✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/07/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक सर्प दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली. १६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या. १९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले. १९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी. १९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले. १९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण. १९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. १९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय. 💥 जन्म :- १९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली १९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती १९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे १९१७: नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथूर १९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव १९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ १९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज १९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे १९६८: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले १९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर १९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक १९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ 💥 मृत्यू :-  १९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे १९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ  १९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा निर्णय; भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री, पहिल्यांदाच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, 11 ते 17 ऑगस्ट या सहा दिवसांत भाविकांना घेता येणार नाही दर्शन* ----------------------------------------------------- 2⃣ *चेन्नई : केंद्र सरकारच्या 'एक भारत, एक निवडणूक'च्या प्रस्तावाला तमिळनाडू राज्यातून विरोध केला जात असला तरी मात्र, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रस्तावाला दर्शवला पाठिंबा* ----------------------------------------------------- 3⃣ *लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून एसीचा प्रवास करणाऱ्यासांठी एक वाईट बातमी, लवकरच एसीचा प्रवास महागण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 4⃣ *उद्योगपती मुकेश अंबानी बनले आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती* ----------------------------------------------------- 5⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर 86 धावांनी विजय* ----------------------------------------------------- 6⃣ *थायलंड ओपन विश्व टूर सुपर ५०० टूर्नामेंटच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये पी. व्ही. सिंधूला करावा लागला पराभवाचा सामना* ----------------------------------------------------- 7⃣ *Wimbledon येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरी स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसनवर   6-2, 6-2, 7-6 ( 7-3) असा सहज विजय मिळवित 13 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षणाचा काय फायदा ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========           *अरुणा असफ अली* अरुणा असफ अली यांचा जन्म १६ जुलै१९०८ साली झाला. मूळच्या त्या अरुणा गांगुली. इ.स. १९४२ सालच्या चले जाव मोहिमेत गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. यासाठी त्यांची खास आठवण ठेवली जाते. अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========        🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========          खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते.. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'ब्रोकन विंग' कादंबरी कुणी लिहिली आहे ?*         खलिल जिब्रान *२) सध्याचे लष्करप्रमुख कोण आहेत ?*         ज. बिपिन रावत *३) जागतिक रेडक्रॉस दिवस कधी साजरा केला जातो ?*        ०८ मे *४) जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार अधिकारी कोण होता ?*       जनरल डायर *५) 'अप्पर कट' ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*         बॉक्सिंग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * जयवंत हंगरगे, सहशिक्षक, धर्माबाद * संगीता संगेवार, धर्माबाद * कपिल भाऊ * मारोती गाडेकर * सुरेश भाग्यवंत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========      *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========    *"रूची "* न आवडणाराला वाटते  हे काही धड नाही  साखर खाऊ घातली  तरी वाटते गोड नाही रूची असल्या शिवाय  निर्माण होत नाही आवड  रूचीहीन कशाला कोण  काढील सांगा बरं सवड    शरद ठाकर  सेलू जि परभणी  8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.* *"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."*     ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●••      ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜         *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण केलेल्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही, परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========          *उपकार - Thank You* =========ஜ۩۞۩ஜ=========    🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                *दुसऱ्यांचे उपकार* एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्‍याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले. त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही.  बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला. यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment