✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महापरिनिर्वाण दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले. १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार. २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 💥 जन्म :- १८६१: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक  १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा. १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ. २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, मुंबईवरील धोका टळला* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी मुंबई- बँक ऑफ बडोदा दरोड्याप्रकरणी 11 आरोपी अटक, 3 कोटी 43 लाखांच्या दागिन्यांपैकी 1कोटी 38 लाखांचे दागिने हस्तगत* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील वत्सलाबाई जोशी पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना जाहीर* ----------------------------------------------------- 5⃣ *राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या नव्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. या प्रोत्साहनापोटी राज्य शासन ६४८ कोटी रुपये खर्च करणार आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *खुल्या प्रवर्गातील पदोन्नती सुरू करण्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. त्या बाबत विभागाने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली कसोटी - भारत विजयापासून सात पावले दूर, चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 3 बाद 31 धावा, भारताने श्रीलंकेला विजयासाठी 410 धावांचे दिले लक्ष्य* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• *शिका संघटित व्हा संघर्ष करा* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/dr-babasaheb-ambedkar.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक* नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे दि. ६ डिसेंबर, इ.स. १८६१ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभूत असल्याची समजूत झाली. मुळात ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते. वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. नागपूर येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना बायबल वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. १० फेब्रुवारी इ.स. १८९५ या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. इ.स. १८९५ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत. दि. ९ मे इ.स. १९१९ रोजी टिळकांचे निधन झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते............ *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 ६ डिसेंबर *२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले?* 👉 ६ डिसेंबर १९५६ *३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली?* 👉 १४ ऑक्टोबर १९५६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 डी. आर. भोसके, येवती 👤 अशोक हिंगणे 👤 शंकर बोंबले 👤 कैलास सोनकांबळे 👤 बालाजी गैनवार, चिकना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *घोळ* कोण चोर कोण साव सगळाच येथे घोळ आहे सावां पेक्षा ईथे सारा चोरांचाच मेळ आहे प्रथम दर्शनी कोणीही कोणाला थोर वाटतात ईथे सावां पेक्षा जास्त कोणालाही चोर भेटतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* •••●🔆‼ *रामकृष्णहरी* ‼🔆●••• *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सर्व काही मिळवता येते,परंतु दुस-याचा विश्वास मिळवता येते कठीण आहे. त्यासाठी पहिल्यांदा दुस-याच्या विश्वासासाठी आपण आपल्या विश्वासावर प्रामाणिक असणे आवश्यक आहे.त्यामध्ये खोट असू नये. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *ओंजळीने ग्लास भरणे* मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १०–१२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्येनुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणीओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेऊन  त्यांना आपला ग्लास भरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment