✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वातंत्र्य दिन - झांझिबार गोवा मुक्ती दिन 💥 ठळक घडामोडी :-  १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन. २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण. 💥 जन्म :- १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू. १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी. १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९५३ - रॉबर्ट अ‍ड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता. १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीत भाजपाचे निर्विवाद यश* ----------------------------------------------------- 2⃣ *भाजपावर दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल धन्यवाद, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या विकासासाठी पुरेपूर प्रयत्न करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 3⃣ *जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला.* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर : महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या 123 शाळा व कर्मशाळेतील विद्यार्थ्यांना परिपोषण व कर्मचा-यांना त्वरित पदमान्यता देऊन वेतन सुरू करण्यात यावे, कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णींची मागणी.* ----------------------------------------------------- 5⃣ *गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजयासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन* ----------------------------------------------------- 6⃣ *सिंधुदुर्ग : महामार्ग विस्थापितांना योग्य मोबदला द्या, नागपुरात धरणे आंदोलन, शिवसेनेच्या आमदारांची आग्रही मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *हरवलेले डोळे* शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्‍या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं.  गावापासून जवळपास पन्‍नास कि.मी. वर जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्‍वेस्‍थानक असल्‍यामुळे रोज रेल्‍वेचा प्रवास ठरलेलाच.  रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्‍याचा नित्‍यक्रम.  त्‍यामुळे रेल्‍वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्‍या डब्‍यापुरते.  मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्‍यामुळे खुप अभ्‍यास ........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4578780729835520 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *आर के लक्ष्मण* रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण  ( थोडक्यात आर लक्ष्मण , 24 ऑक्टोबर 192l - 26 जानेवारी 2015 ) आघाडीच्या लेखक आणि भारत व्यंगचित्रकार होते. ते कॉमन मॅन त्याच्या निर्मिती आणि म्हणतात टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या दैनंदिन मालिका लिहिण्याची व्यंगचित्रे 1951 मध्ये सुरुवात केली. लक्ष्मण यांचा जन्म 1 9 21 साली म्हैसूर येथे झाला . त्यांचे वडील प्राचार्य होते आणि लक्ष्मण त्यांच्या छोट्या मुलांपैकी सर्वांत लहान होते.  एक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध. लक्ष्मण पेड पापर ऑफ दिल्ली ( दिल्लीच्या चिठ्बुरा मुरलीवाला ) प्रसिद्ध आहे *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)२०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला?* 👉 कराटे *२) सध्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कोण आहेत? 👉 डी. के. शर्मा *३) घटना परिषदेची पहिली बैठक कोठे झाली?* 👉 दिल्ली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर 👤 शंकर जाजेवार, येताळा 👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बाजींदे* जो माणूस शब्द देऊन मोठ्या ऐटीत मिरवतो तोच माणूस पुन्हा सहज आपला शब्द फिरवतो शब्द देऊन फिरवणारे मोठे बाजिंदे असतात चार माणसांत मात्र ते मिंधे होऊन बसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणत्याही गोष्टीचे सखोल चिंतन चांगले काम करण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे जाणिवा तर समृद्ध होतातच; पण समजही वाढत जाते. कळण्याची पातळी उंचावते आणि जगण्यातही आनंद निर्माण होऊ लागतो. आनंद आला की सौंदर्य आले. अशी ही श्रृंखला आहे. त्यात धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावाने अडसर तयार करणे आनंद मिळविण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. त्यामुळे शरीरस्वास्थ्याचा, मन:स्वास्थ्याचा आणि परिणामी समाजस्वास्थ्याचा विचार करताना आकाशासारखा व्यापक गुणधर्म ठेवायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.* *त्यासाठी रोजच्या वेळेतील सकाळची अगदी दहा मिनिटे स्वत:ला द्यावीत. त्यात सुरूवातीची तीन मिनिटे काल काय केले आणि काय राहिले याची उजळणी, पुढची दोन मिनिटे त्यात झालेल्या चुका आणि उरलेली पाच मिनिटे आज काय करायचे याला द्यायला हवीत. त्यात काल ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न होऊ देण्याविषयी स्वत:ला बजावायला हवे. तरच निश्चयाने पाऊल पुढे टाकता येईल. अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या' किंवा 'जन्माला आला.....' या दोन प्रसिद्ध म्हणी आपल्यासाठीच आहेत असे समजायला हरकत नाही.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• 🌱⚜⚜⚜🌱⚜⚜⚜🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना आशेचे पंख आहेत ते नक्कीच सुखी जीवनाचा मार्ग शोधून जीवन जगण्यासाठी तत्पर असतात. त्यांची महत्वकांक्षाही जबरदस्त असते.ते आपल्या जीवनातही निश्चितपणे यशस्वी होतात.परंतु ज्यांची कोणतीच इच्छा नसेल तर ते सुखाने जीवन जगण्याचे स्वप्न पाहत असतील तर ते कधीच सुखाने जगू शकत नाहीत.या जगात प्रयत्नाशिवाय कुणालाही काही प्राप्त झालेले नाही. प्रयत्नही आशारुपी ठेवून त्या मार्गाने सातत्याने मार्गक्रमण केल्यास नक्कीच जीवन सुखावह होईल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे. मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विकल्प* 🐜मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..! 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment