✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/12/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर. १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म 💥 मृत्यू :-  १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : बडोदामध्ये होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा विजय* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर: आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 19 विधेयकं मांडली जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *राहुल गांधी 16 डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 4⃣ *पुण्यात थंडीचा कहर, तापमान कमाल २९.६ तर किमान १६ अंश सेल्सियसवर पोहोचले* ----------------------------------------------------- 5⃣ *महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा अशी मागणी जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना देण्यात आले निवेदन* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड हॉकी लीग 2017 मध्ये जर्मनीचा 2 - 1नं पराभव करत भारतानं जिंकलं कांस्यपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारताचा 7 विकेट्सने केला पराभव, या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा 1581 लोकांनी ही कथा ऑनलाईन वाचन केले आहे. आपण ही वाचावे. *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वनाथन आनंद* विश्वनाथन आनंद हा भारत बुद्धिबळ खेळाडू आहे, इंटरनॅशनल ग्रँडमास्टर आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. विश्वनाथन आनंदचा जन्म 11 डिसेंबर 1 9 6 9 रोजी झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळपटू. आनंदने पाच वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकले आहे आणि एक अविवादित विजेता आहे. विश्वनाथन आनंद 2003 च्या फिडे वर्ल्ड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनले आणि त्याला आपल्या काळातील क्रीडा खेळाडू म्हणून ओळखले जाते. 1988 मध्ये विश्वनाथन आनंद भारताचे ग्रँडमास्टर झाले. त्याला प्रथम राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हा भारताचा सर्वात सन्माननीय क्रीडा पुरस्कार आहे (1991-92). विश्वनाथन आनंद यांना 2007 मध्ये भारताचे दुसरे सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषण प्रदान करण्यात आले होते, ज्यावरून ते या पुरस्कारासाठी भारतीय इतिहासात प्रथम खेळाडू ठरले. आनंदने चेस ऑस्कर जिंकला 6 वेळा (1 997, 1998, 1998, 2003, 2007, 2008). नोव्हेंबर 2010 मध्ये आनंद पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला, परंतु त्याला परत कार्ल्सनला परत करावे लागले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?* 👉. १८८५ *२). राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?* 👉. ॲलन ऑक्टेव्हियन ह्युम *३). पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते?* 👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 इलियास शेख, सर्पमित्र व शिक्षक जि. प. हायस्कुल जारीकोट 👤 प्रा. नितीन दारमोड, समाजभूषण संस्थापक व अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान 👤 दस्तगीर सय्यद शिक्षक व निवेदक 👤 दीपक पाठक, परभणी 👤 आकाश सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *तडजोड* देण्या घेण्याच्या मुद्द्यावर एकमेकांशी जोडले जातात देणी घेणी बिघडली की संबंध तोडले जातात देण्या घेण्या शिवाय ही माणूस म्हणून संपर्क असावा मतलबा पुरता फक्त द्वेष किंवा आदरभाव नसावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* विद्यार्थ्याना इंग्रजीतून दिलेल्या सूचना समजत नाही. कृती करताना चुकतात, त्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे हा उपक्रम राबवावासा वाटला. 🌀Leader says🌀 हा उपक्रम राबविताना सर्वप्रथम शिक्षकांनी इंग्रजीतील इ.१लीते४थी पर्यंतच्या सूचनांची यादी बनवली. त्यातील सर्व सूचनांच्या पट्ट्या बनवल्या. शिक्षकांनी प्रथम कृती करून दाखविली व सराव घेतला. जे विद्यार्थी निरीक्षणातून योग्यप्रकारे सूचना पालन करून कृती करतात. विसरत नाही. (stand up,sit down,go back,come forward) इ.सर्व सूचना लक्षात ठेवतात. त्यांना leader बनण्याची संधी दिली. त्यामुळे मुले आनंदाने खेळत सहभागी होतात,कृती करतात लक्षात ठेवतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यायामाचे महत्त्व* विनित आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने 'हुर्रे' ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी ठीक सात वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करुन आणली होती. साडे आठला गाडीतच सगळयांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले. विनितनेही डब्यात आणलेला शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. अनिकेत मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ''मुलांनो उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोगंर चढायचा आहे." मुलं तर काय तयारच होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना '' हर हर महादेव'' म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते. जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोडया मुलांमध्ये शिल्लक होता अपवाद फक्त विनितचा! तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनितच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर सार्‍यांनी फिरुन डोंगर आणि लेणी पाहिली. संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, ''आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विनित. असं का माहिती आहे का? " मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या. टिचरांनी कारण समजावत सांगितले, "विनित अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकूर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल". "कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना? "मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment