याचा आधार घेत नाही किंवा इतरांना बोलायला संधीही देत नाही. उलट असत्य मात्र वेळोवेळी कुणाची ना कुणाची मदत किंवा आधार घेऊन आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करत असते तरीही यशस्वी होता येत नाही. जर असे असेल तर कशाला असत्याची बाजू घेऊन अपमानित जीवन जगता ! त्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा. हाच मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========          *उत्कर्ष - Flourish* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========        *विद्या विनियेनं शोभते* राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही. तात्‍पर्य :- आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment