✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक. १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता. १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात, ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपुरात होतोय ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’, सलग तीन दिवस दरवळणार संत्रा, रंगारंग कार्यक्रम विविध स्पर्धा अन् पुरस्कारांचा पाऊस* ----------------------------------------------------- 3⃣ *राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, राहुलपर्वला सुरुवात* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधान परिषदेत गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब.* ----------------------------------------------------- 5⃣ *दाट धुक्यामुळे पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर आणि मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस आजपासून तीन दिनांक १२ ते १४ डिसेंबरपर्यंत रद्द* ----------------------------------------------------- 6⃣ *रणजी करंडकमध्ये विदर्भ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत, विदर्भानं केरळचा 412 धावांत उडवला खुर्दा* ----------------------------------------------------- 7⃣ *आशियाई नेमबाजी : भारतीय युवांनी केली २१ पदकांची लयलूट, आगामी युवा आॅलिम्पिकसाठी ‘कोटा’ही मिळवला* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहस कथा* सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं.  अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रजनीकांत* शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  ( डिसेंबर १२, १९५० ) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे.रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत प्रसिद्ध आहेत. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा,  कन्नड,  तेलुगू,  बंगाली  तसेच  इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील ('शिवाजी द बॉस' या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. 'शिवाजी द बॉस' चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. रोबोट हा सर्वात जास्त चाललेला चित्रपट आहे, ज्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) वजनमापांची प्रमाणित पध्दत कोणी सुरू केली?* 👉 नंदराजांनी *२) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली?* 👉 राजगृह *३) नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे काय होते?* 👉 धनानंद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली 👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर 👤 शुभानन गांगल, पुणे 👤 अशोक पाटील कदम 👤 समीर मुल्ला 👤 वतनदार पवनकुमार नारायण 👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 महेश शिवशेट्टी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अपयश* कारणं सांगणारे लोक नेहमी अपयशी होतात अपयशी ठरण्याला नवे नवे कारणं देतात कारणं सांगणाराला यश जवळ येऊ देत नाही यशाची विजय माला गळ्यात घेऊ देत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वत:चं मरण पाहता येत नाही, इतरांच्या मरण्यातूनच हा अनुभव येतो. मृत्यू अटळ आहे, हे कळलेलं असतं. मरण आपल्या जाणिवेत केव्हा प्रवेश करतं ? घरात, शेजारी जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा. प्रत्येकजण या अनुभवातून जातो. मग सुरू होते आपले मरणरंजन. मरणाचे भय वाटत नाही, पण मरावेसे वाटत नाही. इतकी वर्ष जगलो, खूप झाले. तरी अजूनही जगावेसे वाटते. याचे काय उत्तर देणार ? आपले अध्यात्म जन्म-मरणाचा फेरा चुकवायला सांगतं. हा फेरा चुकविणे म्हणजे 'मोक्ष'. हीच 'मुक्ती.'* *निद्रा म्हणजे मरणाची छोटी आवृत्ती असते. आपण निद्रा घेतो म्हणजे नेणिवेच्या प्रांतात सुखनैव संचार करतो. तिथे सुखदु:खाचे भान नसते. निद्रा-जागृतीचा हा खेळ आपण नेहमीच खेळतो. झोपेत स्वप्न पडतात, ती जागेपणी आठवतात. अर्थ इतकाच, की आपण संपूर्णपणे जाणिवेच्या बाहेर गेलेलो नसतो. निद्रा ही विश्रांती आहे म्हणून आपणांस तिचे भय वाटत नाही.* *मरण हीसुद्धा अशीच निद्रा आहे...पण ती अंतिम, चिरनिद्रा आहे. मरण ही वस्तुस्थिती आहे. मरणाची भितीदायक कल्पना दूर सारून मूळस्वरूप न्याहळणे म्हणजे 'मरणसौंदर्य' पाहणे. एखादे ज्ञानेश्वर किंवा तुकारामच हे करू शकतात. मरणातील मरणपण काढायचे तर मरणापाशी समरस झाले पाहिजे.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯. विचारवेध.........‌...✍🏼 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परमेश्वराने मानवास एक सर्वात मोठी देणगी बहाल करुन टाकली आहे.ती ही "मन " या माध्यमातून.पहाना आपण आपल्या सा-या जीवनाची सूत्रे मनाच्याच ताब्यात दिली आहेत.मन करील तीच पूर्व दिशा असे ठरलेले असते.परंतू आपल्या मनाला सशक्त आणि आनंदी ठेवण्याचे काम,त्या मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचे आणि योग्य दिशेने पाऊल टाकण्याचे काम आपल्यावरच परमेश्वराने टाकले आहे.मनाला चांगले वाईट करण्याचा आणि ठेवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे तो कसा ठेवायचा आणि जीवन कशाप्रकारे सुंदर जगायचे हेदेखील तुम्हाला तुमच्याच मनाने ठरवावे लागेल.हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्र्न आहे.परमेश्वराने स्वत:कडे काहीच ठेवले नाही हे मात्र खरे आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *अभिव्यक्ती*   दररोज परीपाठ झाल्यावर वर्गात आल्या आल्या फलकावर एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तीत जास्त वाक्ये लिह्ण्यास सांगावेत. थोड्या दिवसानंतर मुले खूप वाक्ये लिहू शकतील. लेखनाचाही  सराव होईल. अभिव्यक्तीला वाव मिळेल. उदा. *पाऊस- ?* मला पाऊस  आवडतो.     माझी  आई पावसाचे गाणे म्हणते . पाऊस आभाळातुन येतो. आज पण पाऊस आला. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस का शोध* एक दिन गाव की बाहर , नदी किनारे एक व्यक्ती लोहे की संकल गले में लटकाकर नदी की और बढ़ रहा था | किसीने पूछा ,”महाराज , कहाँ जा रहे हो?” उस व्यक्तीने कहाँ, “हमारे गुरदेव ने कहाँ है इस नदी की पत्थारोमे परिस भी मिलते है जिसके स्पर्श से लोहा सुवर्ण में बदल जायेगा | मै उस परिस की खोज करने जा रहा हूँ|” वह लोहे की संकल वाला व्यक्ति नदी की पानी में उतरा | नदिसे एक पत्थर उठाया और संकल को लगया | देखा कुछ परिवर्तन नहीं हुवा | पत्थर नदी में छोड़ दिया |फिर दूसरा पत्थर उठाया लोहे से स्पर्श करा के देखा, पत्त्थर नदी की पानी में छोड़ दिया | दो ,चार ,दस, बीस पत्थर पर वह अजमाते आगे बढ़ रहा था| एक घंटा हुवा , दो- तिन घंटे हुवे लेकिन परिस प्राप्त नहीं हुवा | परन्तु उसने अपना काम छोड़ा नहीं , वह शुरू रखा | शुरू सुरु में वह हर पत्थर को ध्यान से देखता था | लेकिन जैसा समय बढ़ते गया वैसे उसकी मन की एकाग्रता भंग हो गई |हात से पत्थर उठाना - लोहे से स्पर्श कराना - पत्थर पानी में छोड़ना .. यह क्रिया तो चल रही थी लेकिन मन और कुछ सोचने लगा था| 4-5 घंटे हो गए | उसका काम एक छोटा लड़का देखा रहा था | उसे उत्सुकता निर्माण हुई | उसने व्यक्ति के पास जा कर पूछा, “बाबा , क्या कर रहे हो ?” व्यक्तीने कहा , “लोहे को सोना बनाने वाला परिस ढूंड रहा हूँ |” बच्चे ने कहा ,” लोहा है कहाँ? संकल तो सोनेकी ही है?” व्यक्ति की तंद्री खुल गयी | उसके ध्यान में आया की लोहा तो सुवर्ण बन चूका था |लेकिन किस पत्थर से ? इस और उसका ध्यान ही नहीं था | क्रिया करते करते उसका हेतु ही वह भूल गया और बिना भाव के कर्मकांड करने लगा था | उसको अपनी भूल पर बड़ा दुःख हुवा लेकिन करता क्या ? समय निकल चूका था, परिस पानी के पत्थारोमे मिल चूका था | 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment