✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमद्भगवत गीता जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. १९३५ - आनंद यादव, मराठी लेखक. 💥 मृत्यू :-  २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोपर्डी प्रकरणातील तिन्हीही दोषींना फाशीची शिक्षा. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे सह भवाळ, भैलुमेला फाशीची शिक्षा.* ----------------------------------------------------- 2⃣ *कोपर्डीच्या निकालानंतर पीडितेला न्याय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. उज्ज्वल निकम यांचं केलं अभिनंदन.* ----------------------------------------------------- 3⃣ *शिर्डीच्या साई संस्थानासाठी दोन महिन्यात नवे विश्वस्त मंडळ स्थापन करा - न्यायालय* ----------------------------------------------------- 4⃣ *राज्यात थंडीचा कडाका वाढला. निफाडला आत्तापर्यंत सर्वात कमी 9.6 तापमानाची नोंद. तर नाशिकमध्ये 10.8, मालेगावात 13.6 आणि वर्ध्यात 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद* ----------------------------------------------------- 5⃣ *मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत 24 आणि 25 डिसेंबर ला भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती* ----------------------------------------------------- 6⃣ *ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी महसूल विभागाने पालघर येथे पार पडलेल्या कोकण विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक* ----------------------------------------------------- 7⃣ *बीसीसीआयने अनौपचारिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची 10 नंबरची जर्सीची केली निवृत्ती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. जगदीशचंद्र बोस* पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २०२० साली होणारे ऑलिंपिक कोणते देशामध्ये होणार आहेत?* 👉 जपान *२) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?* 👉 झेलम *३) हेमाडपंत या मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?* 👉 यादवांचा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली 👤 राजेश्वर येवतीकर, येवती 👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा 👤 रवी बुगावार, धर्माबाद 👤 देविराज पिंगलवार, भोकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *भाषा* कधी रागाची कधी लोभाची भाषा आहे लोभाची भाषा बोलली म्हणजे आशा आहे आशा असली म्हणजे बरोबर बदलते भाषा भाषा बदल करते ती मानवी मनाची आशा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नव्वदीनंतर जन्माला आलेली आजची तरूण पिढी प्रामुख्याने घरातील विभक्त कुटुंबपद्धतीत वाढली. एकुलतं एक मूल असणं आणि आई-वडिल दोघांचीही नोकरी या विशिष्ट रचनेमुळे पालकांच्या सर्व आशा आणि प्रयत्न त्या एकट्या मुलावर केंद्रित झाले. ज्याचा मोठा परिणाम त्या लहान मुलाच्या मानसिकतेवर, किंबहुना व्यक्तिमत्वावर झाला. परिक्षेतील यशामुळे झालेल्या कोडकौतुकानं त्या मुलाला जसं प्रोत्साहित केलं; तसंच काही प्रमाणात कधीतरी किंवा बरेच वेळा अपयशाला सामोरं जावं लागल्यास होणारा अस्विकार किंवा त्रास लहान वयातच खच्चीकरण करणारा ठरला. नकाराचा स्विकारही ही पिढी सकारात्मकतेने करते का ? हे सुद्धा महत्वाचे आहे.* *यश मिळविल्यानंतर कोडकौतुकाला सातत्यानं सामोरी गेलेली एकुलती एक मुलगी वैवाहिक आयुष्यात तेच यश चाखेल असं नाही. तिच्या सतत 'परफेक्ट' बनण्याच्या धडपडीत ती जास्त आग्रही किंवा दुराग्राहीसुद्धा होऊ शकेल. आजची पंचविशीत असलेली पिढी खरंच स्वत:ला, स्वत:च्या भावना आणि दृष्टीकोन यांना ओळखते का ? बरेचदा भौतिक सुखाच्या मागे लागून माझा पगार, माझं कुटुंब आणि मी यातच त्यांच जीवन गुरफटताना दिसतं त्यांच करिअर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर अतिक्रमण तर करत नाही ना ? आजच्या जमान्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा 'व्हर्च्युअल डायलाॅग' आधिक वाढतोय. पण तो खराखुरा संवाद आहे की वेगळंच काही ? हे स्वत:शी तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात यश आणि अपयश हे आपल्या कर्मानुसार अथवा कृतीनुसार मिळत असते.जर तुम्ही तुमच्या निवडलेल्या कामात मन लावले आणि एकाग्रता ठेवली तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडले जाऊ शकते. त्याबरोबरच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.जर का तुम्ही कामात कामचुकारपणा केला की,नक्की समजून घ्या तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे. म्हणून यश अपयश मिळवणे हे आपल्या करणा-या ब-यावाईट कर्मानुसार मिळत असते.मग आपणच ठरवावे की,आपण जीवनात यशस्वी व्हायचे की अयशस्वी ..! *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *वात्सल्याचा कणा* (८क्षरी) आई माहेराची शक्ती देई जगण्याला बळं.. लेख सुखात नांदावी तिच्या आसवांची गळं.. माझ्या सुखाचा विसावा तिचा फाटका पदरं... डोळे भरून निरोप, मनी दगडाचा भारं... हक्क आईचा जेवढा देते वटीच भरून... माझ्या संसाराची चिंता आई सारते दुरून. . लेख हसावी ,रूसावी सौख्य भरून दिसावी.. भोग सासरी सोसत कूसं उजळून यावी.. डोळे भरले पाहून तिचा हात तोंडावर... नको रडू सातीसांजी पाणी कुंकू वाटावर... जीव लाव लेकरांना सांगे ममतेचा पान्हा... माय लेकीच्या नात्याने जगी वात्सल्याचा कणा... (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या *शेतीमाती* संग्रहातून..) ✍🏻 अशोक क. गायकवाड पारळकर, वैजापूर, औरंगाबाद 8390795676 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment