🙏 *नमस्काराचे महत्व* 🙏 महाभारताचे युद्ध सुरु होते. दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की, "मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन" त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, "माझ्या सोबत चल". द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की, आत जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच, "अखंड सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की, "वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस?" "माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत" असे द्रोपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म म्हणाले, "माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करु शकतात" शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रोपदीला म्हणाले की, "बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले, हे तुझ्या लक्षात आले का?" जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर हि युद्धाची वेळच आली नसती" अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती! तात्पर्य, वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की, कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. 🙏 कारण - नमस्कारात प्रेम आहे नमस्कारात विनय आहे नमस्कारात अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कारात शीतलता आहे नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो नमस्कार आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे 🙏🙏🙏 🙏 सर्वांना सादर प्रणाम 🙏 (संकलीत व अनुवादित)

No comments:

Post a Comment