✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/12/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रजासत्ताक दिन - नायजर.* 💥 ठळक घडामोडी :-  २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार. २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या. 💥 जन्म :- १८५६ - सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार. १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू. १८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म 💥 मृत्यू :-  १९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर १९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर २०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी २००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात कुणाचं? मतमोजणी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज.* ----------------------------------------------------- 2⃣ *औरंगाबादः जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण मंगळवारी* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नुकतीच इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली, देशातील पहिली इंपोर्टेड इलेक्ट्रिक कारची नोंदणी* ----------------------------------------------------- 4⃣ *रेल्वेतील प्रत्येक कर्मचा-याची वर्षातून एकदा मेडिकल तपासणी होणार, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.* ----------------------------------------------------- 5⃣ *अमरावती : राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या पल्लवी पवारने १५२ किलो वजन उचलून सूवर्णपदक पटकावले.* ----------------------------------------------------- 6⃣ *विशाखापट्टणम वनडे - शिखर धवनचा शतकी तडाखा, लंकेचा आठ विकेटनं पराभव, मालिकाही खिशात* ----------------------------------------------------- 7⃣ *जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) - कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमार, साक्षी मलिकला सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *मुलांपेक्षा मुलगी बरी.....!* आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4739750601162752 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= विजय हजारे विजय शमूले हजारे ( 11 मार्च, 1 9 15 - डिसेंबर 18, इ.स. 2004 ) हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील भारतीय क्रिकेटपटू होता . 1951 ते 1953 पर्यंत ते भारतीय संघाचे कर्णधार होते. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताला प्रथम यश मिळवून दिले. 1960 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. 18 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) राष्ट्रीय संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?* 👉 ०३मार्च *२) सध्या सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक स्पर्धेत कोणत्या महिलेने सुवर्णपदक मिलवले आहे?* 👉 कांचनमाला पांडे *३) १९वे राष्ट्रीय बंधुत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉 प्रकाश रोकडे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रवी यमेवार, धर्माबाद 👤 विजयकुमार भंडारे, सहशिक्षक 👤 उदयराज कोकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतः बदला* प्रत्येकालाच जग बदलाव वाटत असतं पण त्यासाठी स्वतःला बदलाव हे पटत नसतं जग बदलेल आधी स्वतः बदलावे लागेल आपण चांगले वागलो की जग चांगले वागेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावली ही अंधाराची आई आहे. वृक्ष उन्हाचा दाह पचवून प्राणिमात्रांना सावलीचा सुखद गारवा देतात, शीतलता देतात. मग तीचा एकुलता पुत्र 'अंधार' याचं काय? अंधार हा पापप्रेरक नाही. त्याचा पाप आणि पुण्याशी अंशमात्र संबंध नाही. पृथ्वीवरची अंधारी रात्र आणि माणसाच्या मनातील अंधार यात काय साम्यभेद असावेत? जन्मांधाला अंतर्चक्षूनं जीवनाचा संपूर्णानुभव घेता येतो. संत सूरदास यांचं उदाहरण पुरेसं आहे. पण डोळस लोक प्रसंगी गांधारीची भूमिका का बजावत असतात? धृतराष्ट्र द्रौपदीचं वस्त्रहरण अंध असूनही कसा अनुभवत होता? तर तो मनातल्या मनात वासनेची वासंती घडवून तीला अंतर्चक्षूनं उपभोगत होता. अंतर्मनातला अंधार गडद होत गेला की डोळसाच्याही नेत्रचंद्रावर झापड पदर ताणते. तेव्हा तो गृहस्थ शून्यभावस्थितीच्या अधीन होतो. हा डोळस असून त्या स्थितीत आंधळा तर धृतराष्ट्र अंध असून डोळस.* *प्रकाश हा सुंदर तर अंधार हा विरूप समजला जातो. प्रकाश हा अंधाराचा नाश करतो असंही तत्व विश्वमान्य आहे. परंतु खरंच अंधाराचा नाश होतो काय? तर नाही. ते कसे ते फक्त पहाटेलाच ठाऊक असतं. हा दृष्टांत अनुभवायचा असेल तर पहाट होऊन बघावं. अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. म्हणजेच अंधार हा दु:ख-क्लेशदायक आहे हा त्याचा अर्थ. अंधार कृष्णवर्णी असतो आणि आपण गौरवर्णाला सुंदरतेचं प्रतीक मानत असतो. प्रत्यक्षात चंद्रिका ही कृष्णवर्णीच आहै. ती अंधारकन्या आहे, सूर्यकन्या नाही. अंधार आणि दु:ख दोन्ही शाश्वत तर सुख हे उन्हाचं कवडसं आहे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे घड्याळातील काटे वेळ दाखवत दाखवत काळाला पुढे पुढे घेऊन जातात आणि गेलेला काळ भूतकाळ दाखवतात त्याचप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवासही घड्याळाच्या काट्यावर रहाणे पुढे पुढे सरकत जातो आणि एका वळणावर येऊन थांबतो.जेव्हा थांबतो तेव्हा खरंच कळायला लागतं की,आपण आपल्या आयुष्यात काय केलं ? असा प्रश्नही पडणे अपेक्षितही आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपण कधीही विचार केला नाही.पण तुम्ही नाराज होण्याचे कारण नाही.तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं आहे.सुखदु:खाचे व्यवहार,माणुसकी, मानसन्मान, नातेसंबंध, भेटीगाठी, दानधर्म,प्रेम, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही पुढील पिढीसाठी ठेवून देत आहात.ते तर तुम्ही तेव्हाच तुमच्या जीवनात होऊनही गेल्या.याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नाही. तुम्ही उद्या असाल किंवा नसाल परंतु तुमचा आदर्श नक्कीच येणारी पिढी अनुसरेल अगदी घड्याळातील काट्याप्रमाणे आहे ते जीवन दु:खी होऊन जगण्यापेक्षा सा-यांसोबत आनंदाने व्यतीत करा.यातच तुम्ही खूप काही केल्याचा आनंद शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= टिफिन पूरी तरह पोंछ कर खाने वाले एक बालक के दोस्त उसका मज़ाक उडाते थे... एक ने पूछा,'' तुम रोजाना टिफिन में एक कण भी क्यों नही छोड़ते ? बालक ने बड़ा ही सुन्दर जवाब दिया ... ''यह मेरे पिता के प्रति आदर है जो इसे मेहनत से कमाए रूपयों से खरीद कर लाते हैं और माँ के प्रति आदर है जो सुबह जल्दी उठकर बडे चाव से इसे बनाती हैं । यह आदर उन किसानो के प्रति है जो खेतो में कड़ी मेहनत से इसे पैदा करते हैं।" थाली में झूठा छोड़ना अपनी शान ना समझें *खाओ मन भर , छोडो ना कण भर* , *उतना ही ले थाली में , बाकी ना जाए नाली में* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment