✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :-  १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 💥 जन्म :- १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह  १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम १९७८: अभिनेते रितेश देशमुख 💥 मृत्यू :-  १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर २०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर - राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली, आजपासून राहुलपर्व ला सुरुवात* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - 2009 कोळसा घोटाळा प्रकरण, विशेष सीबीआय न्यायालायने मधू को़डा यांना दिली तीन वर्षांची शिक्षा.* ----------------------------------------------------- 3⃣ *संत्र्याला प्रक्रियेच्या माध्यमातून शाश्वत मार्केट मिळेल, नोगाचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, शासन 49 टक्के भागीदारी करेल - देवेंद्र फडणवीस.* ----------------------------------------------------- 4⃣ *मिझोराम हे अतिरिक्त ऊर्जा असलेले ईशान्य भारतातील तिसरे राज्य ठरले आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 5⃣ *उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन आणि 35 हजार रुपये दिला जाणार आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन ; सिंधूची फायनलमध्ये धडक, चीनच्या चेन युफायचा केला पराभव* ----------------------------------------------------- 7⃣ *पायाला दुखापत झाल्यामुळे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेणार नाही.* ------------------------------------------------------ *विशेष बातमी : काव्यांगण प्रतिष्ठान कडून यवतमाळ मध्ये आज राज्य स्तरीय काव्य महोत्सव, महिलांनी आयोजित केलेले पहिलेच काव्य संमेलन, महाराष्ट्रातील 250 हुन अधिक कवीचा यात समावेश असल्याची माहिती अध्यक्ष प्रीती माडेकर यांनी दिली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा 2000 च्या वर वाचक मित्रांनी वाचलेली लघुकथा *🏍 ... लिफ्ट  ....🛵* सहसा गाडीवार एकटे जाणे कधीच आवडत नाही. त्यामुळे कोणी लिफ्ट मागितली की नक्की त्यांना घेतो. मग गप्पा मारता मारता नियोजित ठिकाणी सहज पोहचता येते. तरी लिफ्ट देताना खुप विचार करावा लागतो, जसे की वयोवृद्ध किंवा ज्याला गाडी वर बसता येत नाही अश्याना लिफ्ट देणे शक्यतो टाळावे कारण करायला जावे चांगले काम आणि व्हावे भलतेच. म्हणून ती काळजी घ्यावी. महिला आणि तेही लेकुरवाळी यांना लिफ्ट........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/6152406281224192 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ======== *यशवंत गोपाळ जोशी* य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) (१७ डिसेंबर, इ.स. १९०१:भिगवण, भारत - ७ नोव्हेंबर, इ.स. १९६३:पुणे). हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या.. प्रसाद प्रकाशाचे कै. मनोहर उपाख्य बापूसाहेब जोशी हे य. गो. जोशी ह्यांचे चिरंजीव. कै. श्रीमती श्यामला (शांता) बेडेकर , श्रीमती.सुमन (स्वाती)पेंडसे,श्रीमती उर्मिला भावे, सौ.अंजली पेंडसे , कै. श्रीमती मंगल नगरकर आणि सौ. अनुराधा (पुष्पा) देसाई ह्या त्यांच्या कन्या . य.गो. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला. हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले. जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेले लोढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती. ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्‍निक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे. य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणार्‍या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मन:स्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?* 👉 विसर्ग संधी *२) लोकसभा सभापतीची निवड कोण करते?* 👉 लोकसभा सदस्य *३) सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?* 👉 कार्ल लिनिअस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुधीर येलमे, संपादक सा. इंद्रधनुष्य टाइम्स 👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद 👤 केशव कदम 👤 नारायण मुळे, धर्माबाद 👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी 👤 दिगंबर बेतीवर, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *उदयास्त* एकाचा उदय तर एकाचा अस्त असतो उदय अन् अस्तचा संबंध रास्त असतो उदय होतो त्याचा कधी तरी अस्त होतो निसर्गाचा फेरा कधीही एकदम रास्त होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावली ही अंधाराची आई आहे. वृक्ष उन्हाचा दाह पचवून प्राणिमात्रांना सावलीचा सुखद गारवा देतात, शीतलता देतात. मग तीचा एकुलता पुत्र 'अंधार' याचं काय? अंधार हा पापप्रेरक नाही. त्याचा पाप आणि पुण्याशी अंशमात्र संबंध नाही. पृथ्वीवरची अंधारी रात्र आणि माणसाच्या मनातील अंधार यात काय साम्यभेद असावेत? जन्मांधाला अंतर्चक्षूनं जीवनाचा संपूर्णानुभव घेता येतो. संत सूरदास यांचं उदाहरण पुरेसं आहे. पण डोळस लोक प्रसंगी गांधारीची भूमिका का बजावत असतात? धृतराष्ट्र द्रौपदीचं वस्त्रहरण अंध असूनही कसा अनुभवत होता? तर तो मनातल्या मनात वासनेची वासंती घडवून तीला अंतर्चक्षूनं उपभोगत होता. अंतर्मनातला अंधार गडद होत गेला की डोळसाच्याही नेत्रचंद्रावर झापड पदर ताणते. तेव्हा तो गृहस्थ शून्यभावस्थितीच्या अधीन होतो. हा डोळस असून त्या स्थितीत आंधळा तर धृतराष्ट्र अंध असून डोळस.* *प्रकाश हा सुंदर तर अंधार हा विरूप समजला जातो. प्रकाश हा अंधाराचा नाश करतो असंही तत्व विश्वमान्य आहे. परंतु खरंच अंधाराचा नाश होतो काय? तर नाही. ते कसे ते फक्त पहाटेलाच ठाऊक असतं. हा दृष्टांत अनुभवायचा असेल तर पहाट होऊन बघावं. अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. म्हणजेच अंधार हा दु:ख-क्लेशदायक आहे हा त्याचा अर्थ. अंधार कृष्णवर्णी असतो आणि आपण गौरवर्णाला सुंदरतेचं प्रतीक मानत असतो. प्रत्यक्षात चंद्रिका ही कृष्णवर्णीच आहै. ती अंधारकन्या आहे, सूर्यकन्या नाही. अंधार आणि दु:ख दोन्ही शाश्वत तर सुख हे उन्हाचं कवडसं आहे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चिंचोक्याचा एकक आणि दशक* मुले चिंचोके खेळतात. याचाच उपयोग करून चिंचोके फोडून त्याचे दोन भाग केले. ➡आपणास दोन बाजु मिळतील एक काळी  व दूसरी पांढरी. ➡आता चिंचोके टाकावे . ➡ *काळी बाजु*असणारे चिंचोके *एकक*व *पांढरी बाजु* असणारे चिंचोके *दशक* समजावे.अशा प्रकारे एक संख्या मिळेल.ती लिहुन घ्यावी. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *पश्चाताप* एक व्यापारी होता. त्याने आपल्या कामासाठी एक घोडा आणि एक गाढव पाळले होते. तो घोड्याचा उपयोग स्वतः च्या सवारीसाठी तर गाढवाचा वापर माल वाहतूक करण्यासाठी करायचा.  गाढवाच्या   पाठीवर माल लादून गावोगावी जायाचा आणि  माल विकायचा. व्यापार्‍याने घोड्याला जादा पैसे देऊन विकत घेतले असल्यामुळे तो त्याची अधिक खातिरदारी करायचा.  काळजी घ्यायचा.  घोड्याच्या  पाठीवर ओझेसुद्धा लादायचा नाही. एक दिवस व्यापारी घोड्यावर बसून आणि गाढवावर ओझे लादून कोठे तरी निघाला होता. गाढवावर क्षमतेपेक्षा अधिकच ओझे लादले गेले होते.  त्यात गाढव खूपच  कृश होते.  रस्ताही  खाच-खळग्यांचा होता.  त्यामुळे त्याला चालताना भलताच त्रास होत होता. तो एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत होता.  त्याला त्याचे स्वतः चे मन एवढे मोठे ओझे वाहून नेण्याविषयी हमी  देत नव्हते. त्याचा आत्मविश्वास आणि पाय गाळटले होते. तो घोड्याला म्हणाला," घोडे दादा, माझ्याच्याने चालवत नाही रे! आता मी इथेच दम तोडतोय की काय असं वाटायला लागलं आहे,  माझा थोडा भार हलका करशील का? तुझे फार उपकार होती."      परंतु, मालकाच्या लाडा-प्रेमाने लाडावलेला,  वाढलेला घोडा मात्र मोठा गर्विष्ठ बनला होता. तो अहंकार भरल्या स्वरात म्हणाला," हे काय बरळतोयस तू? माझी पाठ  ओझे वाहून नेण्यासाठी वाटली की काय तुला?   मी का तुझे ओझे वागवू? खबरदार, पून्हा असा म्हणालास तर...?" बिचारे गाढव काहीच बोलले नाही. ते रडत-खड्त आपले पाय ओढत राहिले आणि शेवटी धापकन पडले. त्याचा एक पाय मोडला. ते पाहून व्यापार्‍याला मोठे वाईट वाटले. त्याची दया आली. लागलीच  त्याने  गाढवावरचे सगळे ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. आणि  गाढवालासुद्धा वर चढवले. आता घोड्याचा सारा अहंकार गळून पडला. आता त्याला पश्चाताप वाटू लागला. मघाशी गाढवाची गोष्ट ऐकली असती आणि   त्याचा  भार थोडा हलका केला असता तर  आता ही कंबरडे मोडणारी आपत्ती ओढवली नसती.  त्याला मदत केली असती तर माझेही भले झाले असते आणि त्याचेही! पण आता नाईलाज होता.  .... घोडा मान खाली घालून निमूटपणे चालू लागला.  〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment