✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/07/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ=========   🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १७८९: फ्रेंच क्रांतीची सुरवात. १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले. १९५८: इराकमध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर. १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले. १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या. १९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली. २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघद्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला. २०१३: डाकतार विभागाची १६३ वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली. 💥 जन्म :- १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर १८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट १८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार विल्यम हनी १९१७: संगीतकार राजेश रोशन  १९२०: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण १९४७: मॉरिशसचे ३रे व ६वे पंतप्रधान नवीन रामगुलाम  १९६७: श्रीलंकेचे क्रिकेटपटू हशन तिलकरत्ने 💥 मृत्यू :-  १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी आणि ५वे राष्ट्राध्यक्ष पॉल क्रुगर १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी १९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती  १९७५: संगीतकार मदनमोहन १९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब १९९८: मॅकडॉनल्डचे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड २००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस  २००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या २००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : नाणार प्रकल्प लादणार नाही; चर्चा करून निर्णय घेऊ - नाणार बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन* ----------------------------------------------------- 2⃣ *लाहोर : पाकिस्तानचे  माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक.* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे - डोंबिवली आणि परिसरात जाणवले 2.8 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - महाराष्ट्र सरकारने 6 व्या वर्गाच्या भूगोलाच्या पुस्तकात केला गुजराती भाषेचा वापर, विरोधकांचा गोंधळ* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी मनपा निवडणुकीच्या तयारीबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी.* ----------------------------------------------------- 6⃣ *2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार* ----------------------------------------------------- 7⃣ *विम्बल्डन 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ=========    *शनिवारची दप्तरमुक्त शाळा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://goo.gl/5seL7t आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========     🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण  डॉ. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. २६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रामायण कोणी लिहिलं आहे ?*           महर्षी वाल्मिकी *२) पंजाबची राजधानी कोणती ?*            चंदीगड *३) 'जायकवाडी धरण' कोणत्या राज्यात आहे ?*           महाराष्ट्र ( औरंगाबाद ) *४) 'भारुडे कोणाची प्रसिद्ध आहेत ?*           संत एकनाथ *५) लीळा चरित्र कोणी लिहिले ?*        श्री चक्रधर स्वामी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * मिलींद व्यवहारे, नांदेड * धनंजय गुम्मलवार, नांदेड * नितीन काळे  * भगवान अंजनीकर, नांदेड * नागेश स्वामी * आकाश यडपलवार, धर्माबाद * नंदकिशोर मोरे * चंद्रकांत वाडगे * शंकर कंदेवाड * इरवंत जामनोर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========        *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ=========   "पेरणी " पेरून ठेवले तेच  उगवुन येत असते  चांगले पेरलेले ते  वाया जात नसते पेरतांना कधी ही  पेरून ठेवा चांगले  चांगले पेरल्यावर  उगवेल कसे वागले    शरद ठाकर  सेलू जि परभणी  8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========   🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *अनेक वेळा जावा-जावा, भाऊ-भाऊ, सासू-सुना, मित्र-मैत्रिणी अशा मानवी नातेसंबंधात रूसण्यामुळे घरं दुभंगली आहेत. रूसण्याच्या वर्तुळाचा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टीत रूसवे-फुगवे होतात. ज्यांच्यात भांडायची ताकद नसते ते रडत बसतात, दु:खी होतात. बिनबुडाची भांडणं असतात. दुस-याचा रूसवा-फुगवा किती ताणायचा यालाही काही मर्यादा असतात.* *रूसव्यातला फोलपणा कळला तर राग राहात नाही. आपणही निवळत गेले पाहिजे. रूसवे-फुगवे प्रत्येक नात्यात असतात, म्हणून काय संबंध बिघडावयचे का? सहजगत्या रूसवा निघाला तर ठिक नाहीतर प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळे असतात. आपण चालत राहायचे. अनाथ असलेला मुलगाही 'नारायण सुर्वे' होऊ शकतो.* *"कुणावाचून कुणाचे अडत नाही.*  *आपल्या रस्त्याने हसत पुढे निघायचे."*                *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण केलेल्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही,परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/     ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ=========           *दैव - Fortune* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ=========                 *मनःशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.  जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,  "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."  *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment