✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) - बल्गेरिया. मातृ दिन - पनामा. संविधान दिन - रोमेनिया. 💥 ठळक घडामोडी :-  १९१४ - पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध - कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटीश नौदलावर हल्ला चढविला. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले. १९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला. १९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार. 💥 जन्म :- १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान. १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित; पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त वक्तव्य भोवले. काँग्रेसने बजावली कारणे दाखवा नोटीस* ----------------------------------------------------- 2⃣ *विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय, प्रसाद लाड यांना मिळाली 209 मतं* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक- नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जेन या चार ठिकाणी भरणार कुंभमेळा यूनोनोस्कोच्या यादीत समाविष्ट झाला आहे, गेल्या दोन वर्षापासून खासदार हेमंत गोडसे, त्रबकशेअर मंदिर विश्वस्त ललिता शिंदे प्रयत्नशील होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *गडचिरोली- दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण* ----------------------------------------------------- 5⃣ *जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.* ----------------------------------------------------- 6⃣ *एसटी महामंडळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार, शयनयान(स्लीपर) शिवशाही सज्ज, 150 शिवशाही मार्च अखेर एसटी मध्ये दाखल होणार* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद: राष्ट्रीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाने पाच गटांमध्ये अंतिम फेरीत मारली धडक. चंदीगड, तमिळनाडू या राज्यांच्या संघांनी गाठली अंतिम फेरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= कानमंत्र *शाळेने तारला संसार* सर वर्गात आले. हजेरी घेतली. सर्वांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या टेबलावर ठेवल्या. सरांनी सर्व वह्या तपासून कोणाचे काय चुकले हे सांगत वही परत करत होते. नाव घेऊन बोलावत होते आणि वही देत होते. शेवटी गृहपाठाची वही कोण आणले नाही त्यांना उभे राहायला....... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *हेमंत कानिटकर* कानिटकर यांनी दोन कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७४मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या कानिटकर यांनी पदार्पणातच विंडीजसारख्या तगड्या संघाविरुद्ध ६५ धावांची खेळी केली होती. दोन कसोटींत त्यांनी २७.७५च्या सरासरीने एकूण १११ धावा केल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी अमिट ठसा उमटविला. डिसेंबर १९६३ मध्ये सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्याद्वारे कानिटकर यांनी रणजी पदार्पण केले होते. या सामन्यांत त्यांनी नाबाद १५१ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा मान दोन वेळा मिळविला. १९७०-७१च्या मोसमात कानिटकर यांनी प्रथम श्रेणीतील नऊ सामन्यांत ८६.७७च्या सरासरीने ७८१ धावा केल्या होत्या. त्यात रणजीमधील सात सामन्यांत त्यांनी ९८.१४च्या सरासरीने ६८७ धावा केल्या होत्या. त्या जोरावरच महाराष्ट्राने १९७०-७१च्या रणजी मोसमात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. नेहरू स्टेडियममध्ये मार्च १९७१मध्ये झालेल्या राजस्थानविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी २५० धावांची खेळी केली होती. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर १९७१-७२च्या मोसमात ५१.६०च्या सरासरीने ५१६ धावा, १९७२-७३च्या मोसमात ५६.४५च्या सरासरीने ६२१ धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना १९७४मध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. १९६३ ते १९७८ दरम्यानच्या आपल्या प्रथण श्रेणीतील कारकीर्दीत कानिटकर यांनी ८७ सामन्यांत ४२.७८च्या सरासरीने तेरा शतके आणि २३ अर्धशतकांसह ५००६ धावा केल्या. तसेच, यष्टीरक्षक म्हणून ८७ विकेट्स मिळविल्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉 वर्धमान महावीर *२) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉 कुंडलपूर *३) वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉 इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विजय सूर्यवंशी, चिखलहोळ पत्रकार - फोटोग्राफर 👤 अनिल सुत्रावे, सहशिक्षक हु. पानसरे हायस्कुल, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसतं तसं नसतं* मूल्य संस्कारावर जे भरभरून बोलतात मंचावरून बोलणारे खरंच किती पाळतात बोलण्यात अन् वागणं कुठेच ताळमेळ नसतो दिसतं तसं कुठं नसतं हाच खरा घोळ असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खेड्यात आठवड्याचा एखादा दिवस देवाचा समजून पाळण्याची प्रथा आहे. त्या दिवशी शेतातील सर्व कामे बंद असतात. तो मोडणा-याला दंड बसतो. नडीचे काम निघाले तर देवाला नारळ ठेवून व पंचांना पूर्वकल्पना देऊन औत, गाडी वगैरे जोडायची मुभा असते. त्याला 'पाळीक दिवस' असे म्हणतात. युरोप-अमेरिकेत आठवड्याचा शेवटचा दिवस (विकेंड) मौजमजा करण्यासाठी असतो. ज्याला जे वाटेल, पटेल ते करायला, पार्ट्या, पिकनिक किंवा मुशाफिरी करता येते.* *वर्षभरात मातृ, पितृ, शिक्षक, रोझ, एड्स, व्हॅलेटीन असे वेगवेगळे 'डे' साजरे केले जातात. अशा परिस्थितीत 'नो घटस्फोट डे' असा दिवस साजरा करायचे एखाद्या देशाने ठरविले तर..? त्या दिवशी कुणाचीही सोडचिठ्ठी-घटस्फोटाचा अर्जच घ्यायचा नाही. असा एक पाळीक दिवस 8 जुलै रशियातील नोव्हगोरोद प्रदेशात आहे. 'व्हॅलेंनटीन डे' च्या तोडीचा हा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. लग्नगाठ बांधायला महत्व दिले जाते. शुभमंगल विवाह करणे भाग्याचे समजले जाते.* *कुणाच्या तरी डोक्यातून आफलातून आयडिया निघते, समाज ती स्विकारतो. त्यामुळे घटस्फोट फार कमी होतील असे नाही... पण काडीमोडांच्या प्रकारावर किमान एक दिवस विचार करायला मिळेल. काही डोकी थोडीतरी थंडावतील. लग्नाचे आयुष्य एक दिवसाने वाढेल... तडजोड झालीच तर आनंदच आहे..!* •••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●••• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्या गडावर चढतांना जेवढे शारीरिक कष्ट लागतात त्यापेक्षा गडावरुन खाली उतरताना लागत नाही. त्याचप्रमाणे एखादा हाती घेतलेला नवीन उपक्रम असेल तर तो सुरवातीला अवघड वाटतो.कारण त्यात असलेले तंत्र,हाताळत असताना येणा-या अडचणी, त्याबद्दलची शास्त्रशुध्द माहिती प्रात्यक्षिक करत असताना सुरवातीला अवघड जाते.अशावेळी जणू काही आपण गड चढतच आहोत असेच वाटते.पण नंतर जसजसा सराव होत जाईल तसतसा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सहज आणि सुलभ होत जातो.ज्याप्रमाणे आपण जसा गड सहजरित्या उतरतो आहोत असेच वाटायला लागते.त्याप्रमाणेच कोणत्याही कामात यश प्राप्त करायचे असेल तर पहिल्यांदा मनाची तयारी करायची, आत्मविश्वास वाढवून काम संपेपर्यंत तसाच ठेवायचा,त्यानंतर कामात एकाग्रता ठेवायची आणि काम पूर्ण करायचे. अशी कृती जर सातत्याने करीत राहिली तर आयुष्यातले कोणतेही अवघड कामाचे गड सहजपणे चढून यशस्वीपणे जिंकता येतील यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *शब्दात लपलेले शरीराच्या भागांची नावे शोधणे* वेगवेगळ्या नावाच्या शब्दपट्टया तयार करुन घ्या दुकान, हकनाक, पाठवनी, सगळा, कानस, पायरी, पाठक, मुंगळा,उपाय,नाकतोडा, गालबोट, पाठपोट, नखरा,कानाडोळा,कपाळकरंटा,तोंड -पाठ,पायपोस्,तोंडसुख,मानव, समान, डोकेबाज,भटजी ईत्यादी शब्द मुलांना गटात किंवा प्रत्येकाला देवून त्यातीलशरीराच्या भागांची नावे शोधण्याची कृती मुलांकडून करुन घ्यावी .  *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मां की सीख* इंग्लैंड में एक मरणासन्न मां ने अपने पुत्र से कहा - मुझे इस बात का अफसोस है बेटा कि मं तुझे पढ़ा न सकी और अब तो मेरे पास ज्यादा समय भी नहीं है। तेरे लिए कुछ नहीं कर सकती। यह समझ ले कि अब तेरे लिए सारा संसार ही पाठशाला है। तुझे जहां से जो मिल सके, वहां से सीखना, वही तेरे काम आएगा। उसी से तुझे रोशनी मिलेगी। यह कहकर मां ने हमेशा के लिए आंखें मूंद लीं। बेटा देखता रह गया। अपने भीतर उमड़ रहे आंसू को उसने रोका। उसने मां की सीख गांठ बांध ली। अपने दादा जी को पत्थर तोड़ते देख वह पत्थर तोड़ने का काम करने लगा। इस संबंध में जब उसका ज्ञान एक खास स्तर तक पहुंच गया तो वह गोताखोरी करने लगा और उसने समुद्री चट्टानों के विषय में पर्याप्त जानकारी हासिल कर ली। इसके बाद उसने संगतराश के घर नौकरी कर ली और पत्थरों के गुणों का अध्ययन करने लगा। धीरे-धीरे लाल पत्थर के बारे में उसका ज्ञान एक ऊंचाई तक पहुंच गया। वह उसका विशेषज्ञ माना जाने लगा। तब उसने अपने अनुभवों को लिखना शुरू किया। रात-दिन एक कर लिखता रहा। फिर वह अपने अनुभव लोगों से बांटने लगा। उसकी बातें सुन लोग आश्चर्यचकित रह जाते थे। धीरे-धीरे उसकी ख्याति फैलने लगी। पहले अपने देश में फिर उसके बाहर भी उसे लोग जानने लगे। वह समूचे विश्व में चर्चित हो गया। यह बालक और कोई नहीं ह्यू मिलर था, जो अपनी मां की सीख के कारण विश्वप्रसिद्ध भूगर्भशास्त्री बना। उसने साबित किया कि किताबी ज्ञान से कहीं ज्यादा महत्वपूर्ण है जीवन के अनुभवों से अर्जित ज्ञान। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment