✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल. २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी. 💥 जन्म :- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील. १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक. १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक. १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते. 💥 मृत्यू :-  १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ. १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, तापमानात घट.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- कमला मिल कंपाऊंडमधील भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू, 12हून अधिक जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *ऐतिहासिक दिवस ! तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर* ----------------------------------------------------- 4⃣ *दर महिन्याला घरगुती गॅसचे दर वाढवण्याचा निर्णय मागे, आता दर महिन्याला घरगुती गॅसचे दर वाढवणार नाहीत.* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताने सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेने तामिळनाडूच्या 69 मच्छीमारांची सुटका केली.* ----------------------------------------------------- 7⃣ *मेलबोर्न : अ‍ॅलिस्टर कूकच्या विक्रमी द्विशतकी खेळीमुळे इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या अ‍ॅशेस कसोटीच्या तिस-या दिवशी पहिल्या डावात १६४ धावांच्या आघाडीसह सामन्यावर वर्चस्व मिळविले आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरी संपत्ती* अमित हा बँकेत कारकून.  त्‍याची पत्‍नी नयना प्राथमिक शाळेत शिक्षिका. दोघांनाही चांगला पगार होता. त्‍यांचं कुटुंब सुखी व समाधानी होतं, अमन व पूजा नावाची दोन गोंडस मुलं देवाने त्‍यांच्‍या पदरात दिली होती.  त्‍यांच्‍या जीवनात कोणत्‍याच गोष्‍टीची वाणवा नव्‍हती ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_37.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राजेश खन्ना* भारतीय चित्रपट अभिनेते राजेश खन्ना (जन्म: 29, 1942 - मृत्यू: 18 जुलै 2012) हे एक भारतीय बॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती केली तसेच राजकारणात प्रवेश केला. ते 1991 ते 1996 दरम्यान पाच वर्षांसाठी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून  कॉंग्रेसचे खासदार होते . त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त झाले. त्यांना काका या नावाने ओळखले जात असे. आनंद या चित्रपटातील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. 180 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे आणि 128 चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे आणि दुहेरी भूमिकांशिवाय 22 लघुपटांमध्ये 22 लघुचित्रपटही केले आहेत 1969 -71 मध्ये तीन वर्षांत, 15 एकटय़ा हिटमध्ये अभिनय करणे हा बॉलीवूड सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले.  त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आणि 14 वेळा नामांकन करण्यात आले. बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशनने हिंदी फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता पुरस्कार देखील चार वेळा सर्वाधिक नामांकीत केले आहे आणि 25 वेळा ते नामांकन करण्यात आले होते.  2005 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड मिळाले.राजेश खन्ना हिंदी सिनेमाच्या पहिले सुपरस्टार होते. त्यांनी 1966-1991 मध्ये 74 सुवर्ण जयंती चित्रपटांची निर्मिती केली. (गोल्डन ज्युबली हिट).  *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुफान प्रेम करणारी जितकी माणसं जोडाल, तेवढी घरं तुमची झाली. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) केंद्राने २२ भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?* 👉 भारतवाणी *२) अ. भा. म. सा. संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?* 👉 लक्ष्मीकांत देशमुख *३) इराकमधून कोणाचा नायनाट करण्यात आला आहे?* 👉 आयसीस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष हणमंतराव कंदेवार उपायुक्त, मनपा, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *उंटावरून* बरं वाटतं कोणालाही उंटावरून शेळ्या हकायला कसं कळलं नेमकं कोणाचं काय लागलंय दुखायला उंचावरून शेळ्या हाकुन काम व्यवस्थित होत नाही कोणी कितीही मोठा केलेला संकल्प तडिस जात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाभारतात 'सोनेरी मुंगूस' ही कथा आहे. महायुद्ध संपल्यावर पांडवांनी राजसूय यज्ञ केला. अन्नदान केले, आनंदोत्सव केला. इतक्यात भटारखान्यातून काही बल्लवाचार्य श्रीकृष्ण आणि पांडवाच्या तंबूत आले. दानासाठी जिथे अन्न शिजविले त्या निखा-यांमध्ये कुठूनतरी एक मुंगूस येऊन लोळू लागले. सर्वांगाला राख फासून घेऊ लागले. काही वेळाने निराश होऊन ते बाहेर आले. त्याची एक बाजू सोनेरी असून चमकत होती. पांडवांनी छेडताच ते म्हणाले... एका दुष्काळात एक ब्राम्हण कुटुंब उपासमारीने दिवस काढीत होते. एके दिवशी ब्राम्हणाला चार पोळ्या मिळाल्या. प्रत्येकाला एकेक पोळी मिळणार इतक्यात अतिथी आला. प्रथम ब्राम्हणाने, नंतर मुलाने, मग ब्राम्हणाच्या पत्नीने त्याला आपला वाटा दिला. तरीही अतिथी याचक वृत्तीने पहात राहिला.* *शेवटी ब्राम्हणाच्या गरोदर सुनेने आपला भाग दिला. तेथे काही अन्नकण पडले होते. ते मुंगूस अन्नासाठी तिथे फिरले. त्याची जी बाजू त्या कणांना लागली ती सुवर्णासारखी तेजस्वी झाली. ब्राम्हण कुटुंब 'अतिथी देवो भव' वृत्तीने संतोष पावले..पण भुकेने मरण पावले. ही गोष्ट सांगून मुंगूस म्हणाले,'तुम्ही यज्ञ करून पुण्यसंचय केलात, अन्नयाग करून कृतार्थ झालात. हे ऐकूण इथे माझे सर्वांग सोनेरी होईल या आशेने मी आलो. पण कसले काय! युद्धात तुम्ही असंख्य योद्धे मारलेत, कित्येक सुहासिनी विधवा झाल्या. कित्येक गावे निर्मनुष्य झाली आणि हे सारे अहंकार सुखविण्यासाठी केलेत. तुमचा जय निर्मळ, नितळ आणि निष्कलंक नाही. हे ऐकून पांडव खजिल झाले. गरीब ब्राम्हण कुटुंबाने स्वत:चा विचार न करता 'दातृत्व' हे मूल्य मानले. उलट पांडवांच्या दातृत्वात विजयाची नशा होती. श्रीकृष्णाला हे जाणवले, तेव्हा तो हसला. यांचा 'अहम' यांना वेळीच दाखवायला हवा होता, असे त्याला वाटले. सोनेरी मुंगसाने ते काम अचूक केले..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल. अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे. तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *कविता करणे* *कृती -* 1) शब्दाच्या शेवटी ळा हे अक्षर येणारे शब्द लिहा उदा. शाळा 2) प्रत्येक शब्द शेवटी असेल असे वाक्य तयार करा. उदा. ही माझी सुंदर शाळा. 3) चार वाक्य एकाच विषयी संबंधित असेल असे वाक्य एकत्र करा 4) अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी वाक्यात थोडा बदल करू या मात्र शेवटचा शब्दाचा शेवटी ळा असावा म्हणजे कविता पूर्ण होईल. 5) पाहू आत्ता शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यानी कविता कशी तयार केली ? ही माझी सुंदर शाळा तेथे मुले झाली गोळा शाळेत आहे मोठा फळा त्याचा रंग आहे काळा अजुन भरपूर कविता मुले करू शकतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुई आणि वाघ* एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, 'सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?' सुई म्हणते, 'हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. 'सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ? विंचवाला सुई म्हणते... 'हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते. 'सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का? सुई म्हणते 'हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल. सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात. थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो. शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

1 comment: