✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. 💥 जन्म :- १९५९: फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत १९०३: प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे १९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती  💥 मृत्यू :-  १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी १९९७: भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम १९९७: सनईवादक पं. प्रभाशंकर गायकवाड *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन यापुढे डिसेंबर ऐवजी जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर गांभिर्याने विचार केला जात आहे. संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपूर येथे दिली माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - ओबीसी आयोगाचा कार्यकाळ 12 महिन्यांनी वाढविण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर - २०११ पर्यंतच्या झोपड्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर दिले जाईल - मुख्यमंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *देशातील पहिल्या रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठाच्या स्थापनेस कॅबिनेटची मंजुरी, गुजरातमधील बडोदा येथे स्थापन होणार विद्यापीठ* ----------------------------------------------------- 5⃣ *कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला पाकिस्तानने आज जारी केला व्हिसा* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ : शासकीय कृषी महाविद्यालयाची यवतमाळची मागणी पूर्ण होणार. शासनाला महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात येतील. - राज्यपाल* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका पहिला टी-20 सामन्यात भारताचा लंकेवर 93 धावांनी विजय, यजुवेंद्र चहलने या सामन्यात चार विकेट घेत अफगाणिस्तानच्या रशिदचा विक्रम मोडला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *हरवलेले डोळे* शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्‍या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं.  गावापासून जवळपास पन्‍नास कि.मी. वर जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्‍वेस्‍थानक असल्‍यामुळे रोज रेल्‍वेचा प्रवास ठरलेलाच.  रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्‍याचा नित्‍यक्रम.  त्‍यामुळे रेल्‍वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्‍या डब्‍यापुरते.  मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्‍यामुळे खुप अभ्‍यास ........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4578780729835520 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *के श्रीकांत* कृष्णम्माचारी श्रीकांत हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आहेत. ते 21 डिसेंबर 1959 रोजी मद्रास , चेन्नई येथे जन्मले होते . त्याचा मुलगा अनिरुद्ध श्रीकांत एक क्रिकेटपटू आहे जो चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद साठी खेळतो. श्रीकांतही भारताचे कर्णधार होते. ते चिका या नावाने ओळखले जात असे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ७८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीट्ग ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले?* 👉 सायली वाघमारे *२) आयपीएल लीगमधील 'किंग्ज इलेव्हन पंजाब'च्या प्रशिक्षणपदी कोणाची नियुक्ती झाली?* 👉 ब्रॅड हॉज *३) राष्ट्रमाता जिजाऊचे जन्मस्थान कोणते?* 👉 सिंदखेडराजा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मन्मथ खंकरे 👤 श्रीमती माणिक नागावे 👤 गजानन गायकवाड 👤 संभाजी तोटेवाड 👤 जयश्री सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *ऊर्मी* संकटावर मात करण्याची ज्याची त्याच्यात गुर्मी असते प्रत्येक जीवात जगण्याची एक सुप्त ऊर्मी असते जगण्याची ती ऊर्मी फक्त टिकवता आली पाहिजे तापलेली कांबी हवी तशी वाकवता आली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते.* *'तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमची वाणी स्पष्ट,चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चढता उतरता क्रमाची लगोरी* कृती - लगोरीमध्ये दहा ठोकळे असावेत.सर्वात लहान ठोकळ्यावर बाजुने गोलाकार वेगवेगळ्या रंगात  १०,२०,३०,४०,५०....अशाप्रकारे १०० पर्यत अंक लिहावेत.त्यानंतरच्या ठोकळ्यावर त्याच रंगाच्या क्रमाने  ९,१९,२९३९,.....९९ व अशा प्रकारे सर्वात मोठया ठोकळ्यावर १,११,२१,३१,.....९१ असे अंक येतील. नियम - १)  लगोरी लावतांना सर्वात मोठा ठोकळा हा सर्वात खाली रचला जातो.त्यानंतर लहान लहान ठोकळे रचले जातात. २) त्यामुळे सहाजीकच अंकाचा क्रम वर चढता येतो. ३) ठोकळे रचतांना १,२,३...अश्या चढत्या क्रमानेच रचणे आवश्यक असतील. ४) एकदा लगोरी लागल्यानंतर पुढे त्याच ठोकळ्यावरिल १,११,२१,हे क्रमांक एकावर एक येतील असे रचावे लागतील. ५) अशाप्रकारे जश्या जश्या लगो-या लागतील. लगोरीच्या वरिल क्रमांक पुढे पुढे वाढत जातील. ६) लगोरी पूर्ण न लागताच बाद झाल्यास त्याच क्रमांकानुसार परत लगोरी लावावी लागणार *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वभाव* एक शेतकरी नेहमी शेजार्‍याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे. त्यामुळे तो कोणालाही आवडेनासा झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला मुंगीचे स्वरूप दिले. त्यामुळे त्याचे रूप बदलले, परंतु दुसर्‍याचे धान्य चोरून नेऊन साठा करण्याची त्याची सवय मात्र बदलली नाही. तात्पर्य - कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment