✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/12/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह. १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला. १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर. १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार. २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार. 💥 जन्म :- १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म. १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी. १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक. 💥 मृत्यू :-  १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ. १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी. १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर. २००१ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : शिक्षण क्षेत्रात परिवर्तन व्हायला हवे. यामध्ये शाळांचे आणि शिक्षणाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आता बदल करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करा, दिल्लीतील नागरिकांना पोलिसांचे आवाहन.* ----------------------------------------------------- 3⃣ *अंदमान - निकोबारमध्ये भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी मोजण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज 2 जानेवारी 2018 पर्यंत तहकूब करण्यात आले.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - कमला मिल आग : निष्काळजीप्रकरणी पालिकेच्या पाच अधिका-यांवर निलंबनाची कारवाई, आयुक्त अजोय मेहता यांची माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आजपासून दोन दिवस विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा. जळगाव, धुळे व नंदुरबारमधील विद्यार्थी होणार सहभागी, विज्ञान भारतीचे सचिव जयंतराव सहस्रबुद्धे यांचीही उपस्थिती.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा : संघर्ष* आज सुनंदाच्‍या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते.  तिचा एकूलता एक मुलगा सुनील नौकरीसाठी मुंबईला चालला होता.  अतिशय कठीण परिस्थितीत सुनीलने आपले कॉम्‍प्‍युटर इंलिनिअरींग कोर्स पूर्ण केला होता.  कॅम्‍पस इंटरव्‍ह्यू मधूनच त्‍याला टाटा कंपनीने नौकरीसाठी कॉल पाठविला होता.  देवगिरी ...... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विक्रम साराभाई* भारतीय शास्त्रज्ञ विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म  अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते  ब्रिटनमधील  केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी  भरतनाट्यम,  कुचिपुडी  या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई  यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात. ~ वपु काळे | काही खरं काही खोटं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले गाव कोणते?* 👉 पंडरी *२) युनिसेफची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *३) वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये चीनचा कधी प्रवेश झाला?* 👉 २००१ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *आसनं अन् दिसनं* सारखं दिसतं म्हणून सारखं असत नाही एकच गोष्ट प्रत्येकाच्या डोक्यात बसतं नाही आसनं अन् दिसनं यात खूप फरक असतो प्रत्येक घटने मागे एक विशिष्ट कारक असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एके दिवशी कुणीतरी आपल्यावर दया करुन दिलेल्या एका भाकरीपेक्षा कष्टाने आणि स्वाभिमानाने मिळवलेली अर्धी भाकरी अधिक सुखाची असते.ती लाचारी कधीच स्वीकारत नाही तर आपला स्वाभिमान जागृत करुन जगासमोर जगायला शिकवते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.* हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . *उदा.*-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सिंह व जंगलातील प्राणी* 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो* एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *तात्पर्य* : - *आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment